Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

एका वांग्याची गोष्ट
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 04, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: muktpeeth

- सौ. सुरेखा सखाराम जाधव, धनकवडी.
मी अगदी निवांत झाले. चला घरी जाऊन थोडे खाऊन पटकन आरामशीर झोपता येईल. तशी सपनाची अधूनमधून स्वयंपाक घरात लुडबूड असायचीच. पण पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर कधी सोपवली नव्हती...


चार-पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या दिवशी रविवार होता. हे सकाळी उठल्या उठल्याच म्हणाले, "चल आज आपण दौंडला (त्यांच्या बहिणीकडे) जाऊन येऊ. संध्याकाळी परत येऊ, नाहीतर ती सारखी बोलावते आहेच.'' पटकन उरकून आम्ही दोघे आणि माझा आठवीतला मुलगा, असे आम्ही तिघे 10 वाजताच निघालो. माझी धाकटी मुलगी- जी नुकतीच दहावी झालेली होती, तीही आनंदाने म्हणाली, ""अगं मम्मी खुशाल जा. काही काळजी करू नको. मी संध्याकाळी छान स्वयंपाक करून ठेवते. काय भाजी करू?'' मीही अगदी खुशीत म्हणाले, "अगं, फ्रिजमध्ये एक वांगे आहे, त्याची भाजी कर. आले, लसूण, कोथिंबीर, खोबरे घालून आणि पीठ मळून ठेवले आहे, त्याच्या चार-पाच चपात्या कर.'' ती "ठीक आहे,' म्हणाली.

दौंडमध्ये आमचा दिवस कसा गेला, ते कळलेही नाही. सहा वाजताच्या ट्रेनने आम्ही पुण्यास (आमच्या घरी) यायला निघालो. प्रवासात बसल्या बसल्या मी सपनाला (मुलीला) फोन केला. "काय गं काय करतेस?' सपना म्हणाली, "काही नाही गं मम्मी, आत्ताच स्वयंपाक झाला!'

""अगं, आता तर सात वाजलेत. एवढ्या लवकर?'' ती म्हणाली, ""अगं मला वेळ लागतो नां म्हणून पाच वाजताच स्वयंपाक सुरू केला.''
मी अगदी निवांत झाले. चला घरी जाऊन थोडे खाऊन पटकन आरामशीर झोपता येईल. तशी सपनाची अधूनमधून स्वयंपाक घरात लुडबूड असायचीच. पण पूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर कधी सोपवली नव्हती.

घरी आलो, तोपर्यंत साडेआठ-नऊ वाजले होते. प्रवासात शिणल्यासारखे झाले होते. दोन घास खाऊन अंथरुणावर कधी पडेन असे झाले होते. सपनाने ताटे घेतली. भाजी घेण्यासाठी मी भाजीचा कुकर उघडला आणि कुकरमध्ये बघतच राहिले. ""अगं, काय गं!''
काय झाले, म्हणून सगळे कुकरमध्ये बघायला लागले. कुकरमध्ये एक भले मोठे वांगे आमटीमध्ये पोहत होते. ""अगं याला कापले नाही का?''
सपना, ""अगं मम्मी, तूच म्हणाली होती ना, एका वांग्याची भाजी कर!'' मी माझ्या डोक्‍याला हात लावला. अजूनही हा किस्सा आठवला, की आम्ही व ऐकणारे सर्व अगदी खो-खो हसत सुटतात.
Madhu Milan
प्रतिक्रिया
On 6/12/2010 4:45 AM @Rikamtekadi Bai said:
१ नंबर!!
On 6/8/2010 2:45 PM swati said:
मस्त लेख आहे......सर्गीस्ते
On 5/27/2010 11:26 PM Mukul Sathe said:
nice ..... responses from all d people. original story was BAKWAS......
On 09/05/2010 16:44 SACHIN said:
Prasidhi Lolup chimanrao !! dusrya lokanchi nave vaparun pratikiya devun swatachi stuti karane krupaya band kar !! Tuzi pratikiya vacahali, mandal abhari ahe.
On 4/23/2010 10:24 AM neha said:
लेख छान! चिमणराव u r really gr8!! लेखापेक्षा प्रतिक्रिया वाचताना जास्त हसू आले..वृशालीला दिलेली comment आवडली.. :D आणि हा ओरीगीणाल चिमणराव कोण आहे??? :) मला वाटते ह्यांच्या नातेवाईकाने कल्याण या नावाने राग व्यक्त केला असावा..पण एवडा रागवायची काहीच गरज नाहीये कारण हे प्रश्न तुला नाहीयेत..so be cool!
On 4/14/2010 10:15 AM प्रीती said:
चिमण्या you are great तू सगळ्या मुक्त्पीठ्चा वाचकांना तुझ्या प्रतिक्रियांनी क्रेझी करून टाकले आहेस. एक तर तुझ्या प्रतिक्रिया stereo type नसतात आणि खूप खूप हलक्या फुलक्या आणि मजेशीर yet मुद्देसूद असतात. तुझ्या क्रेझ्चे एकच प्रूफ आहे तुझे किती duplicate , तोतया , clone झाले आहेत. सिम्पली ग्रेट. खूप खूप लिही & तुझा ID पण दे.
On 11/04/2010 8:10 AM ओरीजनल चिमणराव said:
पण .....वृषाली, विचार करायला हरकत नाही ......!
On 9/04/2010 4:35 PM sharad soman said:
काय चिमणराव ,हे वागणे बरे नवं !!!
On 4/9/2010 10:44 AM ओरीजनल चिमणराव said:
इथे माझ्या नावाने कुणीतरी विचित्र प्रतिक्रिया वृषाली ला लिहली आहे. कृपया असे करू नका. आपण सर्वांनी या माध्यमाचा उपयोग जबाबदारीने & सभ्यतेच्या कक्षेत राहून करायला हवा. @वृषाली - कृपया गैरसमज नको.
On 09-04-2010 00:50:44 vachak said:
lekha piksha Chamnrao ch comments jasti aahi. Suggestion f chimanrao.. tumch remix lekha pathwa wachayala aawadil
On 6/04/2010 3:58 PM chimanrao said:
वृषाली मला तू आवडलीस -------------------------> ...............!!!!!
On 05/04/2010 13:48 sasonkar yardena israel said:
मी हि प्रतिक्रिया लिहित आहे कारण खूप महिने चिमण रावाची चिव चिव आयकू नाही आली चिमण राव राग्वालात तुमच्या प्रतिक्रियेची वात पहाते आहे मी आणि बाकी प्रतिक्रिया लिहिणारे पण सासोन्कर यार्देना इस्राईल
On 4/1/2010 1:36 PM Parag said:
Thank God, Her Mother didnt ask her to make chicken ::)
On 3/28/2010 9:34 PM Bhagwat said:
वेरी nice
On 3/16/2010 11:56 AM shabana said:
it was really very funny .
On 09-03-2010 00:04:29 Yeda said:
चिमण्या लई भारी. तोद्लास लेका.
On 2/7/2010 12:16 PM ek vachak said:
as anubhav pratyekalach yet asava. navin swaipak shikat astana asha bryach gamati gamati ghadtat. pratyek aaila tyache kautuk aste.
On 2/4/2010 1:31 PM Mini said:
अरे काय सगळ्यांनी चिमण रावांचे कौतुक लावले आहे.....ज्याचा लेख आहे त्यांना बोला नं.... छान आहे.... गंमत.
On 1/30/2010 2:34 PM sai said:
majeshir lekh ahe, tyapexa pratikriya majeshir ahet. kay mag chimanrao builder honar disatay? tas.. tumachya gharat 3 mansana kiti polya lagtat? tumhala bhat far avadto ka?
On 1/28/2010 3:57 PM Paresh said:
आयला हा चिमण्या कसला फेमस झाला आहे अल्मोस्ट सेलेब्रिटी. एवडी काय जादू केली याने ? प्रतिक्रया तर काय सगळेच देतात हा त्यतल्या त्यात जरा बरा लिहितो म्हणून काय डोक्य्वर घ्याचे?
On 1/28/2010 1:04 PM वृषाली said:
खरच चिमणराव atleast कुठे asto, काय करतो, ते तरी सांग. मला वाटत कि तू एक IT Professional आहेस. तुझ्या मागील पोस्ट मध्ये जी language वापरली आहे ती फक्त IT madhe वापरतात llike template .. etc.
On 1/27/2010 4:02 PM Naresh said:
चिमणराव, ग्रेट. एक विनंती आहे-- तुमची identity disclose kara.
On 2010/01/27 7:32 Raghav said:
चिमणराव तुम्ही खूपच मस्त प्रतिकिया देत असता लेख वाचण्यापेक्षा तुमच्या प्रतिक्रिया वाचायला जास्त मजा येते.अशाच प्रतिक्रिया देत चला.
On 1/27/2010 5:07 AM Rock said:
लेख बद्दल खूप काही लिहावे असे काही नाही. ठीक वाटला. बाकी चिमण राव आगे बढो हम तुम्हारे साथ हे. कल्याण take it easy. एवढे रागावण्या सारखे काही नाही. चिमण राव मुळे वाचण्यास मजा वाटली.
On 25/01/2010 14:58 kau said:
चिमण राव सारख्या लोकां मुलेच वाचण्याची जास्त मजा येते. लेखिकेने लेख लिहिला आणि तिचा संबध संपला प्रतिक्रिया हा वेगळा भाग आहे. फार छान प्रतिक्रिया दिल्यात तुम्ही चिमण राव...अभिनंदन
On 1/24/2010 12:11 PM Prashant Kolhapurkar said:
chimanrao tumcha swabhaav kupach majeshir aani uttsahi असणार. tumhi प्रत्येक thikani ashaach mishkil प्रतिक्रिया देत जा. lekhapexa tumchya प्रतिक्रिया atishay मस्त आहे. kaddaachit सुजातातैना ashaa प्रकारच्या प्रतिक्रियाnchi apeksha नसणार. & kalyan anni sandy plz. take it normally yaar.
On 18/1/2010 9:28 sahvedana said:
चिमण राव तुमची प्रतिक्रिया भारी आहे. हसून हसून पोट दुखायला लागले. तुम्ही का नाही मस्त लेख लिहित. छान शैली आहे तुमची.सुरेखा ताई तुमचा लेख पण छान आहे. अशा चुकांमधूनच मुली शिकतात.कल्याण तुम्हाला ईतका राग का आला कळले नाही. ईतके serious होऊ नका. तुम्ही ' चतुर' आहात का?
On 1/18/2010 4:07 AM chatur said:
चिमणराव, लई भारी. मुक्तपीठ मधले लेख वाचण्या पेक्षा प्रतिक्रिया मस्त असतात आगे बढो चिमणराव, सगळ्या लेखांना प्रतिक्रिया द्या.
On 1/16/2010 6:05 PM Rikamtekadi Bai said:
पण वांगे शिजले होते का? ते सांगायचे राहिलेच पोळ्या पुरल्या का?
On 1/15/2010 5:54 PM robert v said:
आयला लेखावर कमेंट करायच्या सोडून लोक त्या चिमणरावच्याच मागे लागलेत. कमाल आहे बुवा......
On 1/14/2010 5:17 PM sweety said:
woh's Chimanrao n Kalyan.....
On 1/12/2010 12:32 PM JUMBO said:
मी प्रियांकाशी पूर्णपणे सहमत आहे . अरे कल्याण ,प्रतिक्रिया देताना कशासाठी हा हिंस्त्रपणा !
On 1/11/2010 5:12 PM sunil shingade said:
चिमणराव तू महान आहेस, काय analysis केले आहे सोलिड. इतक्या बारकाईने तू हे लेख वाचतो ग्रेट. Sandy म्हणाला ते बरोबर आहे तुला भेटले पहिजे.
On 1/11/2010 12:11 PM yogita salvi said:
चिमणराव तुम्ही ग्रेट आहात ! काय अभ्यास आहे! लेख पेक्षा तुमची प्रतिक्रिया च भारी ahe
On 1/6/2010 5:34 PM Sudhir said:
वा चिमणराव तू तर यार उद्योगपती व्हायला हवास. तुला दूर्द्रीष्टी आहे, पुण्यापासून दौंड जवळ आहे २.५ तास आणि रेलने कॅनेक्टेड आहे हे हेरून तू म्हणालास कि तिकडे बिल्डर आता घरे बांधत असतील ग्रेट यार, असाच होणार आहे.
On 1/6/2010 12:08 PM Priyanka said:
ये कल्याण तू dentist आहेस का? किती असभ्य आहेस तू? इथे सर्व लोक सभ्यपणे आपल्या प्रतिक्रिया देऊ शकतात. तू इथला प्रोटोकॉल पळत नाही हे चुकेचे आहे. मी सर्व netizens ला आवाहन करते कि सर्वांनी कल्याणचा धिक्कार करावा.
On 1/5/2010 9:05 PM sachin said:
Va mere Chimane !! kay mast pratikiya dili ahes?manale pahije..best pratikiya of 2010..
On 1/5/2010 4:04 PM Gundyabhau said:
Murkh Chimanrao! tula kadichihi Akkal nahi
On 05/01/2010 15:58 sasonkar yardena israel said:
चिमणराव खरोखर तुमच्या सारख्या निंदकाचे घर असावे शेजारी शेजार्याना तुमच्या शेजारी राहायाला आल्या दिवसा पासून पस्तावा होईल आणि सुरेखा ताई ह्यांच्या मुली बद्धल म्हणाल तर हा अनुभव परतेक शाळकरी मुलीचा असतो असे मला वाटते सासोन्कर यार्देना इस्राईल
On 1/5/2010 11:27 AM Gundybhau said:
चिमणराव तू महान आहेस, काय analysis केले आहे सोलिड. इतक्या बारकाईने तू हे लेख वाचतो ग्रेट. Sandy म्हणाला ते बरोबर आहे तुला भेटले पहिजे.
On 1/4/2010 10:39 PM ya whatever said:
लेख छान आहे. पण चिमणराव, बॉस!! मानलं तुम्हाला!! सॉलिड विश्लेषण आहे. तोडच नाही... इतका विचार कोणी करू शकतं यावर विश्वास बसणं अवघड आहे.. भारी!! तुम्हाला भेटलं पाहिजे...
On 1/4/2010 7:37 PM Sandy said:
छान लेख आहे...अगदी लहानपण आठवले...अशा चुका होतातच...आणि मग त्याच आठवणी बनतात...नेहमी लिहित जा...and all the best for your next articles... आणि लोकांच्या प्रतीक्रीयांपेक्षा आपल्या भावना महत्वाच्या... काही खोचट लोक ugach badbad karun ghetat...आणि नसते प्रश्न विचारतात...mobile महाग असेल न...भात केला नसेल ...वैगेरे वैगेरे.....त्यांना काही न बोलता आपले काम चालू ठेवायचे...
On 04/01/2010 17:57 Chimanrao said:
tumhala tras zalela distoy.....
On 1/4/2010 2:19 PM Kalyan said:
चिमणराव खूप bolalat तुला kay करायचे 3 माणसाना ५ chaptya कश्या nahi तुझ्या garache भाग samjale न मधी मधी dhavaladhaval करू नकोस ani मुकाट्याने tujhe काम कर nahi तर उगाच मार khashil कामधंदे nahi vatte तुला तुझे konashi जमत nase जर ya लेखla आणि yapudhe कुठल्या लेख la प्रतिक्रिया diyla न dat todun हातात dein
On 1/4/2010 11:20 AM Chamnrao said:
तुम्ही दौंडला जाताना कश्या गेलात ते लिहिले नाही. तुम्ही वार लिहिला पण महिना लिहिला नाही एप्रिल होता का? ४-५ वर्षापूर्वी मोबाईल खूप महाग होते तरीदेखील तुम्ही वापरत होता का? दौंडमाधीन पुण्यात २.५ तासात पोहचता येते का? मग दौंडमध्ये आता खूप बिल्डर घरे बांधत असतील न? तुम्ही एवढ्यात गेला होतात का? तुम्ही जा किस्सा सर्वाना का सांगता ? सगळे हसतात न मग तुमच्या मुलीला वाईट वाटत असेल असे करू नका , आता कुणाला सांगायचा प्रश्ना उरला नाही सगळ्यांनीच वाचले असेल. आता सपना स्वयंपाक चांगला करत असेल नाही का?
On 1/4/2010 11:13 AM Chimanrao said:
तुमचा लेख खूपच छान आहे. नियमित लिहित जा. बरयाच गोष्टी माहित झाल्या, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ४-५ वर्षापूर्वीच्या गोष्टी नीट आठवत आहेत, नाहीतर सध्या लोकांना विस्मरण फार होते. तुमच्या मुलीला स्वयंपाकाची आवड आहे आणि तुम्ही तिला encourage करता हे देखील चांगले आहे पण एक कळले नाही ३ माणसाना ५ चपात्या कशा पुरतात, वांग कुकर मध्ये शिजवल्यामुळे भात केलाच नसेल न? तुमचे पती तुम्हाला म्हणाले कि त्यांची बहिण सारखी बोलावते आहे याचा अर्थ तुमचे नानंदेशी पटत नाही असे दिसते नाहीतर तुम्ही नेहमी गेला असता co


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: