Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माझी मराठी पुस्तक खरेदी
पुरुषोत्तम काळे, भोसलेनगर
Monday, February 15, 2010 AT 06:04 PM (IST)
Tags: muktpeeth,   anubhav
त्या गृहस्थाने यादीवर नजर टाकली आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाले, ""अशी थिल्लर पुस्तकं आम्ही काढत नाही. आमची सर्व "टायटल्स' विचारप्रवर्तक असतात.'' मराठी पुस्तकांना "टायटल्स' म्हणतात, हा शोध मला लागला आणि इतर पुस्तके थिल्लर, म्हणजे मी चिल्लर हेपण समजलं.

बऱ्याच दिवसांनी लांबच्या प्रवासाचा योग आला. प्रवास म्हणजे सामानाची जमवाजमव इत्यादी ओघाने आलंच. प्रवास जरा परदेशी होता. जवळच. पाच तासांच्या अंतरावर. मी परदेशी प्रवास करताना आवर्जून मराठी पुस्तके घेऊन जातो, विमानात मिरवतो, वाचतो आणि मुक्कामाच्या ठिकाणी यजमानांना पुस्तक भेट म्हणून देतो. परदेशी, मराठी पुस्तकं इतक्‍या सहजपणे मिळत नाहीत आणि त्याची अपूर्वाई असते.

मी मला आवडलेल्या पुस्तकांची एक यादी केली. एक वाचक म्हणून मला लेखक आणि पुस्तकाचं नाव माहिती होतं. मोठ्या उत्साहाने मी जवळपासची पुस्तकांची दुकानं शोधू लागलो आणि धक्का बसला. मी राहतो गणेशखिंड रस्त्यावर, म्हणजे अगदीच गावाबाहेर नाही. संपूर्ण गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, औंध, बाणेर, लॉ-कॉलेज रस्ता, संपूर्ण कर्वे रस्ता, टिळक रोड, पौड रोड इथे कुठेही प्रचलित मराठी पुस्तकाचं दुकान नाही. मराठी पुस्तक गाठायला एक दुकान गरवारे पुलाजवळ सापडले. त्यांचा नंबर मिळवला आणि दूरध्वनी केला, तेव्हा येणेप्रमाणे संवाद झाला.

"हॅलो'- मी.
"कोण?' दुकानातली महिला अत्यंत निरुत्साही!
"अमुक-तमुक दुकान का?'- मी.
"हो... काय हवंय'- महिलेचा जाड आवाज.
""मला काही मराठी पुस्तकं हवी आहेत.''- मी.
"प्रकाशक कोण ते सांगा!- महिला.
"ते मला नेमकं माहिती नाही.'- मी.
"मग पुस्तक कसं घेणार?' कंटाळलेला आवाज.
"आमचं प्रकाशन आहे का?'- महिला.
"माहिती नाही'- मी.
"बरं, मग विचारा.' अगदी ही ब्याद का विचारते आहे, असा आवाज.
"मीना प्रभूंची पुस्तकं आहेत का?'- मी.
"अगं कोणीतरी प्रभूंची पुस्तकं विचारतो आहे, आहेत का?' एकीने दुसरीला विचारलं.
"त्याला सांग विठ्ठल प्रभूंचे आहे, "विवाहितांचा वाटाड्या'; पण फक्त प्रौढांसाठी.' दुसरी.

मी फोन बंद केला. ही फोनाफोनी करण्यापेक्षा प्रत्यक्ष जावे, असा विचार केला आणि जवळच्या मॉलमध्ये गेलो. एकही पुस्तकाचं दुकान नाही. मराठी तर नाहीच. मग असे कळलं की इथल्या मल्टिप्लेक्‍समध्ये एका प्रसिद्ध पुस्तक दुकान मालिकेतील एक दुकान आहे. सर्व धुंडाळले, पण एकही मराठी पुस्तक नाही. मी काउंटरवर चौकशी केली. त्यांनी एक कोपरा दाखवला, त्यात मराठी भविष्य, वास्तुशास्त्र आणि सर्व बुवा मंडळींची चरित्रं होती.
"इतर पुस्तकं कुठं आहेत?'
"यहॉं नही है'- काउंटर.
"मग कुठे असतील?'- मी.
मालूम नही साब, मै फूड काउंटरसे हूँ, यहॉं का आदमी खाना खाने गया, मैं करके बैठा हूँ।
"आपण मराठी आहात का?'- मी.
"नही साहाब, मै ओरिया हूँ'
भारताच्या कोपऱ्यातून आलेल्या त्या माणसाला मी नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मनात आलं, की किती जोशी, कुलकर्णी, पाटील, बर्वे, पाटकर इत्यादी ओरिसात जातील?
आता इलाज नाही म्हणून डेक्कन जिमखान्याकडे मोर्चा वळवला. इथे एक मराठी आणि दोन इंग्रजी दुकानं सापडली. त्यापैकी प्राधान्याने मराठी दुकानात शिरलो.
दुकानाच्या पायरीवर नवीन वर्षाच्या दिनदर्शिका आणि इंग्रजी नियतकालिकांचा ढीग पडला होता. पायऱ्या चढून गेलो. तेव्हा एक वृद्ध गृहस्थ दिसले. मी स्मित करून विचारलं, "ही पुस्तकं आहेत का?' त्यांनी त्यांच्या सहायिकेला सांगितलं. "अगं, त्यांना काय पाहिजे बघ!' आणि स्वतः दूरध्वनीकडे वळले, ही "अगं' ग्रामीण ढंगाने बोलणारी, चुणचुणीत तरुणी होती. "बोला साहेब!'
मी यादी पुढे केली आणि प्रश्‍नार्थक चेहरा केला. यादी बघून ती महिला म्हणाली, "कुठलं डिपार्टमेंट?'
"आँ'- मी. ""नाही अशी यादी करून खरेदीला येणारे म्हणजे कुठलंतरी डिपार्टमेंट किंवा सरकारी ग्रंथालय म्हणून विचारते.''
"नाही. मी प्रवासाला जातो आहे म्हणून!'- मी.
"यातलं एकही पुस्तक नाही, असं करा, ही यादी ठेवून जा आणि उद्या या. मी प्रकाशकांकडून मागवून घेते आणि तुम्हाला फोन करते. पण यादीतल्या या आणि या प्रकाशकाची खात्री नाही. पुस्तकं द्यायला खूप कटकट करतात आणि रोख ऍडव्हान्स मागतात.''
""बरं, मग मीच प्रकाशकांकडे गेलो तर? आता इथपर्यंत आलोच आहे तर अजून थोडं पुढे!''
""अहो साहेब, तुम्ही कुठे कुठे फिरणार? आणि प्रकाशनाच्या ऑफिसात पण कधी-कधी ही पुस्तकं मिळत नाहीत.''
मी चिकाटीने विचारलं की हे प्रकाशन कार्यालय आहे कुठे? एक नारायण पेठ, दुसरे सदाशिव पेठ, तिसरे शनिवार पेठ, चौथे माडीवाले कॉलनी, पाचवे पेरूगेट इत्यादी.
मी धीर न सोडता दोन चार प्रकाशकांकडे जायचं ठरवलं. प्रथम तिथून जवळ नारायण पेठेत! कुलूप! जेवणाची सुट्टी. पुढच्या कार्यालयात गेलो. कार्यालय सुरू होतं; पण विक्री विभागात काम करणारे नव्हते. संपादन खात्यात काम करणाऱ्या एका महिलेने माहिती पुरविली, ""काय आहे की विक्री म्हणजे रोखीचा व्यवहार आणि रोकड हाताळावी लागते. ही पुस्तकं महाग असतात ना? आणि हिशेबाचा प्रश्‍न असतो ना? आणि कमी भरले तर पदरचे घालावे लागतात.''

इथे मी रोख पैसे आणि यादी घेऊन खरेदीला निघालो होतो आणि ही पुरंध्री मला जोखीम, रोकड, जबाबदारी आदी मराठी मध्यमवर्गीय भुतांची भीती घालत होती.
"असू दे मी थांबतो'- मी.
"तुम्ही दुकानातून का खरेदी करत नाही?' महिला.
""अहो मिळत नाहीत. तुम्हीच सांगा कोणत्या दुकानातून घेऊ? तुम्ही कुठून घेता?''
""छे, छे, मी कधीच खरेदी करत नाही. इथूनच वाचायला नेते आणि परत आणते.''
सुमारे 10 मिनिटांनी विक्री-विभाग प्रमुख जोखीम तरुणी अवतरली. वय सुमारे 30 वर्षे. हातातल्या बोटांत 4-5 अंगठ्या आणि बोलताना त्याच्याशी कायम चाळा! त्या महिलेच्या आसनासमोर खुर्चीत मी बसलो होतो. माझ्याकडे अगदी स्टायलिश दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलणे चालूच ठेवले. संपादन खात्यातील महिलेची आणि जोखीम विक्रीची माझ्या कळत नकळत काहीतरी नेत्रपल्लवी झाली आणि भ्रमणध्वनी संभाषण आटोपते झाले.
""काय हवंय?''- जोखीम.
""ही पुस्तकं!'' मी यादी दाखवताच, ""ही पुस्तकं आमची नाहीत.''- कपाळभर आठ्यांसह जोखीम.
""तुमची पुस्तकं मी मार्क केली आहेत...''
""तुम्ही दुकानातून का घेत नाही?''- जोखीम.
""मिळत नाहीत.''- मी.
""अहो, हे दुकानदार आम्हाला बदनाम करायला टपलेले असतात. आधी ऑर्डर नोंदवत नाहीत. पैसे भरत नाहीत. आणि आम्हाला त्रास. अगदी फटके मारले पाहिजेत''- जोखीम.
""ते बरोबर आहे. पण मी परदेशी जातो आहे. आणि ही पुस्तके घेऊन जायची आहेत.''- मी.
""अय्या, म्हणजे तुम्ही एन.आर.आय. आहात?'' जोखीम.
""नाही, पण वर्षात 2-4 वेळा जातो''- मी.
""गेल्या वर्षीच आम्ही पट्टाया, बॅंकॉक उरकून आलो.''-जोखीम.
""मॅडम, पुस्तकाचं काय?''- मी.
""थांबा, गोडाऊनमध्ये पाहते.''- जोखीम.
""अरे राम, जरा गोडाऊनमध्ये जा, ही यादी घेऊन.''
माझी यादी आणि राम गडप झाले. अर्धा तास झाला, पण पत्ता नाही. मध्यंतरी जोखीम इकडे तिकडे जाऊन कामाचं नाटक करून आली. माझ्याखेरीज कार्यालयात कोणीही ग्राहक आला नाही आणि एकंही दूरध्वनी आला नाही. संस्थेचे मालक म्हणजे प्रकाशक जवळपासही नव्हते. चौकशी केल्यावर कळलं, की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्येच असतात आणि त्यांच्या पब्लिसिटी एजंटबरोबर वृत्तपत्रांतून येणारे बातमी-कम-जाहिरात मॅनेज करत असतात.
अर्ध्या तासानंतर मी स्वतः गोडाऊनमध्ये गेलो. राम बेपत्ता आणि माझी यादी तिथल्या एका टेबलावर होती. ती यादी घेऊन मी स्वतः पुस्तकं शोधली. 1-2 मिळाली. त्यावरील धूळ झटकून, तळघरातून हाशहुश करत वर आलो. पाहतो तो काय "जोखीम' बेपत्ता! मी परत संपादकीय महिलेला विचारलं.
""कुठे गेल्या?''
""अहो, कॅश ऑवर्स संपले, ती घरी गेली.'' मी कपाळावर हात मारला. पुस्तक तिथे ठेवली आणि बाहेर पडलो. रस्त्यावर येऊन गाडीत बसलो, तोच रामू अवतरला.
""साहेब, पुस्तकं हवीत का?''
""हो, म्हणून तर आलो.''
""मी देतो 15 टक्के सवलतीत''
""कसं काय?''
""मी बुकक्‍लबचा मेंबर आहे आणि मला 30 टक्के सवलत आहे. त्यातील 15 टक्के तुमचे! जरा पलीकडे जाऊन व्यवहार करू.''- रामू
""रामू, मला बुकक्‍लबचा मेंबर होता येईल का?''
""हो साहेब, पण पुस्तकं मिळणारच नाहीत.' ""आँ!''
""हो साहेब, आम्ही सर्व स्टाफ रिंग करूनच स्वतःकडे पुस्तकं ठेवतो. आमच्याखेरीज कुठेच सवलतीत मिळणार नाहीत, दुकानातसुद्धा.''- रामू.
या प्रकाशकाचं भविष्य उज्ज्वल आहे. मी तसाच पुढच्या प्रकाशकाकडे गेलो. अगदी अरुंद रस्ता, जुनाट इमारत, पॅसेजमध्ये कशीबशी चालत जाण्याची जागा होती. उरलेल्या जागेत शुभ्र पांढरीकोरी करकरीत होंडा सिटी गाडी. त्याच्या मागच्या-पुढच्या काचेवर प्रकाशन संस्थेची स्टिकर्स लावलेली. माझ्या मनात आलं, "अरे व्वा, हे प्रकरण भारदस्त दिसतं आहे.' आत शिरल्यावर कार्यालयसदृश हॉल होता. उजवीकडे एक केबिन. त्यात कोणीच नव्हतं, पण टांगता दिवा टेबलवर लावलेला होता. डावीकडे टेबलांवर स्टाफ होता. एकासमोर जाऊन मी यादी पुढे केली. त्या माणसाने त्याचा उजवा हात उंचावून "तिकडे' असे दर्शविले. तोंड बंद! मी विचारलं ""का?'' ""हा संपादकीय विभाग आहे. विक्री तिकडे बाहेर, बाण आहे ना तिकडे. तुम्हाला गाडीमुळे बाण दिसला नसेल.''

त्याच गृहस्थाने यादीवर नजर टाकली आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाले, ""अशी थिल्लर पुस्तकं आम्ही काढत नाही. आमची सर्व "टायटल्स' विचारप्रवर्तक असतात.'' मराठी पुस्तकांना "टायटल्स' म्हणतात, हा शोध मला लागला आणि इतर पुस्तके थिल्लर, म्हणजे मी चिल्लर हेपण समजलं.
मी बाणाच्या दिशेने गेलो. दोन कामगार पुस्तकांचे गठ्ठे बांधत होते. एक मोठ्या वयाचे गृहस्थ टेबलामागे बसले होते. आतापर्यंत मला प्रकाशनसंस्था आणि त्यांचीच पुस्तके ही ओळख झाली होती. एका प्रकाशकाचे पुस्तक दुसरीकडे विचारूसुद्धा नये, हा नियम अंगवळणी पडला होता. ही नवीन जातिव्यवस्था मजेदार होती. पुस्तकं खरेदी करताना लेखक, पुस्तकाचे नाव या गोष्टी गौण होत्या. प्रकाशक कोण? हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा! त्यातून पुस्तकांची जात कोणती, हा शोध लागला.

या नवीन ज्ञानामुळे सरावलेला मी आता याच प्रकाशनाची पुस्तकं तोंडी विचारायची ठरविली. ""हे पुस्तक आहे का?'' त्या वयस्कर गृहस्थांनी मान आडवी हलवली. म्हणजे नाही. ""बरं ते पुस्तक,'' माझा चिवट प्रयत्न. ""तेही नाही.''
आता हतबुद्ध व्हायची वेळ माझ्यावर होती.
""अहो, त्या पुस्तकांचं प्रकाशन गेल्याच आठवड्यात झाल्याचं मी वाचलं आणि पुस्तकं नाहीत असं कसं?''- मी.
""ती आवृत्ती संपली.''
""आठ दिवसांत आवृत्ती संपली?''

त्या वयस्कर गृहस्थाने मला "खाली बसा,' अशी खूण केली. अगदी जवळ तोंड आणवून कानात गायत्री मंत्र सांगितल्यासारखे कुजबुजले. ""अहो, शंभरचीच आवृत्ती होती. ती केव्हाच संपली. पुस्तक छापलेलं आहे. पण आता दुसऱ्या आवृत्तीची जाहिरात आली, की पहिलं पान तेवढं बदलायचं. तेव्हा हे पुस्तक अजून आठ दिवसांनी मिळेल.''
मला स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. सकाळी 11 वाजता पुस्तक खरेदीला निघालो. आता चार वाजेपर्यंत पुस्तक मिळालं नसलं, तरी ज्ञान बरंच मिळालं होतं. फुकट!
या गृहस्थाबरोबर थोडी बातचीत करावी असं ठरवलं आणि सरसावून बसलो. तेवढ्यात पलीकडच्या संपादकीय दालनातून काही आवाज ऐकू येऊ लागले. एक पुरुषाचा खरखरीत आवाज आणि एक स्त्रीचा. नीट काही समजलं नाही पण अभिव्यक्ती, आविष्कार, जाणिवा, नेणिवा वगैरे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. ते गृहस्थ चपापले आणि बोलायचे थांबले. मला हळूच म्हणाले, ""आमचे प्रकाशक म्हणजे मालक आलेले दिसतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडत्या कवयित्री आहेत. आता मला जास्त बोलता येणार नाही. तुम्ही पुढच्या आठवड्यात या.''

आता इथून उठणे भाग होते. मी बाहेर पडलो. भुकेची जाणीव झाली. रस्त्यावरचा एक उडपी गाठून क्षुधाशांती केली. परत निघालो. लकडीपूल ओलांडताना डावीकडे एक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तके विकणारे दुकान आहे. मराठी तर नाहीच; पण काही इंग्रजी पुस्तके तरी घ्यावीत. म्हणून ठरवले. पाच वाजून गेले होते. गाडी पार्क केली आणि फेरीवाल्यामधून वाट काढत दुकानाकडे निघालो. हे पुण्यातलं जुनं इंग्रजी पुस्तकाचं दुकान! सर्वपल्ली राधाकृष्णन, नेहरू, यशवंतराव चव्हाण वगैरे थोरांनी गौरवलेलं. ही भारदस्त कीर्ती आणि मी खरेदी काय करणार आणि किती? दडपण होतंच. मराठी पुस्तक खरेदीचा फज्जा उडालाच होता. तेव्हा तो विचार सोडूनच दिला.
दुकानाच्या बाहेर शोकेसमध्ये एक दोन मराठी पुस्तकं दिसली. असतील गंमत म्हणून ठेवलेली, असा विचार करून आत शिरलो. "या साहेब' एका वयस्कर गोऱ्या चष्मेवाल्या किरकोळ देहयष्टीने माझे स्वागत केलं. अरे वा. इथे मराठी बोलतात की! चला! मी सांगितलं की, ""मला पुस्तकं हवीत.''

""काही खास आवड?'' चष्मा.
मी एक-दोन माझ्या आवडीची पुस्तकं सांगितली.
""एक मिनीट हा।।'' तोवर तुम्ही ही पुस्तकंपण बघा.'' असं म्हणून तो एक क्षण बाजूला गेला आणि पुढच्याच मिनिटाला मी सांगितलेल्या लेखकाची तीन पुस्तकं आणली.
""ही घ्या. त्यातलं हे चांगलं आहे.'' आता थक्क व्हायची पाळी माझ्यावर होती. रॅक्‍सवर ठेवलेली पुस्तकं मी चाळली. आणि एक-दोन बाजूला काढली.
""या लेखकाचं हे नवं पुस्तक आलं आहे. साहेब, हे घ्या.'' त्या माणसाने मला एकही प्रश्‍न न विचारता अचूक आवड ओळखून, प्रकाशक कोण हा प्रश्‍न न विचारता, मला जे अभिप्रेत होतं ते आणून दिलं.

दुकानात फिरताना मागे टेबलामागे एक उत्साही चेहरा दिसला. जरा ओळखीचा वाटला म्हणून जवळ गेलो आणि नमस्कार केला. अंदाज बरोबर निघाला. ते गृहस्थ महाविद्यालयात माझ्यापुढे एक वर्ष होते आणि लोकप्रिय होते. इतर चौकशी झाल्यावर त्यांनी ""इकडे कुठे?'' विचारलं. झालं! मी माझ्या सर्व अनुभवाचा धबधबा ओतला. ते फक्त ऐकत होते. माझी मराठी पुस्तकाच्या खरेदीची रडकथा आणि आता इंग्रजी पुस्तक खरेदी सांगून झाल्यावर त्यांनी शांतपणे ""चहा घेणार का?'' असा प्रश्‍न विचारला. माझ्याकडून होकार कधी गेला ते मला कळलंच नाही.

त्यानंतर त्या गृहस्थांनी (जे त्या दुकानाचे मालक होते हे नंतर कळलं) मला विचारलं, ""कुठली मराठी पुस्तक?'' मी तत्परतेने यादी पुढे ठेवली. त्यांनी त्यांच्या सेवकाला हाक मारली. यादीतील प्रत्येक पुस्तक कुठल्या रॅकवर आहे, कुठल्या कप्प्यात आहे, ते सांगितलं. एखादे पुस्तक नसल्यास ते कुठून आणायचे हेही सांगितलं. इतर गप्पा होईपर्यंत इंग्रजी व मराठी पुस्तकं पिशवीत घालून बिल करून, डिस्काऊंट देऊन माझ्यासमोर आली. मी रोख रक्कम मोजली आणि त्यांचे आभार मानले.

मला एक प्रश्‍न विचारावासा वाटला, ""काय हो, तुमच्याकडे वेगळं काय?'' ते म्हणाले, ""इतर लोकं पुस्तकं विकतात, आम्ही ज्ञान वाटतो. आमच्या स्टाफचे आणि अर्थात माझे पुस्तकांवर अतोनात प्रेम आहे. येणाऱ्या कस्टमरची आवड ओळखून कमीत कमी प्रश्‍न विचारून त्याला पुस्तकं दाखवतो. खरेदी काय करायची हा त्यांचा निर्णय!''
मी माझी सर्व मराठी पुस्तकं एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाच्या दुकानात खरेदी केली आणि समाधानही!
हे सकाळीच का नाही सुचले?

प्रतिक्रिया
On 6/9/2010 12:25 PM neela said:
bagunanancha abhyas sollid aahe.
On 5/29/2010 11:53 PM Mumbai-Pune Express Highway said:
पुण्यात लाख दुकाने आहेत हो, पण ज्यांना माहित नाही त्यांनी काय करावे? तसं पण पुण्यात पत्ता विचारला कि पोरीचा हाथ मागितल्या सारखे तोंड करतात.
On 5/26/2010 7:16 PM चकोर said:
या लेखापेक्षा Comments वाचून जास्त मजा वाटली.
On 5/26/2010 5:49 PM geetanjali. said:
अहो MR goody जास्त आगाऊपणा करू नका. लेख काहीही आहे, त्यावर प्रतिक्रिया द्या.. स्वताला पुणे आवडत नाही म्हणून उगाच तोंडसुख घेऊ नका.. पुण्यात ते "वणवण" भटकले हि असतील पण ते त्यांना माहित नव्हत म्हणून.. .. ashi loka bhetali म्हणून नाही... kahipan lihitat..ashya "vachanvedya" manasala पुण्यात rahun ABC माहित nasave आणि त्यासाठी फोन करायला लागणे म्हणजे जरा खोटच वाटत..आणि आपण हि जरा पु.ल. देशपांडे वगैरे वाचा मग कळेल ढापलेले लिखाण!
On 5/17/2010 4:04 PM goody said:
खर असेल ही...... पुणे अशाच उर्मट वागनुकी साठी प्रसिद्ध आहे ... पुनेकरानो नाव ठेवला तर किती चिडला ...... त्यापेक्षा सुधारा स्वताला ....
On 4/28/2010 5:51 AM Nils said:
तुम्ही जर शेवटच्या दुकानाचे नाव सांगितले तर सगळ्यांना मदत होईल
On 4/24/2010 3:55 PM neha said:
शी काहीतरीच आहे लेख, sorry काळेसाहेब पण तुम्ही जर वाचक आहात तर तुम्हाला crossward, papular, ABC ही ठिकाणे माहिती नसावीत? आश्चर्य वाटले वाचून! चौथीतला मुलगा पण सांगेल पुस्तक कुठे मिळतात.. आणि त्यासाठी तुम्ही आधी फोन वर etc चौकशी करता म्हणजे कमालच आहे! अत्रे सभागृहाची माहिती नसेल तर..कमाल! मी बागुनानांशी सहमत एकदम! संवाद तर आधी वाचलेले आहेत..नामवंत लेखकांचे.. तुम्हाला तुमच्यातल्या "वाचकाचा" लेखक करायचं वाटत काळे काका???
On 4/20/2010 9:43 AM Akshay said:
popular book house - अप्रतिम दुकान. दुसरे कोणते असणार ह्या ठिकाणी...
On 4/18/2010 10:45 PM Dilip Sonawane said:
आधी पुस्तकांचे नाव सांगताच पुस्तक मिळायचे जास्तच झाले तर लेखकाचे नाव पण या प्रकाशकांनी ज्या प्रकारच राजकारण केलाय ना त्यामुळे बिचारया वाचकांचे हाला नक्की होतात ....असो त्याचा पण तो धंदाच तर आहे
On 16/04/2010 13:01 ha ha ha said:
Lai bhari .. ek number .. chaila amhi murkha lahan pana pasun pustak hava asel ki direct ABC madhe jayacho .. tumcha sarkha time pass karun mag shevati ABc madhe jayala paije hota .. loak kahi hi lihitat .. ani var bavlat sakal
On 4/10/2010 3:17 AM Maithili said:
काय लोकहो , इतक्या अभिमानाने लेखक मराठी पुस्तके भेट देत आहे , ती मिळवण्यासाठी वन वन करत आहे , तुम्ही त्यांनाच नवे ठेवत आहात? आणि प्रकाशकांचे काय? त्यांनी केलेले सगळे बरोबर आहे का? इकडे पैलतीरी आल्यावर मराठी पुस्तकांची किंमत कळेल तुम्हाला , वाचन वेड असेल तर.
On 3/12/2010 3:30 AM zampya said:
बगु नाना, पु. लं. तुम्हाला उगीच नाना फडणवीस म्हणत नाही. मानलं बुवा.
On 09.03.2010 20:05 reader said:
खूप छान.......लेख नाही हो.......खालच्या प्रतिक्रिया.
On 01/03/2010 13:56 Pradeep said:
Layee bhari
On 26/02/2010 20:13 chaitanya kale said:
Mr.kale tumhi puneri ahat ki nahi mahit nahi.Pan tumhi puneri panacha aav anala ahe.ABC mahit nahi hoy tumhala???.Ani var pustakatale dialogue taple ahet.ani ho BAGUNANA tumhi khare VACHAK ahat,ekach number!!!!!
On 2/26/2010 3:30 PM Kiran Mandhare said:
काय काळे काका, खरा तरी वाटतंय का ? रेगुलर पुस्तके वाचता आणि मीना प्रभूंची पुस्तके नाही वाचलीत अजून, चं होता पण लेख.
On 2/23/2010 7:33 PM Ajay G said:
उत्कर्ष प्रकाशन च्या जोशीनी २२ च्या मुक्तपीठ मध्ये स्पष्टीकरण दिले आहे. मला उत्कर्ष चा फारच चांगला अनुभव आहे. जर एखादे पुस्तक नसेल तर ते पुस्तक आणून देतात आणि आवर्जून फोन करून सांगतात. तसेच आपल्या आवडीची आणखीन पुस्तके पण सुचवतात. आता याच्या हून जास्त तुम्हाला काय पाहिजे?
On 2/23/2010 5:14 PM chakor said:
पुरुषोत्तम काळे काका, तुम्ही असेच तुमच्या प्रदेश प्रवासाचे वर्णन लिहा ना!!!!!!!!!! खूप टाईम पास होईल (आमचा). मला विनोदी आणि थापेबाज साहित्य वाचायला खूप मजा येते. पण एक गोष्ट नक्की की मराठी साहित्याला एक नवा विनोदी लेखक मिळाला आहे.
On 2/23/2010 3:24 PM sapana said:
ya lekhat je kahi chaple ahe te khare watatch nahi. Ugich lekh lambawala ahe ase watate. Lekhakala APPA BALAWANT CHAUK mahit nahi ya warun ha manus khup pustake wachat asel yawar VISHWAS ajibat basat nahi.
On 2/23/2010 12:30 PM niranjan joshi said:
Utkarsh prakashan che dukan asave asa andaj ahe . maza anubhav matra vegalach ahe . Mala tyani havi ti pustake 2 divasat anun dili . Changle discount pan dile . tyanchi sudha reguler pradarshane Atre Sabhagruhat astat ani juni durmil pustake sudha te upalbdh karun detat . Lekh ani pratikriya vachaniya ahet .
On 2/23/2010 9:56 AM anil said:
kale ur attempt is excellent and carry ur work. all the best
On 2/21/2010 4:02 PM आनंद खाडिलकर said:
लेखकाकडॆ इकडे तिकडे फिरायला भरपुर वेळ आहे असे दिसते. स्वत: चा चांगला टाईम पास झाला हे लिहायला विसरले वाटतं ...
On 2/21/2010 1:56 PM Tushar Kute (Nashik) said:
कोणत्याही अस्सल पुणेकराला विचारा, पुण्यात पुस्तके कुठे मिळतात? लगेच उत्तर मिळेल... आप्पा बळवंत चौक... कोणालातरी विचारायला हवे होते तुम्ही. आम्ही नाशिककर असूनही आम्हाला माहित आहे....
On 2/21/2010 12:00 PM b.sawant. said:
तुमच्या चिकाटी बद्दल अभिनन्दन !! परन्तु शेवटी तुम्ही शेवटच्या दुकानाचे नाव लिहायला पाहिजे होते .सर्वाना त्याचा फायदा झाला असता !!
On 2/20/2010 4:51 PM sunil shingade said:
मला तुमची पाठ थोपटूशी वाटती . सकाळी 11 वाजता पुस्तक खरेदीला निघाले . चार वाजेपर्यंत पुस्तक मिळालं नसलं, तरी ज्ञान बरंच मिळालं तुमाला.फुकट मजा आली
On 2/19/2010 3:44 PM amrita said:
छान लिहिलीत कथा..........हि तर आहे अख्या मराठी साहित्याची शोकांतिका. लैब्रारी सायन्स चे भारतीय जनक सांगून गेलेत,"books are for use" आता कोण पाळतय हा नियम ?
On 2/19/2010 8:55 AM pushkar said:
चांगली मराठी पुस्तके विकत घायची असतील तर बाजीराव रोड अत्रे सभागृहातील प्रदर्शनाला भेट द्या. मी ऑगस्ट मध्ये पुण्यात ट्रीप साठी गेलेलो असताना गो नि दांची किल्ल्यावरची ४ - ५ पुस्तके विकत घेतली. तुम्हाला पाहिजे असलेली मीना प्रभूंची प्रवास वर्णने सुधा तिथे होती.
On 2/19/2010 3:47 AM Ravi Naik said:
ज्या दुकानात पुस्तके मिळाली त्याच्या वर्नानावरून ते ईटनशनल बुक सर्विस असावे आसे वाटते. पु.ल. देशपांडे चा ईटनशनल दिक्षित हा लेख या दुकानावर लिहिलेला आहे.
On 2/18/2010 8:02 PM raj_shiv11@rediffmail.com said:
मला Daniel Defoe's Robinson Crusoe हे पुस्तक हवे आहे, कुठे मिळेल?
On 2/18/2010 8:02 PM puneri lokashahi said:
पुणेरी माणसाने पुणेरी माणसांसाठी पुणेरी पद्धतीने मारलेले टोमणे. आणि त्यावर आलेल्या खास पुणेरी प्रतिक्रिया. वाचून मनोरंजन झाले. आधी वाटले काय हे अतृप्त आत्मे आहेत...मग विचार आला की हीच तर पुणेरी खसियत आहे! एका मल्टीप्लेक्स मध्ये सरळ जाउन नीट लावलेल्या पुस्तकांच्या शेल्फमध्ये हवे ते पुस्तक मिळाले तर ते मराठी पुस्तक कसले??
On 2/18/2010 7:53 PM Reader said:
Funny Comments :D As said by so many people.. ABC is the place where u can get most of the books. Make efficient and productive use of internet n google to search books Kale Saheb :)
On 18/02/2010 03:29 Ravikant said:
काळे साहेब, तुम्ही असा नका करू बोवा.. अपपा बळवंत मध्ये बरेच से काम होवून जाते, आणि संभाषणे तुमची स्वताची वाटत नाहीत.
On 2/17/2010 11:56 PM swati kadam said:
या लेखापेक्षा कॉम्मेंत्स वाचून जास्त मज्जा आली...लई भारी हय्त्या कोमेंट्स...
On 2/17/2010 10:43 PM Sangamnath, NJ, USA said:
ABC मध्ये कोणतीही पुस्तक अगदी सहज मिळतात, अगदी काल परवाच मी २००० ची मराठी पुस्तके आणली आहेत...जरा अत्तीच केल आहे लेखात हेच खर..
On 2/17/2010 9:57 PM Ashwini said:
लेख चांगला लिहिला आहे पण खरा वाटत नाही. नेहेमी मराठी पुस्तक वाचणारा माणूस अप्प बळवंत चौकात जायचे सोडून प्रकाशकांच्या कडे जाईल...हे मला खरे वाटत नाही. डेक्कन वरच्या 'क्रॉसवरड' मध्ये सुधा तुम्हाला मीना प्रभूंची पुस्तके मिळाली असती . खूप exaggerate केला आहे लेख मध्ये.
On 2/17/2010 11:55 AM Parag said:
शेवटच्या दुकानाचे नाव लिहायला पाहिजे होते.
On 2/17/2010 11:48 AM trailblazer said:
मी पुण्यात आउट ऑफ प्रिंट पुस्तक शोधले मला ते प्रकाशकान कडे मिळाले . काही वाईट अनुभव आला नाही. मला पुस्तक मिळाले काहीही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. वाचून आश्चर्य वाटले. .
On 2/17/2010 10:09 AM KK,bangalore said:
बगुनाना अगदी बरोब्बर! तुमचा अभ्यास खरच चांगला आहे बर का ! मला पण लक्षात आले होते हे पण असे पुरावे नसते देता आले तुमच्या सारखे.
On 2/17/2010 9:38 AM @Bagunana said:
बागुनाना, अगदी बरोबर. मला पण आठवले डायलॉग आत्ता. तुमचा अभ्यास छान आहे बरे का.
On 2/16/2010 11:38 PM Bagunana said:
१) वय सुमारे 30 वर्षे. हातातल्या बोटांत 4-5 अंगठ्या आणि बोलताना त्याच्याशी कायम चाळा!----सखाराम गटणे वरून ढापलेले.२)त्यांनी त्यांच्या सहायिकेला सांगितलं. "अगं, त्यांना काय पाहिजे बघ!' ----नारायण. ३) मराठी पुस्तकांना "टायटल्स' म्हणतात, हा शोध मला लागला आणि इतर पुस्तके थिल्लर, म्हणजे मी चिल्लर हेपण समजलं.----मी आणि माझा शत्रुपक्ष. ४)आता हतबुद्ध व्हायची वेळ माझ्यावर होती.आता थक्क व्हायची पाळी माझ्यावर होती---- सखाराम गटणे. ५) व असच पुलांच साहित्य ढापून हे संवाद बनवले आहेत; अगदी चष्मा, जोखीम, इ.इ...
On 2/16/2010 11:01 PM Mumbaikar said:
If these comments are sample of how punekars deal with each other, then its totally beleivable that the author received crapy customer service. Pune is famous for that.
On 2/16/2010 10:18 PM ek wachak said:
असे वाटते लेखकाकडे भरपूर वेळ आहे उगीच वाया घालवायला. अ ब सी मध्ये गेला असतात तर ह्या सगळ्या वेळात अजून २ पुस्तके वाचून झाली असती. आणि आमचाही वेळ वाचला असता. सकाळ उगीच काहीतरी छापू नका.
On 2/16/2010 6:10 PM ramataram said:
अरे हो एक राहिलंच. तुम्ही नेहेमी परदेशी जाता म्हणे. छान. अधून मधून इकडेही येत चला.
On 2/16/2010 3:18 PM KK,Bangalore said:
गरीबांचा पु.लं हि उपाधी तुम्हाला देत आहे तमाम मराठी रसिकांच्या वतीने या वर नाटक बसवलेत तर पुस्तकशोधसम्राट आचार्य काळे असे पण नाव देऊ. एवढी विदारक परिस्थिती निश्चितच नाहीये. पण प्रसिद्धीचा हव्यास माणसाला स्वस्थ बसू देत नसावा.
On 2/16/2010 1:23 PM Sunit said:
त्यांच्यावर पुलंनी व्यक्ती आणि वल्ली मध्ये छान लेख लिहिला आहे.
On 2/16/2010 12:56 PM Sunit said:
त्या दुकानाचे नाव इंटरनेशनल बुक डेपो असून मालकांचे नाव "इंटरनेशनल दिक्षित" (पुलनी दिलेले) आहे.
On 2/16/2010 11:01 AM चेतन said:
इतरांप्रमाणे, जर तुम्ही बर्याच वेळा पुस्तके विकत घेता तर तुम्ही त्या दुकानामधूनच का नाही घेतली यावेळी पण? अंम, आता आले लक्षात. तुम्हाला कदाचित 'जोखीम' घ्यायची असेल नेत्र-पल्लवी बरोबर, हो ना, लबाड. अजून एक समाजकार्य सुचवितो, परदेश वारीनंतर पुस्तके पुन्हा घेऊन या भारतात आणि एखाद्या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या ग्रंथालयाला भेट द्या. फार आनंद मिळेल. येताना वजनाचा प्रोब्लेम येणार नाही, कारण पुस्तके (२-३ तरी) तुम्ही हातात घेऊ शकता. शेवटी, लेख छान आहेच.
On 2/16/2010 9:31 AM Vishal, Chennai said:
किती जोशी, कुलकर्णी, पाटील, बर्वे, पाटकर इत्यादी ओरिसात जातील?.......... पण का जावे? aani je jatat te tumchya sarkhee prasadhee karat nahee (मी परदेशी प्रवास करताना आवर्जून मराठी पुस्तके घेऊन जातो, विमानात मिरवतो, वाचतो )
On 2/16/2010 6:55 AM NK, Sadashiv Peth, Pune-30 said:
लेखकांच्या लेखनशैलीवर पुल देशपांडे यांचा प्रभाव दिसत आहे.... सर्व तोंट्स पुलंचेच आहेत. छान! मराठीला नवीन पुलं मिळाल्याबद्दल मराठी चे अभिनंदन!
On 2/16/2010 3:39 AM चतुरंग said:
काळे साहेबांना आलेला अनुभव बाकीचे लोक नाकारू कसे शकतात? गम्मतच आहे! शेवटच्या पुस्तकाच्या दुकानाचे नाव 'इंटरनेशनल बुक सर्विस' डेक्कन जिमखाना, पुणे असे आहे. अतिशय उत्तम दुकान आहे. काळे साहेबांनी दुकानाचे आणि त्याच्या मालकांचे नाव (मला आठवत नाहीये नाहीतर मीच सांगितले असते) का सांगितले नाही हे समजत नाही. चांगला अनुभव असेल तर आवर्जून नाव सांगायला हवे असे वाटते.
On 2/16/2010 3:39 AM kalika said:
लेख थोडा काल्पनिक वाटतो. मला पण सगळीच पुस्तके अप्पा बळवंत मध्ये मिळतात असे नाही. काही पुस्तकाचं प्रकाशन बंद झालेले असतं. त्यामुळे असा अनुभव कधी कधी येतो.
On 2/16/2010 1:26 AM Neha said:
काहीही!!..मला पण कधीतरी एखादं पुस्तक शोधायला त्रास झाला आहे..पण तुम्ही खूपच exaggerate करून लेख लिहिलाय! चूक तुमची आहे सर्वात प्रथम अप्पा बळवंत चौकात गेला असतात तर इतकं हिंडण्याची वेळच आली नसती.. अर्थात प्रकाशन संस्थांच्या कार्यालयात जे "उत्साही" वातावरण असते ते मात्र छान उभे केले आहे!
On 2/16/2010 12:58 AM शिरीष said:
अहो काळे, तुमचे नाव जर "पुरुषोत्तम"नसते तर मी आणखी काही बाही लिहिले असते. आमच्या "वसंतराव काळे" यांच्या वडिलांचे पण नाव "पुरुषोत्तम" आहे ना! पण ते असे नव्हते राव! पुस्तक मिळत नाही म्हणजे काय? उद्या तुम्ही पुन गाडगीळांच्या दुकानात फरसाण मागाल हो! मिळणार कसे? नेहमी कोणती पुस्तके घेता? कुठून घेता? मग याच वेळी इतर ठिकाणी घेण्याची दुर्बुद्धी का झाली तुम्हाला ? का उगाच आपलं पहायचं हिंडून? सकाळ ला पण मजा येते असले लेख "पहिल्या"पानावर छापायला !
On 2/15/2010 11:58 PM Unknown said:
India Book house is off of lakadi pool... I think he may be referring to that shop - which got him the books ! A very nice shop and really nice people ! Rest experience is very believable.. I had the similar experience for Marathi CDs as well... and PLEASE, no comments on why I buy CDs still :-)
On 15/02/2010 23:48 doctor said:
there are always exibitions of Marathi books organised by different organisarions, including the publishing companies (Akshardhara, Rajhans prakashan etc) regularly happening at Acharya Atre Sabhagraha. You get loads of choice and discount . I always buy books from there every time I am in India and have managed a huge collection! there are no issues related to the publisehers and you get all famous authours' several 'titles'! You can always stock them to take with you for the next trip!
On 2/15/2010 9:49 PM Ranjit said:
अरे रिकामटेकड्या ह्यावर एक नाटक पण बसव, तूझ्याकडे भरपूर संभाषण तयार आहेत,
On 2/15/2010 9:42 PM shilp said:
साहेब, थोडे डोके वापरले असते तर? लक्ष्मि रोड वर पुस्तके आणि आप्पा बळवंत चौकात साड्या शोधल्यावर दुसरे काय होणार? मी पण पुस्तके वाचतो - हो विकत घेऊन पण. पण असा प्रोब्लेम नाही येत कधी, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ABC चौकात सर्व पुस्तके मिळतात बरे का. उगीच असे काहीतरी लिहून पुण्याचे नाव बदनाम करू नका. आणि तुम्ही लिहिले कि तुम्ही नेहमीच पुस्तके घेऊन जाता - परदेशी जाताना हो, मग तुम्हाला माहित पाहिजे ना कोठे पुस्तके मिळतात ते. का उगीच मुक्तपीठ आहे म्हणून आणि लिहिता येते म्हणून काही पण लिहायचे,
On 2/15/2010 8:49 PM Shalaka Palkar said:
पुणे मध्ये नाही. परंतु कोल्हापूर मध्ये माझ्या घरच्यांना हा त्रास नेहेमी होतो. चांगल्या लेखकांची ऐतिहासिक पुस्तके पुणे (अ.ब.चौक) सोडून कुठेच मिळत नाहीत. पुणे मध्ये मात्र अत्रे सभागृह मध्ये भरणारे प्रदर्शन किंवा कुठलेही दुकानदार अगदी चांगले वागतात आणि त्य्नच्याकडे पुस्तक उपलब्ध नसतील तर आणून हि देतात...
On 2/15/2010 8:46 PM Ajay said:
तुम्ही जरा अति पाल्हाळ लावली आहे, आता तर पुण्यात ३-४ पुस्तकांची प्रदर्शने चालू असतात, तुमच्या गणेश खिंड रस्त्यावर "crossword" म्हणून दुकान आहे, तिथे मराठी करता लहान असला तरी वेगळा विभाग आहे, त्यांचा संग्रह एकदि काही वाईट नाही.
On 2/15/2010 6:21 PM Aparna Lalingkar said:
आम्हाला मराठी पुस्तक खरेदीला कधीच कोणताच प्रश्न उद्भवत नाही कारण आम्ही नेहमी अप्पा बळवंत चौक किंवा आचार्य अत्रे सभागृह टिळक रस्ता येथेच जातो. सगळी पुस्तके मिळतात. एखादे नसेल तर तिथले लोक माहिती सांगतात आणि प्रकाशक कडून आणून देण्याचे कबूल करतात. तुम्ही जे भाग नमूद केले आहेत ते प्राधान्याने अमराठी आणि अति उच्च वर्गातील मराठी (जे लोक मराठी फारच कमी वाचतात) असे भाग आहेत. म्हणून तुम्हाला तिथे मराठी पुस्तकांचे दुकान सापडणार नाही. पण cross word सापडेल.
On 2/15/2010 6:12 PM Janhavi said:
पुण्यात राहून अप्पा बळवंत चौक माहित नाही म्हणजे आश्चर्याच आहे. जरा लोकांकडे चौकशी तरी करायची होती!!!!
On 2/15/2010 5:18 PM Nitin Pande said:
pustak dukandarache नाव काय?
On 2/15/2010 3:14 PM sanjay said:
अहो महाशय, अशी कुठली मराठी पुस्तके हवी होती? जरा नवा सांगता का? तुम्ह्च्या ज्ञानात थोडी भर टाकतो. अत्रे सभागृघात बर्याच वेळा पुस्तक प्रदर्शन असते. तुम्हाला हवी ती पुस्तके मिळतात तिथे. अरे हो पण तुम्ही बर्याच वेळा परदेशात असता ना? तरीच!!!!!!!!!!!
On 2/15/2010 2:02 PM Madhura said:
A.B.C.(आप्पा बळवंत चौक) मध्ये गेला असतात तर एवढी संभाषण लिहावी लागली नसती...
On 2/15/2010 1:38 PM Mangesh said:
हे जरा अतीच वाटते बुवा ....असो !
On 2/15/2010 1:27 PM Ajinkya said:
काळे साहेबांनी लिहिलंय एवढी विदारक परिस्थिती निश्चितच नाहीये. पण प्रसिद्धीचा हव्यास माणसाला स्वस्थ बसू देत नसावा. आणि हो, आपण वर्षातून २-४ वेळा परदेशी जाता आणि पुस्तके भेट देता ह्याची नोंद घेण्यात आलेली आहे.
On 2/15/2010 12:08 PM XYZ said:
लेखकाला माहित नाही का मराठी पुस्तके कुठे मिळतात ? नशीब पुण्यात राहतात !!!! हे म्हणजे असे झाले साखर घेण्यासाठी दुकानात न जाता साखर कारखान्यात जाने माझी सकाळ पेपर ला Request आहे हे असे फालतू लेख देण्यापेक्षा २ पाने कमी द्या पुरवणीमध्ये
On 2/15/2010 11:51 AM Trusha said:
आम्हाला पण द्याल का दुकानाचे नाव आणि पत्ता ???
On 2/15/2010 11:27 AM Sunit said:
तुम्हाला आलेला अनुभवावरून विद्येच्या माहेरघरात काय आनंद आहे हे कळेल. हा अनुभव मलाही आला आहे. शेवटच्या दुकानाचे नाव लिहायला पाहिजे होते.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: