Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

अजय देवगण पुन्हा दिग्दर्शक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, May 23, 2010 AT 11:30 PM (IST)
आपले प्रॉडक्‍शन हाउस यशस्वीपणे चालविणाऱ्या अजय देवगणने प्रकाश झाबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. प्रकाश झाच्या "गंगाजल', "अपहरण' या चित्रपटांमधून अजयच्या कारकिर्दीला नवे वळण लाभले.

चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर अजय देवगणने "यू मी और हम' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. काजोलची भूमिका असलेल्या या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. मात्र, एक दिग्दर्शक म्हणून अजयच्या कामाचे कौतुक झाले. आता अजयने पुन्हा दिग्दर्शनाकडे वळण्याचे ठरवले आहे. यापूर्वी अजयने चांगली पटकथा मिळाल्यावर दिग्दर्शन सुरू करणार असल्याचे सांगितले होते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजयला चांगली पटकथा मिळाली आहे. महत्त्वाच्या चित्रपटांचे चित्रीकरण संपल्यानंतर तो या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरवात करेल.
या चित्रपटात भरपूर स्टंट्‌स पाहायला मिळणार आहेत. या वेळी केवळ समीक्षकांचे कौतुक नव्हे, तर बॉक्‍स ऑफिसवर यश मिळविण्याचा अजयचा मानस असेल.
प्रतिक्रिया
On 6/7/2010 6:59 AM Arjun said:
अगोदरचे सिनेमे ठीक होते. चांगलं काम करतोय. बेस्ट ऑफ लक!
On 6/5/2010 12:11 PM Amit said:
best of luck for your film....
On 6/3/2010 10:35 PM viraj jadhav said:
U have compleated wish. BEST OF LUCK
On 6/1/2010 6:41 PM Rohan said:
अजय तू खरच एक प्रतिभावान अक्टर आहेस तुजा ह्या नवीन कामगिरीसाठी शुभेचा
On 5/31/2010 11:04 AM Ashay said:
एक दम झकास................
On 5/29/2010 8:16 AM bhosale said:
BEST OF LUCK
On 5/28/2010 12:33 AM akira said:
तुझे पैसे तू उधळ ...
On 26-05-2010 23:38:31 pratap said:
येडा आहे १ नुम्बर चा, दिग्दर्शक बनून काय दिवे लावणार आहे? जाऊ द्या,सिनेमे तर मिळत नाहीच, मग घर कसे तरी चालवायला पाहिजे ना?
On 5/25/2010 11:20 PM BEST OF LUCK said:
BEST OF LUCK


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: