Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


मनोरंजन
संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा मुंबई  - आपला चित्रपट लोकप्रिय व्हावा, जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावा याकरिता प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी नवनवीन कल्पना राबवीत असतो. त्याकरिता काही निर्माते लाखो रुपये खर्च करायलादेखील मागे-पुढे पाहत नाहीत.

Friday, June 11, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई  - शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. सगळीकडे शेतीच्या कामाला जोर येत असतानाच शेतकऱ्यांना उभारी देणारा, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा आणि विशेष म्हणजे त्यांचे आत्मिक बळ आणि जिद्द वाढविणारा 'झिंग चिक झिंग' हा चित्रपट उद्यापासून (ता.10) सगळीकडे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शेतकऱ्यांनाच नाही तर सर्वसामान्यांना एक चांगला संदेश देण्यात आला आहे.

Thursday, June 10, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई -  'श्‍वास' या चित्रपटाचे निर्माते मोहन परब यांनी बनविलेल्या 'सेकंड इनिंग' या दुसऱ्या चित्रपटाची "हार्ट ऑफ लंडन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'साठी निवड झाली आहे. 10 ते 15 ऑगस्टदरम्यान हा महोत्सव लंडनच्या रॉयल ओक हॉटेलात पार पडणार आहे. नानी फिल्म्स प्रस्तुत आणि सेलेमन्स आर्टस्‌ मोहन परब यांनी "सेकंड इनिंग' हा चित्रपट बनविला होता. त्यांनी आणि रसिक सल्ला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. लेखन आणि दिग्दर्शन मोहन परब यांचेच होते.

Thursday, June 10, 2010 AT 12:15 AM (IST)

संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा मुंबई  - 'हर हर महादेव... जय भवानी...' असा एल्गार पुकारत मोगलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अख्ख्या जगासमोर ठेवण्यासाठी कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सरसावले आहेत. छत्रपतींच्या जीवनावर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांत एक भव्यदिव्य चित्रपट बनविण्याचे शिवधनुष्य पेलायला ते सज्ज झाले आहेत.

Wednesday, June 09, 2010 AT 12:45 AM (IST)

नोएडा - नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या "काईटस'च्या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेल्या मेक्‍सिकन अभिनेत्री बार्बरा मोरीला आत वेध लागले आहेत ते "किंग खान' सोबत चित्रपटात भूमिका करण्याचे. अनुराग बसू दिग्दर्शित व राकेश रोशन निर्मित "काईटस' या चित्रपटातील भूमिकेमुळे बार्बरा सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचा नायक ऋतिक रोशन यांच्या बरोबर या चित्रपटात चांगले सुर जुळल्याने बार्बराही सध्या खुशीत आहे.

Monday, May 24, 2010 AT 06:50 PM (IST)

श्रीपाद ब्रह्मे राकेश रोशनचे चित्रपट कायमच "परिपूर्ण मनोरंजना'ने भरलेले असतात. त्याचा नवा "काइट्‌स'ही त्याला अपवाद नाही. या वेळी राकेश रोशनने प्रथमच दिग्दर्शनाची धुरा स्वतः न सांभाळता बॉलिवूडच्या नव्या पिढीचा दिग्दर्शक अनुराग बसूकडं दिली. आणि या बदलाचं फळ राकेशला नक्कीच मिळालं आहे. राकेश रोशनच्या चित्रपटांत असणारं भव्यदिव्य, परिपूर्ण मनोरंजन आणि त्यात अनुरागनं टाकलेला "आत्मा' या संयोगाच्या जोरावर हा "पतंग' हवेवर जोरदारपणे स्वार झाला आहे.

Monday, May 24, 2010 AT 12:00 AM (IST)

आपले प्रॉडक्‍शन हाउस यशस्वीपणे चालविणाऱ्या अजय देवगणने प्रकाश झाबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. प्रकाश झाच्या "गंगाजल', "अपहरण' या चित्रपटांमधून अजयच्या कारकिर्दीला नवे वळण लाभले. चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्यानंतर अजय देवगणने "यू मी और हम' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. काजोलची भूमिका असलेल्या या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. मात्र, एक दिग्दर्शक म्हणून अजयच्या कामाचे कौतुक झाले.

Sunday, May 23, 2010 AT 11:30 PM (IST)

सोनिया गांधी यांच्या राजकीय वाटचालीशी साधर्म्य असणारा दिग्दर्शक प्रकाश झा यांचा "राजनीती' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे. हा चित्रपट वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संजय नलावडे राजकारणातल्या "बड्या' मंडळींच्या प्रेमात पडून त्यांचं बरं-वाईट कर्तृत्व मोठ्या पडद्यावर आणण्याचा उद्योग अनेक दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांनी केला आहे. या उद्योगात बऱ्यापैकी यश मिळविलेल्यांमध्ये प्रकाश झा यांचं नाव सध्या आघाडीवर आहे.

Sunday, May 23, 2010 AT 12:00 AM (IST)

महेश बर्दापूरकर मुळात सन्मार्गी असलेल्या मात्र परिस्थितीनं गुन्हेगार बनविलेल्या तरुणांची गोष्ट आपण मोठ्या पडद्यावर अनेकदा पाहिली आहे. राजन प्रभू यांची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि बरंच काही असलेला "मोस्ट वॉन्टेड' हा चित्रपट अशाच सात जणांची गोष्ट सांगतो. काहीसा गंभीर व बराचसा विनोदी असलेल्या या चित्रपटाची सुरवात व शेवट खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. मात्र, मधल्या भागात अनावश्‍यक प्रसंगांची मोठी मालिका चित्रपटाचा वेग कमी करते.

Sunday, May 23, 2010 AT 12:00 AM (IST)

अभिजित पेंढारकर माणूस बुद्धिजीवी असला, तरी "मना'नं खूप विचार करतो. मनाला झालेल्या जखमा बुद्धीच्या जोरावर भरून काढण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा या भरपाईच्या नादात दुसऱ्याला जखमा देतो आणि त्याच्या स्वतःच्या जखमा तशाच भळभळत राहतात... "रानभूल' हा अशाच एका "जखमी' कलाकाराच्या आयुष्यातल्या फरपटीचा प्रवास आहे. लोकेश साटम (सुबोध भावे) हा लहानपणापासून आई-वडिलांच्या प्रेमाला पारखा झालेला मुलगा.

Sunday, May 23, 2010 AT 12:00 AM (IST)

कोल्हापूर -  होमिओपथीवर आधारलेला "प्रतिसाद' ह चित्रपट येत्या 28 मे रोजी कोल्हापूरसह महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याची माहिती आज निर्माता डॉ. विजयसिंह निकम, अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी दिली. ते म्हणाले, 'मराठी चित्रपटांचा पुन्हा एकदा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. वैविध्यपूर्ण चित्रपट प्रदर्शित होत असून असाच वेगळ्या धाटणीतला 'प्रतिसाद' हा चित्रपट आहे. योगेश गोसावी यांचे दिग्दर्शन असून रोहित नागभिडे यांचे संगीत आहे.

Wednesday, May 19, 2010 AT 08:02 PM (IST)

नवी दिल्ली - आमीर खानच्या भूमिकेमुळे गाजलेल्या "थ्री - इडियटस्‌' चित्रपटाचा विशेष खेळ नुकताच अमेरिकेत न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सध्याच्या शिक्षण पद्धतीवर चर्चा करण्यात आली. विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि पटकथा लेखक अभिजात जोशी या वेळी उपस्थित होते.

Wednesday, May 19, 2010 AT 06:57 PM (IST)

नवी दिल्ली - हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आता 'ट्‌विटींग' सुरू केले आहे. ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या अमिताभ यांनी आता लघुसंदेशांद्वारे आपल्या भावना चाहत्यांपर्यंत पोचविण्यासाठी "ट्‌विटर'वर अकाऊंट सुरू केले. "मी आता ट्‌विटरवर आलो आहे. तुम्ही मला तिथेही फॉलो करू शकता.'' असे अमिताभ यांनी आपल्या "ब्लॉग'वर म्हटलेय. srbachchan या नावाने त्यांनी "ट्‌विटर'वर अकाऊंट सुरू केले आहे.

Tuesday, May 18, 2010 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - अभिनेता अजय देवगण कोणतीही भूमिका करू शकतो. त्यामुळेच त्याच्याबरोबर काम करताना विशेष आनंद होतो, असे मत दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केले. अजय देवगणची भूमिका असलेला राजनीती चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यापार्श्‍वभूमीवर बोलताना झा यांनी अजय देवगणचे कौतुक केले. अजय केवळ चांगला कलाकारच नाही, तर चांगला माणूसही आहे. त्यामुळेच आम्हा दोघांनाही एकत्रितपणे काम करताना मजा येते.

Monday, May 17, 2010 AT 01:50 PM (IST)

(दिलीप ठाकूर) मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबवरचा चित्रपट पुढच्याच आठवड्यात प्रदर्शित होतो आहे. यापूर्वीही गुन्हेगारी प्रवृत्तींवर चित्रपट तयार करण्यात आले आहेत. असे चित्रपट बनवावेत का, त्यामागे काय भूमिका असते... चर्चा. "कुख्यात व्यक्तीवरील चित्रपट' हादेखील एक ट्रेण्ड आहे... पण क्रूरकर्मा कसाबवर आधारित "अशोकचक्र' हा चित्रपट 28 मे रोजी झळकत असताना, अशा प्रकारचे चित्रपट नेमके काय साध्य करतात, असा प्रश्‍न पडतो.

Friday, May 14, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या "आरक्षण' या आगामी चित्रपटात भूमिका करण्याची शक्‍यता आहे. हा चित्रपट राखीव जागांच्या विषयावर आधारित असेल. बिग बीनच आपल्या ब्लॉगवर ही माहिती दिली आहे. प्रकाश झा यांनी काल त्यांची भेट घेऊन या चित्रपटाबाबत चर्चा केली. सध्याची शिक्षण पद्धती आणि मागास समाजाला संरक्षण देण्यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

Wednesday, May 12, 2010 AT 12:00 AM (IST)

बंगळूर - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या माझ्या आदर्श आहेत. संधी मिळाल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारायला आवडेल, अशी इच्छा अभिनेत्री कतरिना कैफ हिने व्यक्त केली आहे. प्रकाश झा दिग्दर्शित "राजनीती' या आगामी हिंदी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कतरिना येथे आली होती. "सोनियांनी आतापर्यंत जे मिळवले आहे, ते निश्‍चितच प्रेरणादायी आहे. त्यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळाल्यास मी उडी मारून त्याचा स्वीकार करीन.

Tuesday, May 11, 2010 AT 06:54 PM (IST)

पुणे -  मराठी चित्रपटाचा जागतिक स्तरावर मोठा "प्रीमिअर शो' करण्याचा मान "टार्गेट' या चित्रपटाने नुकताच पटकाविला. दुबईमधील "ग्रॅंड सिनेप्लेक्‍स' मल्टिप्लेक्‍समध्ये झालेल्या त्याच्या खेळाला मोठा प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपट परदेशांमधील प्रेक्षकांनाही पाहता यावा, या उद्देशानेच दुबईत त्याचा "प्रीमिअर शो' ठेवून तिथे चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस निर्माते जगदीश उणेचा यांनी व्यक्त केला.

Sunday, May 09, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई -  मराठी मालिका अन्‌ चित्रपटांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. मराठीतील प्रतिभावंत कलावंतांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही मराठी कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. आता त्यापाठोपाठ ऍनिमेशन क्षेत्रातही मराठी पाऊल पुढे पडले आहे. "फ्रेमफ्लिक्‍स ऍनिमेशन अवॉर्ड'च्या पहिल्या दहा नामांकनामध्ये मराठी तरुणांच्या तब्बल चार ते पाच "ऍनिमेशन शॉर्टफिल्म' दाखल झाल्या आहेत.

Saturday, May 08, 2010 AT 12:00 AM (IST)

(संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा) मुंबई -  "पवित्र रिश्‍ता' या मालिकेत मराठी कुटुंबाची व्यथा मांडणाऱ्या तसेच अंकिता लोखंडे या मराठी मुलीला महत्त्वपूर्ण ब्रेक देणाऱ्या एकता कपूरला तमाशाप्रधान मालिकेसाठी एखादी मराठी मुलगी न मिळाल्याबद्दल टीव्ही इंडस्ट्रीत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Saturday, May 08, 2010 AT 12:00 AM (IST)

(संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा) मुंबई -  न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावली असली तरी "बॉलीवूड'नं कसाबला फाशीची शिक्षा कधीच सुनावली आहे. या घटनेवर पूर्ण झालेल्या "अशोकचक्र ः ट्रिब्यूट टू रिअल हिरोज' या चित्रपटाच्या कथानकात कसाबला फाशी देण्यात आली आहे. चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगानं अशा प्रकारचा शेवट करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.

Friday, May 07, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई  - हॉलीवूडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी बॉलीवूडला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्यामुळे ते तंत्रज्ञान आपल्याही चित्रपटात वापरण्याचा आटापिटा अनेक भारतीय करताना दिसतात. अनेक हिंदी चित्रपटांत हॉलीवूडचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. आता हॉलीवूडमध्ये ऍनिमेशनपटांसाठी सर्रास वापरण्यात येणारे थ्रीडी डिजिटल ऍनिमेशन तंत्रज्ञान भारतात येणार आहे. "बाल हनुमान- 2' हा चित्रपट याच तंत्राचा वापर करून बनविण्यात आला आहे.

Friday, May 07, 2010 AT 12:00 AM (IST)

(संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा) मुंबई  - मराठी चित्रपट राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी करीत आहेत. एकेका हिंदी चित्रपटासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत परंतु काही मिनिटांमध्ये महत्त्वाचा संदेश देणाऱ्या शॉर्ट फिल्म्स्‌ना भारतात मुख्य बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शॉर्ट फिल्म बनविणारे अनेक निर्माते-दिग्दर्शक मंडळी नाराज आहेत. भविष्यात शॉर्ट फिल्म बनवायच्या की नाहीत या विचारात ही मंडळी पडली आहेत.

Thursday, May 06, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - शाहीद कपूर आणि प्रियांका चोप्रा यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याचे मध्यंतरी बोलले जात होते. परंतु, ते खोटे आहे असे दिसत आहे. त्यांच्यामध्ये अजूनही काही तरी प्रेमाची खसखस पिकत असल्याची चर्चा आहे आणि याला आता निमित्त ठरले आहे ती त्या दोघांची गोवा टूर. खरे तर ते दोघेही गोव्याला एन्जॉय करण्यासाठी गेले होते. प्रियांका आपल्या मैत्रिणींबरोबर तर शाहीद आपल्या मित्रांबरोबर गेला होता.

Wednesday, May 05, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - कधी हिट कधी फ्लॉप....प्रत्येक कलाकाराला चित्रपटांत काम करीत असताना या व्यूहचक्रातून जावे लागते. कोणताही कलाकार किंवा निर्माता-दिग्दर्शक हिट चित्रपटाचा फॉर्म्युला सांगू शकत नाही. त्यामुळे कधी कधी एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही कलाकारांना टेन्शन येते. आता असाच ताण अभिषेक बच्चनला आला आहे.

Tuesday, May 04, 2010 AT 12:00 AM (IST)

आमीर खान २ मे ला पॅरिसमध्ये होता आणि आता पाच तारखेला लंडनला जाणार आहे. पॅरिसमध्ये तो चाहत्यांना भेटला. त्यासाठी त्याने ब्लॉगवरून खुलं निमंत्रण दिलं होतं. एकाच वेळेला पाच जणांच्या गटाशी संवाद साधण्याचं त्यानं ठरवलं होतं. आपल्या सर्व चाहत्यांना भेटण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळेच यापूर्वी न भेटलेल्या चाहत्यांना तो या वेळेला भेटला. लंडनमध्ये मात्र कामातून वेळ काढता येणार नसल्याने तो चाहत्यांना भेटू शकणार नाही.

Monday, May 03, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - झोया अख्तर दिग्दर्शित "जिंदगी मिलेगी ना दोबारा' या आगामी चित्रपटातून आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि हृतिक रोशन यांची जोडी प्रथमच प्रेक्षकांना पडद्यावर पहायला मिळणार आहे. याविषयी बोलताना कॅटरिना म्हणाली, "मी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार, सलमान खान, रणबीर कपूर यांच्याबरोबर काम केले आहे. आता मला हृतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी मिळत असल्याने उत्साहित आहे.

Tuesday, April 27, 2010 AT 03:08 PM (IST)

(प्रमोद प्रभुलकर) तन्मयतेनं, श्रद्धा ठेवून, कलात्मक जाण ठेवून जी व्यक्ती निर्माता होते त्याला यश मिळण्याची शक्‍यता जास्त असते. असा निर्माता चिवट असेल, तर त्याला एक-दोन निर्मितीनंतर भला मोठा "जॅकपॉट' "बॉक्‍स ऑफिस'वर लागतोच लागतो. तेव्हा नुसता पैसे असलेल्या लोकांनी चित्रपट निर्मितीत उतरू नये, तर कलारसिक जिगरबाज लोकांची इथे गरज आहे. अशा निर्मात्यांचा योग्य आदर राखत त्यांची लूट न करणं महत्त्वाचं आहे. असे निर्माते टिकले पाहिजेत... सिनेमा' बनवणं.

Monday, April 26, 2010 AT 12:00 AM (IST)

(विजय शिंगोर्णीकर) (गोल्डन फ्लॅशबॅक- एप्रिल-१९६०) भूतकाळातल्या आठवणींमध्ये जाऊन रंगायला कोणाला आवडत नाही? या आठवणी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातल्या म्हणजे अगदी "सिक्‍स्टीज'मधल्या असतील तर मग विचारायचीच सोय नाही. "प्रीमियर' आता तुम्हाला थेट ५० वर्षं मागं नेऊन हिंदी चित्रपटसृष्टीचा "गोल्डन फ्लॅशबॅक' घडविणार आहे. अर्ध शतकापूर्वी याच महिन्यात आपल्या फिल्म इंडस्ट्रीत घडून गेलेल्या वैविध्यपूर्ण आणि रोमहर्षक घटनांचा हा धांडोळा.

Monday, April 26, 2010 AT 12:00 AM (IST)

नागपूर -  'हे चिखलदरा आहे? अम्मेझिंग यार... फॉरेनमधले लोकेशन वाटतेय चक्क! आणि हे काय, आपल्या नागपुरातले सेमिनरी हिल्स... जबरदस्त! अब्बे यार, हे बघ, सोनेगावचा मेघदूत व्हिला. पिक्‍चरमध्ये काय सही दिसते यार...' अशी चर्चा आज अलंकार चित्रपटगृहात ऐकू येत होती. ज्या भागात आपण नेहमी फिरतो, जे चिखलदरा आपले हक्काचे 'पिकनिक स्पॉट' आहे, ते ग्लॅमसरीत्या पडद्यावर अवतरणे नागपूरकर व वैदर्भीयांना सुखावून गेले.

Saturday, April 24, 2010 AT 12:45 AM (IST)

'यंदा कर्तव्य आहे' या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेला एक सुंदर चेहरा म्हणजे स्मिता शेवाळे. अल्पावधीतच या नाजूक चणीच्या मुलीनं "माहेरची साडी', "सावित्री', "चारचौघी', "सप्तपदी' अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय. "प्रीमियर'च्या वाचकांसोबत स्मिता खास "शेअर' करतेय तिचे "ब्यूटी सिक्रेट'... सकाळी उठल्यावर लगेचच मी काही खात नाही. आंघोळ वगैरे झाल्यावर मी एक ग्लास दूध पिते. त्याबरोबर कॉर्नफ्लेक्‍स, मुसली असं काहीतरी खाते.

Friday, April 23, 2010 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: