Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


मुंबई
मुंबई - सकाळ मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ बातमीदार जनार्दन डी. पाटील (वय ५०) यांचे आज सकाळी काविळीच्या विकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान ते कोमात होते. दुपारी साडेबारा वाजता वरळी कोळीवाड्यातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुन्हेगारीसंदर्भातील उत्कृष्ट बातम्यांबद्दल गेल्या वर्षी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे गौरविण्यात आले होते.

Tuesday, June 15, 2010 AT 06:49 PM (IST)

मुंबई - बऱ्याच वर्षांत शाळेचा पहिला दिवस अन्‌ पावसाच्या सरी एकत्र बरसल्या नाहीत पण यंदा मात्र पावसाने आपली वेळ पाळली आणि चिमुकल्यांच्या नव्या-कोऱ्या छत्र्या अन्‌ रेनकोटवर आपल्या आठवणींची सर पहिल्याच दिवशी देत हुकलेला योग आज अखेर साधला. ढगांचा गडगडाट व विजेसह दमदार पाऊस काल रात्रीपासून सुरू झाला. पाऊस आज सकाळी जोर धरेल, असे वाटत नव्हते पण सायंकाळी पावसाने दमदार एन्ट्री करीत उन्हाळी सुटीनंतर साखरझोपेतून उठलेल्या शाळकरी मंडळींना गारवा दिला.

Tuesday, June 15, 2010 AT 01:14 AM (IST)

डोंबिवली - महाराष्ट्रात प्रथमच 55 वर्षांची आई उद्या आपल्या बाळाला जन्म देणार आहे. डोंबिवलीतील डॉक्‍टर संदीप माने यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेचे हे फलित असून त्याची फलनिष्पती होणार आहे. ठाण्यातील द ओरिजिन फर्टिलिटी सेंटरमध्ये मागील दहा ते बारा महिन्यांपूर्वी सायली नावाच्या महिलेवर शस्त्रक्रिया करून टेस्टट्युब बेबीचा प्रयोग करण्यात आला.

Tuesday, June 15, 2010 AT 01:10 AM (IST)

मुंबई - जुहू येथे समुद्रात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. येत्या दोन महिन्यांत लाईफ गार्डस्‌ची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. समुद्रकिनारे आरोग्य विभागाकडून काढून अग्निशमन दल विभागाकडे सोपविण्यात आले असून दलाकडच्या 170 जवानांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईतील सात समुद्रकिनाऱ्यांवर फक्त चार लाईफ गार्डस्‌ आहेत.

Tuesday, June 15, 2010 AT 01:09 AM (IST)

मुंबई - सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत वर्गखोल्या, स्वच्छतागृहे व अन्य बांधकामांची जबाबदारी मुख्याध्यापकांकडून काढून घेऊन सरपंच किंवा पंचायत समितीकडे सोपवावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघ व राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. या मागणीसाठी वारंवार निवेदने व आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. आता तरी हे गांभीर्याने घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. कौडगाव (ता.

Tuesday, June 15, 2010 AT 01:04 AM (IST)

शर्मिला कलगुटकर - सकाळ वृत्तसेवा मुंबई - विविध शिबिरांच्या माध्यमातून आवाहन करून रक्तदान करणारे शहरांतील रक्तदाते आता वैयक्तिक यश किंवा सणवार साजरे करताना रक्तदान शिबिरांचा मुहूर्त साधू लागले आहेत. लग्नांचा वाढदिवस, आपल्या चिमुकल्याचा जन्मदिवस, मुंजी, इतकेच नव्हे, तर लग्नाची हळद, स्वातंत्र्यदिन, गणराज्यदिनासारख्या दिवशीही मोठ्या प्रमाणात आता सामान्य मुंबईकर रक्तदान शिबिर भरवू लागला आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 01:02 AM (IST)

मुंबई - जनगणनेचे मुंबईत 87 टक्के काम पूर्ण झाले असून काम टाळणाऱ्या दोन हजार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी आज दिली. पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात जनगणनेचे सर्वाधिक काम झाल्याचेही त्यांनी सांगितले. जनगणनेचे काम टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी महापालिका राज्य आणि केंद्र सरकारला पाठविणार असून कारवाईचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 01:00 AM (IST)

मुंबई - "सीबीआय' अधिकारी असल्याची बतावणी करून हैदराबादच्या उद्योजकाकडून 10 लाखांची लाच मागणाऱ्या तिघांना "सीबीआय'च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. अटक केलेल्या दोघांना पुण्यात सापळा रचून पकडण्यात आले असून, त्यातील एकाला इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक्‍स स्टडीज - दिल्ली या संस्थेने "उद्योगरत्न' पुरस्कार दिला होता.

Monday, June 14, 2010 AT 05:57 PM (IST)

डोंबिवली - येथील पूर्व भागातील देसलेपाडा भोपर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पतीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:57 AM (IST)

मुंबई - मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढू लागला असून तहानेने व्याकुळ झालेल्या मुंबईकरांना पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तलावांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पाऊस लवकरच दाखल झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत पंधरा टक्के पाणीकपात सुरू आहे. या कपातीने मुंबईच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे पाऊस कधी सुरू होईल याकडे मुंबईकरांचे डोळे लागले होते.

Tuesday, June 15, 2010 AT 12:44 AM (IST)

मुंबई - "इलू इलू'गर्ल मनीषा कोईराला आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या 18 जूनला तिचा विवाह आपल्या वयापेक्षा सात वर्षांनी छोट्या असलेल्या व्यावसायिक सम्राट दहेलशी लागणार आहे. हा विवाह पारंपरिक नेपाळी पद्धतीने पार पडेल. मनीषा कोईराला आणि दहेलची मैत्री गेल्या एक वर्षापासून आहे. काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाने त्याच्या विवाहाची तारीख निश्‍चित केली होती मात्र त्यानंतर ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

Tuesday, June 15, 2010 AT 12:54 AM (IST)

योगेश पवार - सकाळ वृत्तसेवा मुंबई - आजवर केवळ महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत धावणाऱ्या ऑटो रिक्षांना आता एमएमआरडीए क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागात मुक्त संचार करण्याचा परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन खात्याने घेतला आहे. त्यामुळे जुलैपासून मुंबईतील रिक्षांना अगदी खोपोली, पेणपर्यंत प्रवासी वाहतूक करता येणार आहे. रिक्षांना नगरपालिका आणि महापालिकांच्या हद्दीत प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना होता.

Tuesday, June 15, 2010 AT 12:53 AM (IST)

मुंबई - मुलीसारखा दिसत असल्याचे चिडविल्याने कांदिवली पश्‍चिमेला काचेच्या तुकड्याने भोसकून दोघा जणांच्या झालेल्या खूनप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. न्यू लिंक रोडवर आलूज कॅफे हॉटेलसमोर असलेल्या नंदनवन बिल्डिंगमध्ये काल (ता.13) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाला होता. लांब केस वाढविल्याने मुलीसारखा दिसत असल्याचे चिडविल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला.

Tuesday, June 15, 2010 AT 12:49 AM (IST)

योगेश पवार - सकाळ वृत्तसेवा मुंबई - सर्वशिक्षा अभियानापूर्वी केंद्र सरकारने शिक्षणाचे वैश्‍वीकरण करण्यासाठी 1986 मध्ये "ऑपरेशन ब्लॅक बोर्ड' ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या शैक्षणिक साहित्याच्या वापराचे गुरुजींना प्रशिक्षण नसल्याने विद्यार्थ्यांचीही पाटी कोरी राहिली. वर्गखोल्या बांधणीतील भ्रष्टाचाराचे ग-म-भ-न इथूनच सुरू झाल्याने सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली.

Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - सतरा वर्षांपूर्वी घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्याला येत्या शनिवारपर्यंत (ता. 19) सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश आज विशेष सीबीआय न्यायालयाने दिले. भारतामध्ये हत्यारे निर्माण करण्याची फॅक्‍टरी सुरू करण्याचा ताहीरचा कट होता, असा दावा आज सीबीआयच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. ताहीरला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अबूधाबीहून ताब्यात घेतले होते.

Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई - अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सक्ती पुढील वर्षापासून लागू करण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असून, यंदाची तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया गेल्यावर्षीप्रमाणेच होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया 21 किंवा 22 जूनपासून आणि औषधनिर्माणशास्त्राची प्रवेशप्रक्रिया 5 जुलैपासून सुरू होईल, असे प्रभारी तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांनी "सकाळ'ला सांगितले.

Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)

विरार - वसईत आज पडलेल्या जोरदार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना पावसाने सुखद धक्‍का दिला तसेच शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसत होते.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - मुंबईतील गिरण्यांच्या जागेवर बांधलेल्या घरांसाठी गिरणी कामगारांना साडेदहा लाख रुपये भरावे लागणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या या धोरणाला गिरणी कामगारांनी विरोध केला असून, सरकारने ही घरे मोफत द्यावीत, अशी मागणी मुंबई गिरणी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. गिरणीमालकांनी कामगारांना देशोधडीला लावले आहे शिवाय येथील गिरण्यांच्या जागांवर मोठमोठ्या इमारती बांधून त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - फटाक्‍यांची तुफान आतषबाजी... ढोल, ताशे, झांजांचा दणदणाट... पेढे, मिठाई, केक, पुष्पगुच्छांची रेलचेल आणि कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष... मराठी तरुण हृदयसम्राट आगे बढो...च्या जयघोषाने शिवाजी पार्कातील "कृष्णकुंज'चा परिसर आज दणाणून गेला होता. हे चित्र होते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे. मुंबईसह राज्यभरातील हजारो कार्यकर्त्यांनी राज यांचा वाढदिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

मिरा रोड - लोकलच्या टपावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ओव्हरहेड वायरचा जबरदस्त शॉक बसून तो 80 टक्के भाजल्याची घटना आज सकाळी भाईंदर स्थानकात घडली आहे. भाईंदर पूर्वेकडील सुरेश पुजारी (वय 39) हा आज सकाळी भाईंदर स्थानकात 9 वाजून 50 मिनिटांची गाडी पकडण्याचा प्रयत्नात होता मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने सुरेश याने गाडीच्या टपावर चढायचा प्रयत्न केला. या वेळी तो ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याने वायरलाच चिकटला.

Tuesday, June 15, 2010 AT 12:33 AM (IST)

मुंबई - चार वर्षांपूर्वी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट खटल्यातील तेरा आरोपींना आज विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यापैकी बारा आरोपींसाठी तीन वकील नियुक्त झाले आहेत. अफजल शेख, अली बशीर खान, मोहम्मद अली, माजीद शफी, साजीद अन्सारी, कमाल अन्सारी, एहत्तेशाम सिद्दीकी, जमीर शेख, सोहेल शेख, मुजम्मिल शेख, तन्वी अन्सारी, नावेद हुसेन व अब्दुल शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींवर मोक्कानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायमूर्ती वाय. डी.

Tuesday, June 15, 2010 AT 12:32 AM (IST)

कर्जत - पोटगी, घटस्फोट, महिलांचा कुटुंबीय छळापासून संरक्षण, नवरा-बायको एकत्र किंवा वेगळे राहणे, मुलीचा छळ करतात, मुलगा, सासू-सासऱ्याविरुद्ध खटला, असे दावे न्यायालयात नेहमीच येत असतात. मात्र कर्जत येथील योगेश थोरवे याने आपली पत्नी मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतची घटना अशी- कर्जतजवळील भिसेगाव येथे राहणारा योगेश थोरवे याचे कर्जतच्या बाजारपेठेत राहणाऱ्या रीना सरदारमल ओसवाल या मुलीबरोबर सहा वर्षांपासून प्रेमसबंध होते.

Tuesday, June 15, 2010 AT 12:27 AM (IST)

मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकासांतर्गत तयार इमारत पाहणीवेळी दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी सांताक्रूझ येथील नगरसेवक मोहन लोकेगावकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून लोकेगावकर फरारी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली. शास्त्रीनगर येथे काल (ता.13) दुपारी हा प्रकार घडला. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत नवीन इमारत बांधण्यात आली आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:22 AM (IST)

संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा मुंबई - तुम्हाला कथा-पटकथा, तसेच संवादलेखनाविषयी काही माहिती आहे का? उत्तम व दर्जेदार कथा तुम्ही निवडू शकता का? मग अजिबात वेळ घालवू नका. कारण- तुमच्यासमोर एक चांगली संधी चालून आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत "परफेक्‍शनिस्ट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानने अशा प्रकारची अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे. दर्जेदार व गुणवत्ताप्रधान "स्क्रिप्ट' निवडण्यासाठी आमीर खान तज्ज्ञ व्यक्तींचा शोध घेत आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:21 AM (IST)

मुंबई - नौदलाच्या "आयएनएस हमला' येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या लखमीचंद गुलाबसिंग (वय 19) या कॅडेटचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. मैदानात "रोप क्‍लायबिंग'चा सराव सुरू असताना काल सकाळी ही घटना घडली. त्याचा मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची मालवणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तो महिन्यापूर्वी हरियानातून आला होता.

Tuesday, June 15, 2010 AT 12:17 AM (IST)

गोरेगाव - कॉंग्रेसचे आर. आर. पिल्ले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गोरेगाव (प.) येथील जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस, सेना-भाजप युतीच्या उमेदवारांबरोबर मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने येथे चौरंगी सामना होणार असल्याचे दिसते. सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आर. आर. पिल्ले यांचे निधन झाले. त्यामुळे येथे रविवारी (ता.27) पोटनिवडणूक होत आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

संदीप पंडित - सकाळ वृत्तसेवा विरार - वसई-विरार महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर साऱ्यांचे लक्ष आता प्रभाग समित्यांकडे लागले असून प्रभाग समित्यांवरून पालिकेत वाद रंगण्याची चिन्हे आहेत. प्रभाग समितीवर वर्चस्व मिळविण्यासाठी जनआंदोलन समिती प्रयत्नात असतानाच प्रभाग समित्या पाच की सहा, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर सर्वाधिक 61 जागा घेऊन बहुजन विकास आघाडी सत्तेवर आली आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

कल्याण - प्रमाणबद्धता हा कलेचा आत्मा असतो. संगीत असो किंवा शिल्पकला हे या दोन्ही कलाप्रकारांना लागू पडते. भाऊ साठे हे जागतिक कीर्तीच्या शिल्पकारांच्या तुलनेत कुठल्याच बाबतीत कमी नाहीत. त्यांची शिल्पकला मायकेल ऍन्जोलो आणि टर्नरच्या तोडीची आहे, असे गौरवोद्‌गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे काढले. "आम्ही कल्याणकर' या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी "कल्याण भूषण पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन अत्रे रंगमंदिरात केले होते.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाऊचा धक्‍का ते मांडवा दरम्यान लवकरच फेरीबोट सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला असून याला लवकरच परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने आधीच या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखविल्यामुळे एमएसआरडीसीला मागे टाकत एमएमआरडीए आधी मुंबईत जलवाहतूक सुरू करणार असे दिसते. पुढल्या एक ते दीड वर्षांत या सेवेला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

उरण - अंधेरी येथील एका एंजटने परदेशी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या तरुणांमध्ये उरण येथील तबरेज शेख याचाही समावेश आहे. त्याची फसवणूक झाल्याची तक्रार त्याची पत्नी आणि वडिलांनी केली असून भारत सरकारने त्याला परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अंधेरी येथील दिशा इंटरनॅशनल या एंजट कंपनीच्या माध्यमातून उरण येथील तबरेज शेख हा वाहनचालकाच्या नोकरीसाठी आबूधाबी येथे गेला.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

तुर्भे  - तुर्भे स्टोअर्स, हनुमाननगर, इंदिरानगर येथे असणाऱ्या झोपड्या तोडून त्या ठिकाणी रहिवाशांसाठी टॉवर बांधण्यात येतील, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी येथे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने तुर्भे स्टोअर्स येथे कार्यकर्त्यांचे शिबिर झाले. सतत होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर देताना गणेश नाईक म्हणाले, नागरिकांना संजीव नाईक, संदीप नाईक हवे आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत ते लोकांचे प्रश्‍न सोडवीत असतात.

Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: