|
|
|
|
|
|
पुणे - दारूच्या नशेत गाडी चालवून चार तरुणांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला उडविल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी सातच्या सुमारास सूस रस्त्यावर घडली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. चतुश्रुंगी पोलिसांनी चारही तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. शिवराज सिद्धराम म्हेत्रे (वय २४), हरिश सुरवसे (वय २३), स्वप्नील कोटा (वय २१), उमेश चव्हाण (वय २३) अशी या तरुणांची नावे आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:12 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे शहर व परिसरात १४ जून रोजी सांयकाळी धो धो पाऊस झाला. पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांना नद्या-नाल्यांचे स्वरूप आले, त्यात अनेक वाहने वाहून गेली, त्यापेक्षा अधिक वाहने बंद पडली आणि रात्री उशिरापर्यंत शहराच्या बहुतेक भागांत वाहतुकीची कोंडी झाली होती. 'ई सकाळ'च्या वाचकांनी हा पाऊस आपापल्या नजरेने कॅमेऱयात पकडला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला....! ही झलक या पावसाची...पहिल्या पावसाची...!!   पु. ल.
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - स्वाईन फ्लूवरील लसीचे ३४, ३०० डोस आतापर्यंत राज्याला केंद्र सरकारने पुरविले आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांशी सातत्याने संपर्कात असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना आणि कर्मचाऱ्यांना या लसीची मात्रा देण्यात आली आहे. ही लस सामान्य नागरीकांना आतापर्यंत उपलब्ध झालेली नाही. अहमदाबादच्या "कॅडिला हेल्थकेअर'ने स्वाईन फ्लूवरील लसीचे उत्पादन सुरू केले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही स्वतंत्रपणे लस उत्पादन केलेले आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 11:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - राज्याच्या बहुतेक भागांत आगेकूच करणाऱ्या मोसमी पावसाने सोमवारी पुण्यातील पायाभूत सुविधांची जणू परीक्षाच घेतली. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले. रस्त्यांना नद्या-नाल्यांचे स्वरूप आले, त्यात अनेक वाहने वाहून गेली, त्यापेक्षा अधिक वाहने बंद पडली आणि रात्री उशिरापर्यंत शहराच्या बहुतेक भागांत वाहतुकीची कोंडी झाली. रात्री साडेआठपर्यंत पुण्यात 99.1 मिलिमीटर पाऊस झाला.
Tuesday, June 15, 2010 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - सुमारे दोन तास पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी संध्याकाळी पुणेकरांना अक्षरशः 'धुवून' काढले. संध्याकाळी चारच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. सुरवातीपासूनच पावसाचा जोर जास्त होता. पावसाळी ढगांमुळे संपूर्ण शहर अंधारून गेले होते. साडेचार पासून पावसाचा जोर वाढत गेला. त्यानंतर सुमारे दीड तास पाऊस एकसारखा मुसळधार कोसळत होता. महापालिकेने केलेल्या 'पावसाळी' कामांचेही पावसाने धिंडवडे काढले. शहराच्या मध्यवर्ती भागाला पावसाने तळ्याचेच रूप आले.
Monday, June 14, 2010 AT 06:45 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - असामान्य कार्यकर्तृत्व, धडाडी आणि जिद्दीच्या जोरावर उद्योग जगतात स्वतःच्या अस्तित्वाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राज्यभरातील महिला उद्योजिकांना रविवारी "महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार 2010'ने गौरविण्यात आले. "सकाळ' व "मिटकॉन' यांच्यातर्फे आयोजित उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उद्योजिकांच्या प्रवासाचा आढावा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
Tuesday, June 15, 2010 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - पुणे शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. कार्यालये सुटण्याच्या वेळेला पावसाने अचानक जोर पकडल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक रस्त्यांवर वेगाने पाणी वाहत होते. नारायण पेठेत पत्र्या मारुती चौकामध्ये अनेक दुकानांमध्ये व बेकरीत पाणी शिरले तर कलाश्री सोसायटी, अथर्व अपार्टमेंट, रतन अपार्टमेंट, चाफेकर अपार्टमेंटमधील पार्किंगमध्ये पाणी शिरले.
Tuesday, June 15, 2010 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेल्या शब्बीर हुसेन मोइद्दीन गंगावली याला आणखी एका गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यास न्यायालयाने दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) परवानगी दिली आहे. बनावट नोटांच्या खटल्यात तो येरवडा कारागृहात होता. त्यानुसार एटीएसने गंगावलीकडे चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. एटीएसने गंगावली याला 2008 मध्ये जनवाडी येथे अटक केली होती. बनावट नोटा विकण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक झाली होती.
Tuesday, June 15, 2010 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
चैत्राली चांदोरकर - सकाळ वृत्तसेवा पुणे - आवडत्या क्षेत्रात शिकण्याची संधी आपल्याला मिळाली पण ग्रामीण भागातील अनेक मुले अत्याधुनिक सुविधा, तसेच उच्च शिक्षणापासून आजही वंचित आहेत. त्यांना मदतीचा हात दिल्यास नक्कीच ती मुलेही यशस्वी होतील, या हेतूने आयटी क्षेत्रातील काही मंडळींनी 2003 मध्ये "फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन' (एफओएस) संस्था स्थापन केली.
Tuesday, June 15, 2010 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहर व पिंपरी-चिंचवडच्या अनेक भागांतील वीजपुरवठा सोमवारी खंडित झाला. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शहर व परिसरात पावसाला सुरवात झाली. तसेच सोसाट्याचा वाराही सुटला होता. या पावसामुळे अनेक भागांत झाडे आणि झाडांच्या फांद्या तुटून वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे तारा आणि कंडक्टर तुटण्याचे अनेक प्रकार घडले.
Tuesday, June 15, 2010 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संदीप जगदाळे - सकाळ वृत्तसेवा हडपसर - "यूज अँड थ्रो'चा जमाना असल्याने कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या चिनी छत्रीला सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, त्यामुळे परंपरागत छत्री दुरुस्ती करणारे कारागीर अडचणीत आले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने शहर व उपनगरातील सर्व दुकाने विविध रंग, आकाराच्या छत्र्यांनी सजली आहेत. अगदी चाळीस रुपयांपासून छत्र्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या छत्र्या स्वस्तात मिळत असल्याने "एक वर्ष वापरा व फेकून द्या' असा ट्रेंड लोकांमध्ये वाढला आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेत (ता.19) मंजुरीसाठी ठेवलेल्या तळवडे येथील 15 प्रकारची आरक्षणे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या दोघा नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. आरक्षणे रद्द करून नागरिकांना विकासापासून वंचित करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक शांताराम भालेकर यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका विजया जाधव यांनी केला आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे व्यवस्थित केली नसल्याने सोमवारी पावसाचे पाणी भुयारी गटारांतून वाहून न जाता रस्त्यांवरून वाहिले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, गाड्या वाहून गेल्या आणि सोसायट्यांचे पार्किंग पाण्यात बुडाल्याच्या घटना ठिकठिकाणी घडल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. महापालिका आयुक्तांच्या बंगल्याच्या आवारातही पाणी आले होते.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बालेवाडी (पुणे) - राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते 2009 चा निर्मलग्राम पुरस्कार स्वीकारताना नीरेच्या (ता. पुरंदर) सरपंच सुवासिनी लक्ष्मणराव चव्हाण आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर. ---------------- पुणे - राज्यात "निर्मलग्राम'च्या जोडीलाच पाणी वाचविण्याची मोहीम लोकसहभागातून राबवावी.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पिंपरी - दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर सोमवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत भूमिगत सांडपाणीनलिका "चोक-अप' झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागात घरे, झोपड्या, हॉटेल्स व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने आणि थोडा वेळा वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.   शहर व परिसरात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. विजेचा लपंडाव अनेक भागांत सुरूच होता.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या पावसाळी गटार यंत्रणेचे भोंगळ स्वरूप समोर आले. या गटारांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरच साठून राहिल्याने या योजनेचा बोजवारा उडाला. एवढेच नव्हे, तर यातून महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि महापालिका आयुक्तांचा बंगलाही सुटला नाही. शहरात पावसाळी गटारांची व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होते.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला. लोहगाव विमानतळावर सायंकाळी किमान दोन तास विमानसेवा विस्कळित झाली. सायंकाळी पाचनंतर अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पाच ते सातदरम्यान लोहगाव विमानतळावर आगमन करणारी अनेक विमाने मुंबईसह अन्यत्र वळविण्यात आली. मुख्यतः खराब हवामानामुळे विमानतळावर विमाने उतरू शकली नाहीत. अधिक माहितीसाठी लोहगाव विमानतळाचे टर्मिनल व्यवस्थापक श्री.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - मोसमी पावसाने वेळेवर आणि जोरदार सलामी दिल्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. राज्यात विदर्भ वगळता सर्वदूर पाऊस असून, विदर्भातही पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे वाफसा लवकर धरून पेरण्याही लवकर सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. विशेषतः गेल्या वर्षी फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा खरीप हंगाम हात देईल, अशा आशा निर्माण झाल्या आहेत. गेल्या वर्षी या काळात पावसाने बराच काळ दडी मारली होती.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - गुरुकुल गोदावरी बालक आश्रमातून सहा मुलींना मांजरी येथे आणण्यात आले होते आणि येथीलच एका रुग्णालयात त्या मुलींची प्रसूती केली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, एक लाख रुपयांच्या मोबदल्यात मूल दत्तक दिल्याप्रकरणी अटक तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. संजीवकुमार काशिनाथ भाटे, डॉ.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - पुण्यात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडले असून शहराच्या सौंदर्यालाही डाग लागला आहे. पुण्यातून होणारे सांडपाण्याचे प्रदूषण सोलापूरपर्यंत पोचत असून तेथेही समस्या निर्माण होत आहेत. शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने मुळा-मुठा नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नदीतून वाहणारे काळे पाणी व दुर्गंधी यामुळे सतत आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पिंपरी - मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी येथे दोन-तीन अवजड वाहने बंद पडल्याने हॅरिस ब्रिज ते फुगेवाडीपर्यंतची वाहतूक दीड तास विस्कळित झाली. सोमवारी ही घटना घडली. रात्री साडेनऊनंतर वाहतूक सुरळीत झाली. सायंकाळपासूनच शहरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साठले होते. या पाण्यामधून वाहने गेल्याने अनेक वाहने बंद पडत होती.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - मोठी चोच असलेला धनेश पक्षी, आपल्या पिवळ्या रंगाने लक्ष वेधून घेणारा हळद्या, गूढ आवाज आणि भेदक नजरेने निरीक्षण करणारे घुबड एवढेच नव्हे तर नाचण, ऍशी प्रिनिया, हुदहुद्या, स्वर्गीय नर्तक असे विविध पक्षी पाहण्याची संधी मिळाल्याने पक्षिमित्रांसाठी "पक्षिगणना' म्हणजे पर्वणीच ठरली. शहरातील पक्ष्यांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी आयोजित पक्षिगणनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ज्ञानेश्वर रायते - सकाळ वृत्तसेवा भवानीनगर - इंदापूर व बारामती तालुक्यांत 57 ठिकाणी जळालेल्या उसाच्या नुकसानभरपाईची प्रकरणे केवळ विद्युत निरीक्षकांच्या अहवालाअभावी प्रलंबित आहेत. या शिवाय, या तालुक्यांत पाच वर्षांत विजेच्या धक्क्याने मृत पावलेल्या 59 व्यक्तींपैकी तीन प्रकरणांचा वगळता इतरांच्या वारसांना "महावितरण'कडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. कारण बहुतांश घटना या संबंधितांच्या चुकीमुळे झाल्या आहेत, असा "महावितरण'चा दावा आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - एकत्रितपणे मेट्रो प्रकल्प राबवावा, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका लवकरच बैठक घेणार असल्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मेट्रो प्रकल्पासंदर्भात स्वयंसेवी संस्थांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्यावर शुक्रवारी (ता. 18) जनसुनवाईचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात विचारले असता महापौरांनी ही माहिती दिली.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर संपूर्ण शहराची रात्री उशिरापर्यंत कोंडी झाली होती. पाणी साचल्याने अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे पुणे-मुंबई रस्त्यासह शहराच्या विविध भागात वाहनांच्या काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची बसस्थानकांवर गर्दी झाली होती. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने बंद पडली. पावसामुळे अनेक रस्त्यांवर चार ते पाच फूट पाणी साचले होते.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - एकांकिका सुरू असताना जणू नाटकातील एखादी व्यक्तिरेखा असावी, अशा थाटात वानरानेच थेट रंगमंचावर "एन्ट्री' घेतली. भरत नाट्य मंदिर येथे अचानक अवतरलेल्या वानरामुळे रसिकांनी सोमवारी आश्चर्याच्या धक्क्यासह आनंददेखील अनुभवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "राज करंडक' ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - गृहदोष, वास्तुदोष, करणी दूर करण्याच्या खर्चासाठी नागरिकांना घर विकण्यास भाग पाडणाऱ्या आणि दहा लाख रुपये उकळणाऱ्या एका भोंदूबाबाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 25 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणी प्रशांत परशुराम भागवत (रा. नंदनवन रेसिडेन्सी, सिंहगड रस्ता) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पंडित लक्ष्मीनारायण बहिरूलाल शर्मा (वय 43, रा. भोपाळ, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - जर्मन बेकरी बॉंबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पालखी मार्गावर महापालिकेचे सुरक्षारक्षक नेमणे, गर्दीच्या ठिकाणी फ्लड लाइट लावणे आदी उपाययोजनांचा समावेश त्यात आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पिंपरी - "फेरीवाला व्यवसायाचे (विनियमन) आदर्श उपविधी' धोरणाला विधी समिती सभेत लवकरच मंजुरी देऊन शहरातील टपरी, पथारी व हातगाडीधारकांचे टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी टपरी, पथारी व हातगाडी पंचायतीच्या शिष्टमंडळाला मंगळवारी (ता. 15) दिले. त्यामुळे टपरी व पथारीधारकांवरील कारवाईच्या विरोधातील आंदोलन मागे घेण्यात आल्याचे पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आळंदी - आळंदी पंढरपूर पालखी प्रस्थान वारी सोहळ्यासाठी "आळंदी देवस्थान'ने नवीन चांदीची पालखी बनविण्यास सुरवात केली आहे. मागील पालखी जुनी झाल्यामुळे नवीन पालखी बनविण्याचा निर्णय देवस्थानकडून घेण्यात आला. आषाढी वारीसाठी बनविण्यात आलेल्या पालखीचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या त्यावर चांदीचे नक्षीकाम चालू आहे. आळंदीतून पाच जुलैला माउलींच्या पालखीचे पंढरपूरला प्रस्थान होत आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - शहराच्या सर्व भागात समान पाणीपुरवठा करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला सुमारे पाच वर्षांपूर्वी दिला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी करणे महापालिका प्रशासनाला अद्यापही शक्य झालेले नाही. त्यामुळे शहरातील काही भागासह प्रामुख्याने उपनगरांमधील नागरिकांवर आठवड्यातून दोन - तीन वेळा पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते.
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|