Update:
वाचकांचा पत्रव्यवहार
|
ई-पेपर
|
Bookmark
|
मागील अंक पहा
|
Download Font
|
लॉग-इन
|
लोग आउट
छोट्या जाहिराती
मुख्य पान
|
संपादकीय
|
फीचर्स
|
फॅमिली डॉक्टर
|
क्रीडा
|
मनोरंजन
|
मुक्तपीठ
|
पैलतीर
|
अर्थविश्व
|
मधुरांगण
ई सकाळ विशेष
|
पुणे
|
मुंबई
|
पश्चिम महाराष्ट्र
|
उत्तर महाराष्ट्र
|
मराठवाडा
|
विदर्भ
|
कोकण
|
महाराष्ट्र
|
देश
|
विदेश
Search Tag:
From Date:
To Date:
Section:
Total Results: 39637
'बहुजन महापंचायतीचा प्रारंभ कोल्हापुरातून'
कोल्हापूर - मनुवाद्यांचे चेहरे उघडे व्हावेत, यासाठी बहुजनांत जनजागृतीसाठी बहुजन महापंचायतीचा प्रारंभ पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातून आजपासून सुरू केल्याची घोषणा शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली. मनुवादाच्या प्रवृत्तीतूनच मुंबई बॉंबस्फोटात हेमंत करकरे यांचा "मर्डर' झाल्याचा आरोपही त्यांनी केला. महापंचायतीबाबत मुंबईत 20 सप्टेंबरला विविध पक्षांसमवेत बैठक होत आहे. त्यानंतर नाशिकमध्ये 25 ऑक्टोबर, तर मुंबईत 26 नोव्हेंबरला महामोर्चा काढण्यात येणार आहे. पुणे येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बहुजन महापंचायत होणार असून, त्यात ठराव केले जाणार आहेत. तत्पूर्वी महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात बहुजनांना एकत्रित करण्यासाठी प्रबोधन केले जाणार आहे.    श्री. सावंत म्हणाले, ""जेम्स लेनने लिहिलेले पुस्तक हे ऐतिहासिक सत्य नव्हे. त्याला मदत करणारे बारा मनुवादी खरे दोषी आहेत. लेनच्या पुस्तकावर राजसत्ता तुमची धर्मसत्ता आमची, या न्यायाप्रमाणे मनुवादी कारभार करत आले आहेत. भांडवलशाही व मनुवादी प्रवृत्तीतून देशात अराजकता माजवली जात आहे.
Saturday, September 11, 2010 AT 10:45 AM (IST)
सविस्तर वाचा >>
मराठवाड्याला हवेत पाच हजार कोटी !
औरंगाबाद - औरंगाबादेत होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मराठवाड्यातील सरकारी विभागांनी विकास कामांचे प्रस्ताव तयार केले असून, या प्रस्तावांची रक्कम जवळपास पाच हजार कोटींच्यावर गेली आहे. हे प्रस्वात अद्याप प्राथमिक स्वरूपातील असून, मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी यातील अनेक प्रस्तावांना कात्री लागणार आहे. औरंगाबादमध्ये गेल्या काही वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ बैठक होत असते. या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच अनुशेष भरून काढण्यासाठी निधी दिला जातो. मराठवाड्यासाठी कोणती कामे आवश्यक आहेत, याचे प्रस्ताव प्राथमिक स्तरावर इथल्याच विभागीय सरकारी कार्यालयातर्फे तयार केले जातात. नंतर यावर चर्चा होऊन यातील काही विकासकामांचा समावेश "मराठवाडा विकास पॅकेज'मध्ये केला जातो. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विभागीय आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते.
Saturday, September 11, 2010 AT 10:30 AM (IST)
सविस्तर वाचा >>
नवी मुंबईतील शिवसैनिकांची प्रतीक्षा कायम
नवी मुंबई -   नवी मुबंईतील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका गणेशोत्सवापूर्वी होतील, असे संकेत "मातोश्री'वरूनच मिळाले होते मात्र गणेशोत्सव आला, तरी नेमणुकांबाबत काहीच हालचाली होत नसल्याने शिवसैनिकांची प्रतीक्षा कायम आहे.   लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान नाराजांनी शिवसेनेला राम-राम ठोकला आहे. यात अनेक निष्ठावंतांचा समावेश आहे. यामुळे नवी मुंबई शिवसेनेतील अनेक पदे आजपर्यंत रिक्तच आहेत. यात उपजिल्हाप्रमुख, शहप्रमुख आणि उपशहरप्रमुखांचा प्रामुख्याने समावेश आहे. या प्रमुख पदांबरोबर नवीन सभासद कार्यकारिणीची घोषणाही ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात होणार होती मात्र महिना उलटला तरी ती झाली नाही. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या अगोदर पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर होण्याची दाट शक्यता होती मात्र आता ती शक्यताही संपली आहे. या नेमणुकीत वरिष्ठ शिवसैनिकांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे मात्र सोडून गेलेल्या शिवसैनिकांचा फेरविचार होणार नसल्याची खात्री सर्वांना वाटत आहे. वरिष्ठ पातळीवर मतभेद असल्याने नव्या नेमणुकांची यादी प्रसिद्ध होत नसल्याची माहिती एका शिवसैनिकाने दिली.
Saturday, September 11, 2010 AT 10:25 AM (IST)
सविस्तर वाचा >>
साडेसात लाखांच्या बनावट सीडी छाप्यात जप्त
पिंपरी - बनावट सीडी, डीव्हीडी विकणाऱ्या दुकानांवर छापा टाकून पोलिसांनी दूरचित्रवाणी संच, डीव्हीडी प्लेअर, सीडी-डीव्हीडी मिळून सात लाख 83 हजार रुपये किमतीचा माल शुक्रवारी जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सिनेस्टार कंपनीचे उमेश देवसिंग यांनी या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर बकाया साठे (वय 22), मोहन सुरेश गुप्ता (वय 19), दीपक गणवीर अत्रे (वय 19) आणि अमोल वासुदेव भोरे (वय 22, रा. सर्व दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रभाकर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश देवसिंग यांनी सहायक पोलिस आयुक्त सुधीर चौगुले यांच्याकडून दुकानावर कारवाईचा आदेश आणलेला होता. या आदेशानुसार पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पवार यांच्यासह प्रभाकर खणसे, अजीज बेग, श्रीकांत गांगुर्डे, संजय बोटकर, ज्ञानेश्वर धनगर आदींनी दापोडी रेल्वे स्थानकामागील सुंदरबाग भागातील सीडी-डीव्हीडी विक्रीच्या दुकानावर छपा टाकला.
Saturday, September 11, 2010 AT 10:25 AM (IST)
सविस्तर वाचा >>
ठाण्यात आज प्रार्थनास्थळांवर पुष्पवृष्टी
ठाणे  -  शंभर वर्षांनी रमजान ईद आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहेत. एकीकडे अमेरिकेत ख्रिश्चन धर्मगुरू कुराण जाळण्याची भाषा करीत असतानाच ठाण्यातील युवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमांतून सर्वधर्मसमभावाचा संदेश पोचविण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन पिढीतील तरुण पिढीचे नेतृत्व करणारे युवक शनिवारी (ता. 11) ठाणे शहरातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. युवकांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमाविषयी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मिस अमेरिका डायना पिंटो उपस्थित होते. नजीब मुल्ला, डायना पिंटो, मिलिंद पाटील आणि शीख धर्मातील एका युवक उद्या दुपारी ठाण्यात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार आहेत. शहरातील कौपिनेश्वर मंदिर, गणेश मंदिर, राबोडी आदी परिसरातील मशिदी, सेंट जॉन चर्च, सर्व्हिस रोडवरील गुरुद्वारा आदी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. डायना पिंटो हिने सांगितले की, कोणत्याही धर्माच्या ग्रंथाबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.
Saturday, September 11, 2010 AT 10:23 AM (IST)
सविस्तर वाचा >>
1
2
3
4
5
...
आजचा सकाळ...
बातम्या:
पुणे
|
मुंबई
|
पश्चिम महाराष्ट्र
|
मराठवाडा
|
विदर्भ
|
कोकण
|
महाराष्ट्र
|
देश
|
विदेश
|
अर्थविश्व
|
उत्तर महाराष्ट्र
संवाद:
मुक्तपीठ
|
पैलतीर
|
मधुरांगण
|
ब्लॉग
संपादकीय
|
फॅमिली डॉक्टर
|
मनोरंजन
|
क्रीडा
|
फीचर्स
|
RSS Feeds
About Us
|
Contact Us
|
RSS Feeds
|
Archives
|
Group Site
|
SakaalTimes
|
Subscribe
|
एग्रोवन
|
साप्ताहिक सकाळ
|
Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: