Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 66
मुंबई -  हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार तसेच तंत्रज्ञ यांचा यथोचित सन्मान करणारा प्रसिद्ध "झी सिने ऍवॉर्डस्‌' सोहळा सिंगापूरला होणार आहे. सिंगापूरच्या "मरिना बे सॅण्डस्‌'ला या सोहळ्याचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. 14 जानेवारी 2011 रोजी हा सोहळा येथे होणार आहे. "झी एन्टरटेन्मेंट' आणि "मरिना बे सॅण्डस्‌' यांनी संयुक्तरीत्या ही जबाबदारी उचलली आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील शाहरूख खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, ऐश्‍वर्या राय-बच्चन आदी रंगमंचावर अवतरणार असून त्या माध्यमातून एक नेत्रदीपक संगीत रजनी जगभरातील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यामध्ये नामांकने मिळालेल्या चित्रपटांमधील सर्वोत्तम कोरिओग्राफी असलेले नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहेत. त्याशिवाय अन्य गाणी आणि विनोदाची रेलचेलही असणार आहे. याबाबत "झी सिनेमा'चे वरिष्ठ अधिकारी मोहन गोपीनाथ म्हणाले, ""या सोहळ्यात भारतातील बरेचसे कलाकार सहभागी होणार आहेत. मोठ्या थाटामाटात हा सोहळा आम्ही आयोजित केला आहे. सिंगापूरला हा सोहळा आयोजित केल्याचा आनंद होत आहे.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
प्रशांत अनासपुरे  - सकाळ वृत्तसेवा मुंबई -  बॉक्‍स ऑफिसवर विक्रमी प्रतिसाद लाभलेल्या आमीर खानच्या "थ्री इडियट्‌स'मधील "चतुर' अर्थात ओमी वैद्य आता मधुर भांडारकरच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि इमरान हाश्‍मी या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर ओमी झळकणार आहे. "दिल तो बच्चा हैं जी...' या नावाचा हा चित्रपट आहे. "साम मराठी'शी बोलताना ओमीने ही माहिती दिली. ओमी म्हणाला, ""मधुर भांडारकरने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मी एका कोल्हापुरी तरुणाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेत अस्सल महाराष्ट्रीय तरुणाची भूमिका करायला मिळाल्याने आनंद वाटतोय. माझे शिक्षण जरी अमेरिकेत झाले असले तरी, मुंबईशी आणि विशेषतः मराठी मातीशी माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. अब्बास मस्तान यांच्याही एका चित्रपटात मी काम करत आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, नील नितीन मुकेश यांच्याबरोबर काम करायला मिळाले आहे. यात एक पंजाबी मुंडा पडद्यावर साकारण्याची मला संधी मिळाली आहे.'' "थ्री इडियट्‌स'च्या यशानंतर ओमी गेला कुठे? याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती.
Wednesday, September 08, 2010 AT 09:30 AM (IST)
संतोष भिंगार्डे  - सकाळ वृत्तसेवा मुंबई -  रमजानच्या महिन्यात मुस्लिम प्रेक्षकवर्ग मिळत नसल्यामुळे "बिग बॅनर्स'चे चित्रपट या कालावधीत प्रदर्शित होत नव्हते. या दिवसांत मोठमोठ्या पार्ट्याही झडत नव्हत्या, परंतु या वर्षी ही परंपरा खंडित झाली आहे. "पीपली लाईव्ह', "आशाएं', "लफंगे परिंदे', "वुई आर फॅमिली' हे चित्रपट या कालावधीत प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी "पीपली लाईव्ह' या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे तर "डबल धमाल' या चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे. खरे तर उत्तर भारतात तसेच मुंबईतील काही भागांत मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. हिंदी चित्रपटांचा तो हुकमी प्रेक्षकवर्ग आहे. रमजानच्या दिवसात हा प्रेक्षकवर्ग रोजा ठेवत असल्यामुळे चित्रपटगृहात येत नाही. साहजिकच त्याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे या कालावधीत कोणताही मोठा निर्माता-दिग्दर्शक आपला चित्रपट लावण्यास धजावत नसे किंवा चित्रपटाच्या मोठ्या पार्ट्याही या कालावधीत होत नसत, परंतु यंदाच्या रमजानमधील चित्र नेमके उलटे दिसत आहे.
Tuesday, September 07, 2010 AT 09:30 AM (IST)
मुंबई  - आमीर खानच्या "पिपली लाईव्ह' या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला असला आणि त्यामुळे स्मॉल बजेटचे चित्रपट उत्तम चालतात हे सिद्ध झाले असले तरी या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीला दोन नवीन कलाकार मिळाले आहेत. त्यापैकी एक नत्था अर्थात ओंकारदास माणिकपुरी आणि दुसरा राकेश अर्थात नवाजुद्दीन सिद्धिकी. यापैकी ओंकारदास माणिकपुरी छत्तीसगडमध्ये राहणारा आहे. मात्र नवाजुद्दीन गेले कित्येक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण ब्रेक मिळण्यासाठी धडपडत आहे. यापूर्वी त्याने "न्यूयॉर्क', "फिराक' या चित्रपटात काम केले आहे. "देव डी' या चित्रपटातील "इमोशनल अत्याचार...' हे लोकप्रिय गाणे त्याच्यावर चित्रित झाले आहे. परंतु महत्त्वपूर्ण असा त्याला ब्रेक "पिपली लाईव्ह'मध्ये मिळाला आहे. "पिपली लाईव्ह' या चित्रपटात त्याने राकेश नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. नत्था आत्महत्या करणार असल्याची बातमी तो पहिल्यांदा ब्रेक करतो आणि त्यानंतर सगळीकडे खळबळ माजते. एकूणच त्याची ही भूमिका आणि त्याने घेतलेल्या मेहनतीचे सगळीकडे कौतुक होत आहे.
Monday, August 30, 2010 AT 09:30 AM (IST)
जळगाव -  मायानगरी बॉलिवूडचे प्रत्येकाला आकर्षण असते. कोट्यवधी नव्हे अरबोंची उलाढाल होणाऱ्या या मायानगरीत ज्या-ज्या व्यक्तींची चलती असते त्यांच्या वागणुकीपासून ते राहणीमानापर्यंतचा समाजावर परिणाम होतो. चाहत्यांकडून त्यांचे अनुकरण केले जाते. विशेषतः व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी हेअरस्टाईल महत्त्वाची असल्याने बॉलिवूड कलाकारांच्या हेअरस्टाईलची तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. सद्यःस्थितीत आमीर खानची "थ्री इडियट' चित्रपटातील आणि त्यापूर्वी सलमान खानची "तेरे नाम' चित्रपटातील हेअरस्टाईल तरुणांमध्ये तुफान लोकप्रिय झाली. हेअरस्टाईलमधील बदलते ट्रेंड बॉलिवूडमधील नायकांप्रमाणे हेअरस्टाईल ठेवणे आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. अमिताभ बच्चनच्या हेअरस्टाईलने त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळविली. कानावर व मानेवर मोठे केस अशी हेअरस्टाईल होती. त्यापूर्वी बिटल, मिलिटरी कटची धूम होती. अमिताभनंतर मिथुन, जितेंद्र, गोविंदाने अंगीकारलेल्या स्टाईलचा बोलबाला होता. संजय दत्तच्या खलनायकपासून मानेवर रूळणाऱ्या केसांची स्टाईल आली. एकूणच सिनेसृष्टीतील बदलत्या प्रवाहानुसार हेअरस्टाईलचे ट्रेंड बदलत गेले. आजही तेच सुरू आहे.
Monday, August 23, 2010 AT 09:59 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: