Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन


Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
 
Total Results: 120
प हाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण या प्राईमटाईममध्ये करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला.... मंगल वातावरणाकडे नेणारा हा पहाटेचा जादूभरा मार्ग! काही जणांना पहाटेचा वेळ साखरझोपेत घालवून रात्रीची विश्रांती आणखी खेचायची असते. त्यात त्यांना जर सुख असेल, तर असो. या सर्वोत्तम वेळी बिछान्यावर लोळत न पडता, घरापासून जरा दूर मोकळी हवा भरभरून घेत, पाखरांची गाणी ऐकत, आळसावलेले शरीर ताजेतवाने करून नवीन दिवसाच्या रामरगाड्याला सामोरे जाणे मी पसंत करतो. जवळच्या उद्यानात गोलाकार मार्गावर जलद चालीने दहा बारा फ़ेऱ्या मारायच्या. तिथल्या व्यायामाच्या जागेत काही योगासने करून शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करायचे.
Tuesday, September 07, 2010 AT 06:50 AM (IST)
का ही काळापूर्वी  पुण्याच्या पर्वती परिसरातील शिवदर्शन भाग म्हणजे आम्हा नागरिकांना अभिमानाने सांगण्याची गोष्ट होती. परंतु गेल्या काही वर्षांत येथील स्थानिक राजकीय महत्वकांक्षेपोटी या भागाची पूर्ण वाट लागणार असे चित्र दिसून येत आहे. महापालिकेतील सत्तारूढ (?) दोन्ही कॉंग्रेसच्या स्थानिक "नेत्यांमध्ये" प्रचंड वाद असल्यामुळे येथील स्थानिक नागरिक प्रचंड हाल अपेष्टा सहन करीत आहोत.   रस्त्यांची दुर्दशा, बेकायदेशीर बांधकामे, त्यांचा राडारोडा, पूरग्रस्त वसाहत मधील परकीयांची घुसखोरी, तेथील दारू गुत्ते, या बद्दल येथील पोलीस, म न पा क्षेत्रीय कार्यालय, येथे वारंवार लेखी/तोंडी तक्रार करूनही काही उपयोग झालेला नाही. मुग गिळून बसलेले नेते, हतबल नगरसेवक व येथील सोसायट्यांमधील "मला काय त्याचे" प्रवृत्ती चे नागरिक या मुळे येथील गुंड प्रवृत्ती वाढली आहे. येथील मुक्तांगण शाळा, तेथील विद्यार्थी व येथील तरुणांवर काय संस्कार होणार?  कोटयवधी खर्चून बांधलेले क्रीडा संकुल गेली आठ वर्ष बंद आहे.
Wednesday, September 01, 2010 AT 08:42 PM (IST)
समोर उभ्या असलेल्या गृहस्थांची स्थिती खरोखर केविलवाणी होती. त्यांना मदत करायलाच हवी होती. थोडी खात्री करून घेत मी मदत केली आणि ती घटना विसरून गेलो पण तीन महिन्यांनी माझ्या नावाने सगळ्या रकमेची मनिऑर्डर आली आणि मला आश्‍चर्य वाटले... एक आगळा आणि वेगळा अनुभव सर्वांसमोर मांडत आहे. अर्थात हेतू एकच आहे. आपण सत्कृत्य करत राहावे. फळाची अपेक्षा ठेवू नये. एका रविवारी सकाळी 10-11 च्या सुमारास गुरुवार पेठेतील जैन मंदिरासमोर उभा होतो. एक मध्यमवयीन गृहस्थ - ज्यांचा चेहरा उतरलेला - प्रवासात असतो तसा पेहराव - माझ्याजवळ आले आणि आर्थिक मदतीची अपेक्षा केली. त्यांची बोलण्याची पद्धत प्रामाणिकपणा - दयेची अपेक्षा नसली, तरी मदतीची इच्छा जरूर कळत होती. माझा काही विश्‍वास बसे ना. मी सविस्तर चौकशी केली. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते त्यांच्या कुटुंबाह सोलापूरहून बडोद्याला जात असताना रेल्वेमधील त्यांचे सर्व सामान - पर्स चोरीला गेले. तिकीटही चोरीला गेल्यामुळे त्यांना पुणे रेल्वे स्थानकात उतरावे लागले. स्थानकावरच त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांना ठेऊन ते मदतीच्या अपेक्षेने गुरुवार पेठ - जैनमंदिर येथे चालत आले होते.
Tuesday, August 31, 2010 AT 02:40 AM (IST)
युरोपातल्या ज्या स्टॉपवर बस थांबली, तो भाग भुरट्या चोऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. चहाच्या स्टॉलजवळ आलो, तर पाकीट सापडेना. बसमध्ये शोधले, पण काही नाही. पण बसमधून उतरताना पाहिले तर आमचे पाकीट शेवटच्या पायरीवर पडलेले... का ही वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही उभयता एका प्रवासी कंपनीबरोबर युरोप सफरीला गेलो होतो. युरोपमध्ये एकेक देशाला भेट देण्यासाठी एक बस आमच्या दिमतीला होती. पोटातले पाणीही हलणार नाही एवढे सुंदर रस्ते, मैलोनमैल पार करत बस चालायची. तास- दोन तासांच्या अंतराने चहासाठी बस थांबायची. अशीच एके ठिकाणी "टॉयलेट स्टॉप'वर बस थांबली. पाय मोकळे करावेत, जमल्यास चहा घ्यावा म्हणून इतर सहप्रवाशांसोबत आम्हीही बसमधून उतरलो. हा प्रदेश भुरट्या चोऱ्यांसाठी प्रसिद्ध होता असे आम्हास सांगण्यात आले होते. आम्ही नैसर्गिक विधी आटोपून जवळच्याच स्टॉलपाशी चहासाठी आलो. सहज सौ.नी पर्स तपासून पाहिली, पाकीट पाहिले ते दिसेना. मीही खिसे चाचपून पाहिले परंतु हाती काहीच लागेना. आमच्या दोघांच्याही काळजाचे ठोके चुकले. पायातले बळ गेले. तरीदेखील धीर धरून पाकिटाची शोधाशोध सुरू केली. बसमध्ये येऊन आमच्या सीटच्या आसपास नीट शोधले, काही दिसेना.
Tuesday, August 31, 2010 AT 02:38 AM (IST)
सगळेच जण काही सर्वगुणसंपन्न नाहीत. पण अडीअडचणीला मदत मिळते ती शेजाऱ्यांचीच. चांगल्या गोष्टींकडे बघून दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले तर शेजाऱ्यांचा सहवास किती सुखाचा होतो ते पाहा. पूर्वी भारतात अन्‌ आता कॅनडात मी हे अनुभवते आहे... भारतात राहत असताना मी महाराष्ट्रातील बऱ्याच गावांत राहिले. कोणतेही गाव, जागा बदलली, की शेजारपाजार व जवळपास राहणाऱ्या व्यक्तींचा आधार वाटतो. जेथे राहिले तेथे चांगलीच माणसे भेटली. त्यांच्याशी अजूनही संबंध आहेत. आता कॅनडात राहताना येथेही छान शेजार मिळाला. दोन्हीकडील शेजारधर्मात सांस्कृतिक फरक असला, तरी "मानवतावादी' दृष्टिकोन सारखाच आहे. माझा जन्म पुण्याचा. काही महिने पुण्यात गेल्यावर माझी आई नोकरीला रुजू झाली. तिला मला पाळणाघरात ठेवायचे नव्हते म्हणून माझी रवानगी साताऱ्याला आजी-आजोबांकडे झाली. तेव्हा आमचे घर गुजरआळीत होते. सगळ्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते. कुठेही जातीपातीची भाषा नाही, तर उलट आदराची भावना होती. माझी आजी रोज तिन्हीसांजेला रामायण, महाभारतातील गोष्टी सांगायची व श्‍लोक, गीतेचे अध्याय व पाढे म्हणून घ्यायची. त्या वेळी गल्लीतील बहुसंख्य मुले-मुली यायची.
Monday, August 30, 2010 AT 09:17 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: