Update:   IST       वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark

एक घरटे पक्ष्यांसाठी...
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 23, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: western maharashtra,  nature,  birds,  nest,  kolhapur

कोल्हापूर - वाढत्या शहरीकरणामुळे झाडांच्या संख्येत घट होत असल्याने पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी बांधण्याचा अनोखा उपक्रम हुतात्मा पार्क येथे राबविण्यात आला. हुतात्मा पार्क निसर्गप्रेमी मंचने हुतात्मा पार्कमधील झाडांवर प्रायोगिक तत्त्वावर मातीची मडकी बांधली आहेत. पर्यावरण मासानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांना निसर्गमित्र संस्थेचे सहकार्य मिळाले.

पार्कमध्ये जारुल, बर्ड चेरी, रेनट्री, कॅपशिया, महवनी, टेंभुर्णी, वड, पिंपळ, बॉटल ब्रश, गुलमोहर, निलमोहर, आपटा, टिपकेवाला कांचन, कैलास पती, सातवन, पामट्री यांसारख्या हिरवे व डेरेदार वृक्ष असल्याने येथे पक्ष्यांची येण्याची संख्या अधिक आहे. या वृक्षांवर पक्ष्यांना घरटी करणे सहज शक्‍य होते. बागेच्या दोन्ही बाजूला ओढा असल्याने पक्षी येथे येतात. त्यामुळे पक्ष्यांचे येथील कायमचे वास्तव वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पक्ष्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी कृत्रिम घरटी बांधल्यानंतर पक्ष्यांच्या अधिवासामध्ये भर पडण्यासाठी मदत होईल, असे वाटत असल्याने निसर्गप्रेमींनी आज शंभर मडकी येथे झाडांवर बांधली. येथे पाण्याची भांडी ठेवली. या मडक्‍यांमध्ये पक्ष्यांनी राहण्यास सुरवात केल्यास अशा प्रकारची घरटी शहरात अन्य ठिकाणी संस्था बांधणार आहे. या उपक्रमात अवधूत गायकवाड, डॉ. अंजली पाटील, प्रा. डांगट, अमोल गाडे, खंडेराव भोसले, महापालिका उद्यान विभाग कर्मचारी व राजाराम विद्यालयाचे विद्यार्थी यांनी भाग घेतला.
 
संख्येत वाढ होण्यास मदत
पार्कमध्ये बुबुल, किंगफिशर, इंडियन रॉबिन, कोतवाल, सुतार पक्षी, वेडा राघू, सूर्यपक्षी यांसारखे पक्षी येथे येतात. हे पक्षी कृत्रिम घरट्यांमध्ये राहिले, तर त्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
On 3/29/2010 2:25 PM Arishtanemi said:
The info is incorrect. The birds listed here have different nesting requirements. All of them won't use these nests. Please verify before publishing.
On 3/19/2010 3:45 PM ravindra halkatti said:
वृक्षांची संख्या कमी होने हि बाब गंभीर आहे, रस्ते रुंदीकरण मध्ये झाडे न तोडता ती मुळातूनच उखडावी व त्याचे नदी, बागा किंवा ओढ्याशेजारी पुनर्वसन करावे.त्या बरोबरच नवीन वृक्ष लागवड करावी. कृत्रिम घरटी पक्षी स्वीकारतील का याचा थोडा अभ्यास करावयास हवा, निसर्गाचे पुनर्वसन करावे... आणि श्यकतो कृत्रिमतेला लांबूनच नमस्कार करावे.
On 12/8/2009 7:17 AM abgokhale said:
खूप छान
On 08/12/2009 01:33 ? Avinash said:
Krutim gharti bandhanya peksha Zade lava
On 11/30/2009 11:08 AM VINOD said:
वा मस्त...


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: