Update: 
      वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  लॉग-इन  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font

'राज पिछले जन्म का'
संतोष धायबर
Thursday, December 10, 2009 AT 08:36 AM (IST)
टीव्हीवरील बहुचर्चित मालिका "सच का सामना' या "रिऍलिटी शो' मालिकेनंतर सोमवारपासून (ता. 7) एका खासगी वाहिनीवर "राज पिछले जन्म का' ही मालिका सुरू झाली. या मालिकेविषयी थोडक्‍यात...

प्रत्येक व्यक्तीला आपल्या मागील जन्माविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपल्याला नेहमी वाटत असते की, एखाद्या व्यक्तीला आपण कुठे तरी पाहिले आहे. "त्या' व्यक्तीविषयी अचानक सहानुभूती वाटायला लागते. तर कधी-कधी अचानक मागील जन्मातील आठवणी समोर येऊ लागतात. पण.. हे कसे शक्‍य आहे? अशा गोष्टींवर कधी आपण विश्‍वास ठेवतो, तर कधी मनावर न घेता सोडूनही देतो. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला भीती वाटत असते. त्या भीतीचा गत जन्माशी काही संबंध असू शकतो का? तर कोणी आपल्या मागील जन्मातील आठवणी जागृत करून दिल्या तर... किती आनंद होईल ना? प्रत्येकाला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. याच धर्तीवर एका खासगी वाहिनीवर "राज पिछले जन्म का' ही मालिका सोमवारपासून (ता. 7) सुरू झाली.

खासगी वाहिनीवर "सच का सामना' या बहुचर्चित कार्यक्रमाने भरपूर प्रसिद्धी मिळवली. हा एक "रिऍलिटी शो' होता. या मालिकेच्या धर्तीवरच "राज पिछले जन्म का' ही मालिका सुरू झाली. ही एक रोमांचक मालिका असून प्रसिद्ध भोजपूरी अभिनेता रवी किशन निवेदक म्हणून काम करत आहे. या मालिकेमध्ये प्रथम आमंत्रित व्यक्तीला "हॉट सीट' वर झोपविले जाते. झोपल्यानंतर त्या व्यक्तीला ध्यानसाधना करायला लावून गत आयुष्यात नेले जाते. मानसोपचारतज्ज्ञ तृप्ती जैन यावेळी "हॉट सीट' जवळ बसलेल्या असतात. "त्या' व्यक्तीला नंतर गत आयुष्यातील प्रश्‍न विचारले जातात. व ती व्यक्‍ती गत आयुष्यात जाऊन विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ लागते. ती व्यक्ती गत आयुष्यात कोण होती, पुरुष की स्त्री, नाव, वय याप्रश्‍नांची उत्तरे त्या व्यक्तीकडून मिळवली जातात. व "हॉट सीट' वरील व्यक्तीच्या सध्याच्या जीवनात त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला जातो.

तृप्ती सांगतात, "हॉट सीट' वरील व्यक्तीला जीवनात कशाची भीती वाटते, याबद्दल माहिती घेतली जाते. एकाच वेळी जन्मलेल्या व्यक्तींचे जीवन वेगवेगळे कसे असू शकते. एक व्यक्ती श्रीमंत घरात तर दुसरी व्यक्ती गरीब घरात जन्म का घेते. जीवनात एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर आपल्याला असे का वाटते की, या व्यक्तीला कुठेतरी पाहिलेले आहे. मागील जन्मातील काही गोष्टी अचानक कशा आठवू लागतात. एखाद्या व्यक्तीचा जीवनात रहस्यमय गोष्टी कशा घडू शकतात. इत्यादी प्रश्‍नांची उत्तरे मिळवता येतात.

सुश्‍मिता सेन नंतर मोनिका बेदी, करिष्मा कपूर, सेलेना जेटली, संजय दत्त, नील नितीन मुकेश या शिवाय सामान्य नागरिकांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.

या मालिकेची जाहिरात टीव्हीवरून केल्यानंतर भरपूर फोन आल्याचे रवी किशन यांनी सांगितले. तसेच अनेकांनी गत आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त केली.

तुम्हाला "राज पिछले जन्म का' या मालिकेविषयी काय वाटते? ते जरूर लिहा.
प्रतिक्रिया
On 2010-04-08 18:12 Rekha Shah said:
"सगळ्यात विशेष म्हणजे सगळे मागच्या जन्मी भारतीय होते .."-खरा माणूस ....... एकदम सहीsssच लिहिलं आहे. :-)
On 4/7/2010 9:47 PM Santosh said:
कुणी तरी अशी comment लिहिली आहे कि "तुमच्या हातात रिमोट आहे...तुम्ही बघू नका....." असे असेल तर मग अश्लील सिनेमे पण दाखवायला काय हरकत आहे ? मिडिया ची जबाबदारी असते समाजाला पुढे घेऊन जाण्याची ....विचार करण्याला ....शहाणे होण्याला प्रवृत्त करण्याची ....टिळक , आगरकर, लोकहितवादी ह्या लोकांनी अशा गोष्टींसाठी मेडिया चा वापर केला ...अरे तिकडे दाभोलकर, शाम मानव यांच्या रक्ताचे पाणी होते. अनिस साठी काम करताना...आणि हे लोक निघाले लोकांना आणखीन अंध श्राद्धान्ळू बनवायला ..केवळ स्पोन्सेर्स मिलतात म्हणून !
On 4/7/2010 8:33 PM Prashant said:
आज भारतात अश्लीलपणा झेत आहे. त्झाचे लोकांना काही वाटत नाही. या मालिकेबद्दल बरेच बोलत आहेत. मला आवडली. मालिका. छान आहे.
On 12-02-2010 18:41:00 rani said:
रिमोट तुमच्या हाती आहे तर तुम्ही बंद करा बघू नका. zop kada mast पैकी.
On 12/18/2009 2:56 PM Chetan said:
मूर्ख पण आहे हा संपूर्ण. हि सीरिअल पण गाढव पण आहे आणि साच का सामना पण. रिकामी लोकांची काम आहेत हि सगळी. सर्व प्रीप्लन असत सर्व स्क्रिप्ट असते. फोरेनला जे आधी झालं ते आता आपल्याकडे चाललाय. निव्वळ मूर्खपणा आहे.
On 12/16/2009 2:36 PM raju said:
हा भारत देश असून येथे लोक काय करतील याचा भरोसा नाही ....... त्या पेक्षा तर रेसारच लीवे कार्यक्रम दाखवा ज्या मध्ये विध्यार्ती काही शिकून घेतील व पालक पण मुलांना प्रोत्साहन देतील
On 16/12/2009 11:10 AM Amar said:
i am agree with' Khara Manus'
On 12/15/2009 7:44 PM Abhijeet said:
हि सेरीअल बंद झाली पाहिजे ......... बकवास मालिका. मालिका सुरु असताना वाहिनी आणि सेन्सोर बोर्ड काय झोपले आहे का?
On 12/15/2009 12:06 AM nikhil said:
खुळचटपणा आहे हा. निव्वळ मूर्खपणा आहे हा. खुळचटपणाचा कळस गाठला आहे या कार्यक्रमाने. सच का सामना यात निदान माणूस खरं बोलतोय की नाही याची चाचणी तरी व्हायची. या अतिशय खुळचट कार्यक्रमात जे कोण अती खुळचट लोक येतात ते खरं बोलतात कशावरून? मागचा जन्म कळतो तर मग पुढचाही जन्म बघा असं संगितल पाहिजे. तेच राहीलय. २-३ महिनेही हा कार्यक्रम चालेल असं वाटत नाही.
On 14/12/2009 08:19 ketan said:
jar tumhi bhavishaya sangnaralya jel madhe takta,ki tyane lonkana phasvile ,tar mag tumhi bhutkal sanganaryala ka nahi jel madhe takat?
On 12/12/2009 3:44 PM Saurabh said:
its utter noncense
On 12/12/2009 10:57 AM ZAHEER said:
हा पूर्णपणे फालतूपणा आहे बकवास काहीही दाखवतात. फोडले पाहिजे अन्कॅर ला आणि डिरेक्टर ला
On 12/11/2009 9:27 PM Pallavi said:
I feel these stories may not be true.But it is very early to comment on this serial.many people not watching TV shows believe that all the serials are fictitious.So better to analyse the shows and if people don't have time to watch such shows how they get time to comment on these shows.
On 12/11/2009 8:15 PM ajita said:
बघू नकाना .... रिमोट तुमच्या हातात आहे त्याचा वापर करा
On 12/11/2009 8:15 PM megha said:
BAKWASSS...kai ya serial madhil servannacha magil janmaa ha mansachach ahe ka itake punyawan ahe ahe ka serve log ki ya janmat suddha mansacha janma milala kai konich ya show madhe magil janmat ANIMAL navta...plz ha show band kara plz plz pahun hot nahi
On 12/11/2009 5:53 PM RESHMA said:
क्या ये सब सच हैं
On 12/11/2009 5:40 PM Sagar Paradkar said:
जर एखादा कार्यक्रम भविष्यात नेणारा असेल तर मी सहभागी व्हायला तयार आहे. म्हणजे आपोआपच त्याची सत्यता पडताळून बघता येईल
On 12/11/2009 4:43 PM Aasha said:
एकदम बकवास सेरीअल आहे हि
On 12/11/2009 4:17 PM viki said:
निव्वळ फालतूपणा आहे . या गोष्टी म्हणजे सुजन आणि सुशिक्षित भारतीय समाजाला मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत . यांना चाबकाने मारले पाहिजे .....!!!! आणि या नाटकात सहभागी होणार्या माणसाना सुध्धा बडवले पाहिजे .
On 12/11/2009 4:09 PM Satyawan said:
बकवास सेरीअल आहे... काम नसतानाच उद्योग....
On 12/11/2009 2:52 PM xyz said:
kahihi kaya lokana tyat guntu naka tumala trp phije ti ya replay mule milel
On 12/11/2009 2:11 PM vinit Umrikar said:
अशा कार्यक्रमाना वायफळ पैसा घालवून हे लोक मेडिया आजून खालच्या दर्जाला नेउन ठेवत आहेत
On 11/12/2009 13:07 Nagesh said:
murkha pana aahe ha
On 12/11/2009 12:47 PM nilesh said:
हि ग्रेअत मानुसे मागच्या जन्माचे शूटिंग करू शकतात. क्या बात . मागच्या जन्मात जाताना कॅमरा मन पुन जातो का :)
On 12/11/2009 11:33 AM Sandhya said:
एकदम फालतू सेरीअल आहे. निव्वळ मूर्खपणा आहे. आणि लोक पण हे सगळं खरं समजतात. हि सेरीअल बंद झाली पाहिजे
On 12/11/2009 10:42 AM pooja said:
This is called negative publicity like 'Rakhi ka Swayamvar'
On 12/11/2009 10:42 AM ajay devidas kunjir said:
bhutkalat jagaych ki wartman kalat he ata thumich tharawa,sarwana vichar asto wartman kinwa bhawishacha .thewile anate taisechi rahawe chitti aso dyawe samamadhan.jay maharashtra.
On 12/11/2009 9:34 AM Ganesh said:
बकवास आहे हि मालिका.
On 12/11/2009 8:41 AM Vishakha said:
These serials should be banned , as people will start trusting on " Punar Janma" and this will make people more superstitious . I think all these stories shown are just imaginations. No one should belive such storeis.
On 12/11/2009 4:01 AM Prafulla said:
एक आतीसशय आभ्यासपूर्ण मालिका........................
On 12/10/2009 11:31 PM amol said:
सास बहु सीरिअल बघ्ण्यापेक्ष्या चांगले आहे, पण फक्त टाईम पास म्हणून.
On 12/10/2009 8:46 PM suhas said:
हे भैये कुठ घुसतील की सांगता येत नाही
On 10/12/2009 17:59 sasonkar yardena israel said:
माझ्या मते प्पाल्ल्वी जोशी यांची मालिका असंभव याची सुरवात परत करायाचा विचार आहे असे माला वाटते तरी पण ह्या मालिकेला बेस्ट ऑफ लुच्क आम्हा इस्राएल्च्या भारतीया कडून सासुन्कर यार्देना इस्राईल
On 12/10/2009 3:31 PM sandeep said:
अजून एक मालिका जिच्या मध्ये काहीही रस नाही. अजून किती सहन करायचं आंम्ही. आमचे कॅबेल चे पैसे वाया घालवतात.
On 12/10/2009 3:10 PM punekar said:
मला तर बकवास वाटतो. असल्या मालिका सुरु असताना वाहिनी आणि सेन्सोर बोर्ड काय झोपले आहे का?
On 12/10/2009 3:05 PM Ram said:
Mala tar padat nahi
On 10/12/2009 14:55 punekar said:
मूर्खपणा आहे. काम सोडून बाकी सगळे करा. गाढव लेकाचे. आता थोड्या दिवसात तुम्ही पुढच्या जन्मात काय होणार हेही TV वर दिसेल.
On 12/10/2009 1:43 PM Khara manus said:
सगळ्यात विशेष म्हणजे सगळे मागच्या जन्मी भारतीय होते .. म्हणजे असा नियम दिसतो आहे कि तुमचा पुनर्जन्म फक्त भारतामध्येच होऊ शकतो ... जय भारत ..
On 12/10/2009 1:41 PM Khara manus said:
सगळ्यात विशेष म्हणजे सगळे मागच्या जन्मी भारतीय होते .. म्हणजे असा नियम दिसतो आहे कि तुमचा पुनर्जन्म फक्त भारतामध्येच होऊ शकतो ... जय भारत ..
On 12/10/2009 1:02 PM madhuri kulkarni said:
kashavarun tuhi mhanata ki magachya janmi purush kinva sri hoto jar donhi paiki kahi nasel tar?
On 12/10/2009 11:56 AM ganesh said:
totally fake
On 12/10/2009 10:44 AM Prashant said:
फालतू !!!! कोणीही पाहू नये असा काही
On 12/10/2009 10:35 AM ganesh said:
लोकांना काय वेड समजतात काय हि लोक.
On 12/10/2009 10:34 AM Deepak Badgujar said:
या मेदैया काम धंदे नाही, उगाचच समाजात विकृती पसरवितात, आणी वातावरण खराब करतात, यांचावर नियमांचे बंधन आणले पाहिजे, नाहीतर हे देशाच्या पिढीला बरबाद करत आहे.
On 12/10/2009 10:06 AM Prafulla said:
भिकार मालिका आहे एकदम...तो रविकिशन anchoring करतोय की भिक मागतोय तेच काळात नाही.......
On 12/10/2009 10:03 AM Neha said:
This is really unbeliveable , But har koi pichale janam main insan hi hoga , koi aur bhi ho sakta hai jaise koi dog, pig, cat , elephant etc . we have so many question about it .... but sach serial hai , agar zuth hota to ese tv pe nahi dikhaya jata
On 12/10/2009 9:49 AM chitra said:
Hay nakki khara asata ka ya babat shankach aahe.
On 12/10/2009 9:41 AM Manasi said:
These serials should be banned , as people will start trusting on " Punar Janma" and this will make people more superstitious . I think all these stories shown are just imaginations. No one should belive such storeis.
On 12/10/2009 9:25 AM misal mhasu said:
हि सर्व धूळफेक आहे
On 12/10/2009 9:03 AM onkar said:
अश्या सेरीअल्स काढून public madhe andhshraddha pasarvili jat ahe. Ani lok tyala bali padat ahe.
On 12/10/2009 8:14 AM sachin said:
लोकांना रिकामा वेळ भरपूर मिळतो आहे म्हणून हे चानेल वाले टीआरपी वाधाविण्यासती त्याचा उपयोग kartak
On 10/12/2009 05:08 Kishor Patel said:
Please band these kind of serials who leads to support superstitions. Our society already has enough of them, we dont need new.
On 12/10/2009 3:11 AM raju said:
ह्या रवी किशन च्य थोबाडीत द्या हरामखोर आहे साला बिहारी
On 12/10/2009 12:47 AM sachin said:
बंद करा रे reality shows काहीही फालतूपणा करतात
On 12/10/2009 12:38 AM victor said:
eki kade sarakar andhshraddha mulatun upatanyachya goshti karate, ani dusari kade he asale dhande bare chaltat. sach ka samana madhye aleli ekahi vyakti samajat adaraniy sthan milavu shakaleli nhavati. sagale lok ashech hote, jyanna kasahi karun paisa kinva prasiddhi havi hoti.
On 12/9/2009 11:42 PM swarupa said:
बकवास!!!
On 12/9/2009 8:57 PM Amol said:
एकदम बकवास मालिका आहे हि.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: