फॅमिली डॉक्टर क्लब सदस्यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्स
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 31, 2009 AT 02:03 PM (IST)
कोल्हापूर - "फॅमिली डॉक्टर क्लब'च्या सदस्यांची चौथी व्हिडिओ कॉन्फरन्स शनिवारी (ता. 2) होणार आहे. कॉन्फरन्समध्ये "मधुमेह' विषयावर डॉ. शैलजा काळे आणि डॉ. रमेश गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी चार ते पाच आणि साडेपाच ते सहा अशा दोन टप्प्यांत ही कॉन्फरन्स होणार असून
कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक येथील क्लबच्या प्रत्येकी पन्नास सदस्यांना यात प्रवेश असेल. "कॉन्फरन्स'मध्ये सहभागी होण्यासाठी सदस्यांनी प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. कोल्हापूरमध्ये अजित तांबेकर यांच्याशी 9881129249 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. "सकाळ'च्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयामध्ये याचे आयोजन केले आहे. एका सदस्य कुटुंबातील दोन व्यक्तीस प्रवेश दिला जाईल. या "कॉन्फरन्स'चे प्रक्षेपण "साम मराठी' वाहिनीवरून होणार आहे.