Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वैमानिकांच्या आरोग्यासाठी एरोस्पेस मेडिसीन विकसित
सकाळ वृत्तसेवा
Friday, January 01, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: vidarbha,   nagpur,   medical,   pilot

नागपूर - हवाईदलातील वैमानिकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्यात येत असून, दोन वर्षांपूर्वी एव्हीएशन मेडिसीन तर बंगळूर येथे एरोस्पेस मेडिसीन इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली आहे. जगातील मोजक्‍याच देशांमध्ये अशाप्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून, त्याद्वारे हवाईदल अधिक सुदृढ ठेवण्यास मदत मिळते आहे, अशी माहिती आर्मी मेडिकल कॉर्पचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल आर. सी. कश्‍यप यांनी आज दिली.

आर्मी मेडिकल कॉर्प्स 1 जानेवारी रोजी 246 वा स्थापनादिन साजरा करीत आहे. त्यानिमित्त पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी आर्मी मेडिकल कॉर्पचा आजवरचा प्रवास सांगितला. 1 जानेवारी 1764 रोजी इस्ट इंडिया कंपनीने बंगाल येथे मिलिटरी मेडिकल सर्व्हिसची स्थापना केली. त्यानंतर 1976 मध्ये मद्रास आणि 1779 मध्ये मुंबई येथे मिलिटरी मेडिकल सर्व्हिसेसची स्थापना झाली. त्यानंतर 1886 साली या तीनही सर्व्हिसेस एकत्रित करून इंडियन मेडिकल सर्व्हिसेसची स्थापना झाली. आज लष्करी वैद्यकीय सेवा या प्रधान संस्थेच्या नियंत्रणाखाली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सकरिता स्वतंत्र वैद्यकीय सेवा कार्यरत आहेत. तर, सुमारे 75 हजारांहून डॉक्‍टर सेवेत आहेत, अशी माहिती कश्‍यप यांनी दिली.
देशातील कोणत्याही सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सर्व उपचार पद्धती आर्मी मेडिकल कॉर्पमध्ये आहेत. लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांट, कर्करोग उपचाराकरिता अत्याधुनिक उपकरणे अशा सुपरस्पेशालिटी सुविधादेखील आहेत, असे त्यांनी सांगितले.

कारगिल युद्धानंतर वैद्यकीय सेवांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या काय, असे विचारले असता एअर व्हाईस मार्शल कश्‍यप म्हणाले की, जवानांना सीमेलगत वैद्यकीय उपचार मिळावे त्याकरिता रुग्णालये आणि मोबाईल रुग्णालयेदेखील उपलब्ध करून दिली आहेत. सियाचीन भागात जवानांकरिता विशेष किट तयार करण्यात आली आहे. याशिवाय वैमानिकांचे पोषाख हे बंगळूर येथील एरोस्पेस इन्स्टिट्यूट येथे प्रमाणित केल्यानंतरच ते वापरण्यात येत आहेत. संशोधन आणि विकास या क्षेत्रात आर्मी मेडिकल कॉर्प्स विशेषत्वाने भर देत आहे, असे श्री. कश्‍यप यांनी सांगितले. याप्रसंगी संरक्षण विभागातील जनसंपर्क अधिकारी संदीप मेहता उपस्थित होते.
Madhu Milan


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: