Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

(बि)घडली की! : 'अप्प्या'चा उपमा
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 04, 2010 AT 05:19 AM (IST)
Tags: food,   recipes,   enjoy

मी सगळ्या प्रकारचे अप्पे करते. रव्याचे अप्पे, किवीचे अप्पे, मनुकांचे अप्पे, आंब्याचे अप्पे, सीताफळाचे अप्पे... गोड अप्पे तर असतातच, पण काही जणांना गोड आवडत नाही, म्हणून त्यांच्या सांगण्यावरून तिखट-मिठाचे अप्पेही मी करते. तेही वेगवेगळ्या पद्धतीने... कर्नाटकी, कोकणी... खरं तर अप्पे करायला वेळ लागत नाही, फक्त तयारीला वेळ लागतो. कित्येक वेळा दोनेक तासांत सव्वाशे ते दीडशे अप्पे मी एकटीने केले आहेत.

असे हे हात बसलेले अप्पे करण्याचा घाट एकदा मात्र मी घातला आणि तो पुरता फसला. पहिल्यांदाच पाहुणे येणार होते, म्हणून मी अप्पे करणार होते. नेहमीप्रमाणे सगळी तयारी केली आणि पाहुणे यायच्या थोडी आधी अप्पे करायला बसले. पण...
मी जे करत होते, त्याचा आकार अप्प्याचा होता, पण नेहमी होतो तसा अप्पा हलका होत नव्हता. आतून ढोकळ्यासारखा मोकळा होतो, तसा होत नव्हता. चहाबरोबर तिखट-मिठाचे अप्पे छान लागतील म्हणून मी ते डबाभर केले होते. पहिल्यांदाच पाहुणे येणार, त्यांना आता काय द्यायचं? माझा मूडच गेला.

डोकं जरा भणभणलं म्हणून चहा घ्यावासा वाटला. डोक्‍यात विचार चालूच होते. चहा संपता संपताच एक छान गोष्ट सुचली...
अप्प्यांचे तुकडे करून ते मिक्‍सरमधून काढले. एका कढईत तेल घेऊन राई, जिरे, हिंग, किंचित हळद, कढीपत्ता व कांदा बारीक चिरून घालून चांगला परतला. नंतर टॉमेटो बारीक चिरून घातला. अप्प्यांत तांदूळ आणि डाळी, तिखट, मीठ, आलं, मिरची, खोबरं सर्व घातलं होतंच. त्यामुळे मी जास्त काही घातलं नाही. झालेल्या पदार्थाच्या वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव घालू या असं मी ठरवलं. पाहुण्यांसोबत लहान मुलं होती. मुलांना सजवून दिलं तर आवडीने खातात.

मी मग बाऊलमध्ये खोबरं, कोथिंबीर, शेव आणि काजू घातले. त्यावर आप्प्यांचा परतलेला चुरा (रवाळ) दाबून त्याची मूद पाडून दिली. सर्वांना बघूनच पदार्थ आवडला. परंतु मी बिघडलेल्याची सुधारलेली पाककृती, असं अजिबात बोलले नाही.

सगळे गेल्यावर मी विचार करायला लागले, काय चुकलं? आणि लक्षात आलं, मी थोडा फ्रुट सॉल्ट घालायला विसरले होते. त्यामुळे घोटाळा झाला.
पट्टीच्या सुगरणीचाही एखादा पदार्थ बिघडतो. पण बिघडला म्हणून हातपाय गाळून बसण्यात काय अर्थ? तो सुधारला आणि सगळ्यांना आवडला, यातच तर कौशल्य! एखादा पदार्थ बिघडला म्हणून फुकट जाऊ न देता त्याचाच दुसरा सुंदर खाण्यासारखा पदार्थ तयार करते, तीच घरची सुगरण!!

- सुनीता शेंडे, गोरेगाव
Madhu Milan
प्रतिक्रिया
On 6/7/2010 2:48 PM gaurikulkarni said:
Mala हि पद्धत कुपाच आवडली असेच नवीन पदार्थ बवायला शिकवा मेजवानी तर्फे.
On 6/5/2010 10:56 AM raj said:
he asale denyavhi garaj nahi , ledyies la kahi kam nasate , uth suth pakkruti kam kara kam polya hi chalatil उगाच नवर्याला घाण्याचा बैल करू नका, आप्पे करते त्यासाठी जरा काम करा म्हणजे कळेल सोडा ते पाककृती karan
On 4/6/2010 1:07 PM shalvi said:
इ लीके अ न्यू प्रिपरेतिओन .
On 4/6/2010 1:02 PM archana said:
मीही eकडा ढोकला केला होता पण त्यात सोडा घालायचा विसरले त्यामुळे ढोकला निब्बर थोडा झाला होता म्हणून मला एक idea सुchaली .मी त्या वड्या पिठ्लेव्द्यासारखे फोडणी दeवून वरुणा खोब्राखीस व खसखस टाकून गरमागरम सर्वे केले सवाना खूप आवडले.
On 2/10/2010 9:49 AM mansi said:
मी सुधा तुमच्या सारखेच प्रयोग करून बघते चांगला प्रतिसाद मिळतो
On 1/27/2010 8:56 AM वैशाली संजय कदम,कोलकाता said:
खरच ग बाई मला तुमची रेसेपी खूपच आवडली. तुम्‍ही अशीच नवनवीन रेसेपी देत जा. तुमच्‍या या शुभकार्यासाठी मी शुभेच्‍छा देते.
On 24/01/2010 00:28 sasonkar yardena israel said:
सुनीता मला तुमचा लेख खूप आवडला पाधार्थ बिघडला म्हणून कचर्यात नाहीना फेकलात हे महत्वाचे माझी आई म्हणायची पाधार्थ बिघडला तर परत परत करून पहायचा म्हणतात खावून माजावे टाकून नाही आणि आप्यांची रेसेपी जरूर लिहा मी करून पाहीन आम्ही जू लोक पण आपया सारखा प्धार्थ करतो त्याला आम्ही सांदण म्हंतो गोड किवा साखर टाकून करतो सासोन्कर यार्देना इस्राईल
On 1/23/2010 5:40 AM radha marathe said:
पदार्थाच्या कृतीपेक्षा तो बिघडला तर काय करावे हे सांगणे जास्त महत्वाचे. ते सहसा कुणी सांगत नाही. तुम्ही ते किती छान सांगितले आहे. अनुभवी आणि अननुभवी सर्वच गृहिणींना याचा उपयोग होईल.
On 1/18/2010 8:50 PM meena said:
छान आहे. मला तर खूप आवडला हा पदार्थ !!
On 1/15/2010 2:18 PM Vaishali said:
how to make aappe. All receipies from sakal really guide us to make the things perfectly. e.g. Yesterday, Gul poli was very nice
On 07/01/2010 15:51 namrata potdar said:
खरच खूप छान. बिघडलेल्या पाककृतीतून नवीन छान पाककृती तुम्ही केली. हि पाककृती मी नक्कीच बनविणार आणि सर्वाना खायला घालणार.
On 1/5/2010 4:10 PM sushama deshmukh said:
वावावावा सुनीती काकू, किती छान ! म्हणजे एकाच लेखात पाककला आणि विनोद सुद्धा . म्हणजे अगदी सव्यसाचीच कि. माझे एक दिवंगत नातेवाईक -- ज्यांना आम्ही "अप्पा " म्हणायचो -- ते जेव्हा हा पदार्थ बनवायचे तेव्हा आम्ही लहान मुले काय म्हणत असू ? ओळखा बरे ? "अप्पांचे आप्पे" हाहाहाहाहा
On 1/5/2010 2:22 PM su said:
kharch chhan
On 1/5/2010 1:17 PM rama said:
विष्णू... तुमची प्रतिक्रिया एकदम आवडली. मी आणि माझे 'हे' खूप हसलो. आणि सही मारली आहे तुम्ही.. :)
On 1/5/2010 1:04 PM vaishali said:
कृपया आप्पे कसे बनवायचे ते सांगा , mala appe khup avadtat pan banavta nahi yet, please appe recipies post kara
On 1/5/2010 11:45 AM vishnu said:
आग बाई!!! लएच भारी ......


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
Powered By: