Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दोन अब्ज डॉलर कमाईचा नवा 'अवतार'
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 02, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: avatar,   hollywood,   film

लॉस एंजल्स - जगभरातील सिनेरसिकांना भुरळ घातलेल्या जेम्स कॅमेरून दिग्दर्शित "अवतार' या हॉलिवूडच्या चित्रपटाने कमाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. रविवारअखेर या चित्रपटाने विक्रमी दोन अब्ज डॉलरचा गल्ला गोळा केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून सलग सात आठवडे हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थानावर टिकून असल्याचे चित्रपटाचे वितरक ट्‌वेन्टीथ सेंच्युरी फॉक्‍स ने म्हटले आहे.

"अवतार'ने मागील सोमवारी जेम्स कॅमेरून यांनीच दिग्दर्शित केलेल्या "टायटॅनिक' (1998) चित्रपटाने केलेला 1.843 अब्ज डॉलर्स कमाईचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रम केला. 120 देशांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. लवकरच ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत. चित्रपटाला तांत्रिक गटासह जास्तीत जास्त नामांकने अपेक्षित आहेत. कॅमेरून यांची पूर्व पत्नी कॅथरिन बिग्लो हिने दिग्दर्शित केलेल्या "द हर्ट लॉकर' या युद्धपटाशी "अवतार'ला स्पर्धा करावी लागणार आहे. कॅमेरून यांच्या "टायटॅनिक'ला 14 मानांकने मिळाली होती. उत्कृष्ट चित्रपट व दिग्दर्शनासह 11 ऑस्कर या चित्रपटाने मिळवले होते.
प्रतिक्रिया
On 3/8/2010 10:41 PM Vishwas said:
one of the gretest movie in the world......lage raho avatar..
On 2/23/2010 2:23 PM shashi said:
जर आजही आपले काका आणि शबाना अज्मिचा चा अवतार 3D मध्ये बनविला तर याहून हि जास्त गल्ला गोळा करेल. काका तो काका ही रे
On 2/7/2010 10:31 AM l said:
अजून सविस्तर हवे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: