Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मी निरुत्तर - मंगेश पाडगावकर
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 05, 2010 AT 12:30 AM (IST)

मुंबई -  ''पद्म पुरस्कार मिळण्याबाबत मी व्यक्त केलेल्या मनोगतावर कवी ना. धों. महानोर यांनी "सकाळ'मध्ये केलेले भाष्य वाचून मी निरुत्तर झालो आहे. त्यांनी जे काही लिहिले, त्यावर मी काही बोलण्यापेक्षा, माझ्यावर, माझ्या कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच बोलणे योग्य ठरेल,'' अशी भावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी आज "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

संगमनेर येथे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात पाडगावकर यांनी भारत सरकारचा पद्म पुरस्कार न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. कवितेची निस्सीम सेवा करूनही अद्याप शासनाने दखल न घेतल्याची बोचही पाडगावकरांनी या वेळी बोलून दाखवली होती. हे पुरस्कार कसे मिळतात, हेदेखील आपल्याला माहीत असल्याचे विधानही त्यांनी या वेळी केले होते.

पाडगावकर यांनी पद्म पुरस्कारांबाबत व्यक्त केलेल्या मनोगतावर प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करणारा महानोर यांचा लेख "लाचावले मन, लागलीसे गोडी' या शीर्षकाखाली आज (ता. 4) "सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाला. त्यावर मी काय प्रतिक्रिया द्यायची, असा प्रतिप्रश्‍न पाडगावकरांनी केला आहे.

---------------------------------------------
''ऐंशीव्या वर्षीही मी गावोगावी कवितांचे कार्यक्रम करतो ते कवितेच्या प्रेमापोटी अन्‌ तीवर असणाऱ्या निस्सीम श्रद्धेमुळेच. त्यात चूक ती काय? या विषयावर आपणास अधिक काहीही बोलायचे नाही.''
- मंगेश पाडगावकर
---------------------------------------------

प्रतिक्रिया
On 2/6/2010 5:20 PM sushant sangwe said:
mulat Mangesh padgavkar yanchyavirodhat lihun 'Nadho' yanni mothi chuk keli aahe, yakade jankaranche durlaksh hou naye.....! पद्म कसे मिळते हे हल्ली सर्वांना ठाऊक आहे. त्याच पद्धतीने नाधोनाहि नक्की मिळेल. (पाडगावकर यांच्या आधी )
On 2/5/2010 7:20 PM ashok said:
खर तर मंगेश सरांनी अपेश्या करायला नको होत कारण ते खूप मोठे आहेत.
On 2/5/2010 4:46 PM kaustubh k said:
माध्यमांना आज काल उपहास, टिंगल, टीका यातील फरक समजेनासा झालय. पाडगावकरांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ न समजल्याने इतका गोंधळ होतोय. आणि महानोरान्नी तर, कुणीतरी त्यांना फ़ोनवरून काहीतरी ऐकविले, (ते सुद्धा का? माहित नाही) व तेच ऐकून अक्खा लेख पाडला. इंग्रजीत याला "guity conscious" असं म्हणतात...
On 2/5/2010 4:22 PM sandeep said:
पाडगावकरांचा बरोबर आहे. त्यांना पुरस्कार आधीच मिळायला हवा होता. नको त्या फालतू लोकांना पुरस्कार दिला जातो आपल्या देशात आणि महान लोकांना डावलला जातो ?? अरे काय चाललाय काय हे ??
On 2/5/2010 4:08 PM vishal bagkar 9764059865 said:
''ऐंशीव्या वर्षीही मी गावोगावी कवितांचे कार्यक्रम करतो ते कवितेच्या प्रेमापोटी अन्‌ तीवर असणाऱ्या निस्सीम श्रद्धेमुळेच. त्यात चूक ती काय? जर अस असेल तर मग पुरस्काराची अपेक्षा का धरता ? हल्ली हा पुरस्कार सगळ्यांनाच दिला जातो तुम्ही तर कवी श्रेष्ट आहात !
On 2/5/2010 3:16 PM satyawan said:
पाडगावकरांच्या कविता अशा आहेत कि त्यांना पद्म पुरस्काराची काहीच गरज नाही. आणि एखादा पद्म पुरस्कार नाही मिळाला म्हणून त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. रसिकांनी तुम्हाला तो केंवाच दिलेला आहे. पण असे विधान करणे बरोबर नाही.
On 2/5/2010 2:19 PM anand gadgil said:
महानोर यांनी पूर्वी एकदा गालिब यांच्या पेक्षाही आपण मोठे आहोत असेही म्हटले होते तेव्हा प्रतिक्रिया आलेली होती ती सांगतो : कानामध्ये वारे गेलेला रानामधला एक कवी, म्हणतो मधुर मधापेक्षा माझी काकवीच बरी!!!
On 2/5/2010 12:18 PM आशिष said:
महानोर,कर्णिक यांनी प्रत्यक्ष पाडगावकराना भेटून त्यांचे मत कळवले असते तर वेगळे होते,चार-चौघात घाणेरडे शेरे मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली!महानोर तर फारच खालच्या पातळीवर घसरले,त्यांनी या पुरस्कार वाटण्याच्या प्रक्रियेला green signal dila. padgavkarana puraskar न milata Rekha ani Saif yana puraskar milato? he chuk ahe ani te sangtana kasali laj vatavi?mahanor ase sudha mhanatat ki mi tyanchya kadhi kali paya padun abhinandan kele होते! mhanaje kay?tyatsudha tyana swatache mothepan dakhavayache ahe
On 2/5/2010 10:16 AM sham said:
पाडगावकरांचे बोलणे फक्त महानोरानाच का लागले. चोराच्या मनात चांदणे म्हणतात ते असे. पाडगावकर यांचे वय झाल्यामुळे ते कठोर सत्य बोलले एवढेच ते फार मनावर घ्य्ण्यासारखे नव्हते दुसरे म्हणजे त्यांच्या बहिरेपानावरील टीका असभ्यापानाची आहे, बाळासाहेब ठाकरे असे बोलले असते तर महानोर त्यांच्यावर टीका करायला सर्वात पुढे आले असते.
On 2/5/2010 10:04 AM स्वराज पाटील said:
पाडगावकर बोलले ते विद्वेगाने, लोक त्याचा भलताच अर्थ काढीत आहेत. आणि एक कलाकार बोलणार नाही तर मग कोण बोलणार . आणि महानोर हे फक्त कवी म्हणून ठीक आहेत. आणि ते आमदार कशे झाले होते तो इतिहास आठवला तर एवढे कळेल कि पाडगावकर यांच्यावर टीका करण्याची त्यांची लायकी नाही. काल मोठा कठीण आहे.
On 05/02/2010 09:21 atul said:
पद्म पुरस्कार मिळणे हे आता काही भूषणावह राहिले नाही... हे पुरस्कार संपूर्णपणे राजकीय स्वरूपाचे असून, मंगेश पाडगावकारांसारख्या सृजन कवीने त्याची अपेक्षा करावायास नको होती; किमानपक्षी आपल्या वैयक्तिक भावना सार्वजनिक कार्याक्रामध्ये बोलून दाखवायला नको होत्या... त्यामुळे महानोरांनी लिहिलेला लेख काही अगदीच मुद्दा सोडून लिहिलेला नाही आहे असे म्हणावेसे वाटते...
On 2010/02/05 9:05 Garajach kai? said:
सर मला तुमच्या कविता प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतात. तुम्हाला कुठली पारितोषिके मिळाली आहेत वगैरे पाहून मी तुमच्या कविता वाचत नाही. केवळ आवडतात म्हणून वाचतो. तुम्ही इतके महान कवी आहात कि तुमच्या नावाने पुरस्कार दिले गेले पाहिजेत. तुम्ही कशासाठी पुरस्कार हवा असे म्हणत आहात? त्याने काय तोटा आणि फिदा होणार आहे तुमचा? हा आपला अट्टाहास आपल्याच सलाम नावाच्या पुस्तकात मांडलेल्या विचारांच्या विरोधात जात आहे असे मला वाटते...
On 05/02/2010 08:51 swaty.thakar@gmail.com said:
जो न मागे तयाची रमा होय दासी !मला आठवते पूर्वीचे संत कवी राजे राजवाड्यापासून लांब राहून साधना करत. आणि त्यांनी काव्य साधन मानले .तेव्हा जनसमुदाय भक्कम पणे त्यांच्या पाठीशी होता .किंबहुना काही संतानी तर सन्मान नाकारले .हे चित्र ऐकायला आणि वाचायला खूप छान वाटते .तुमची खंत योग्य असेलही पण मार्ग चुकीचा होता .कोल्ह्याला द्राक्ष आंबट वाटावी असा होता .महानोर ,कर्णिक यांनी योग्यच लिहिले आहे. एक घाणेरडी प्रथा या निमित्ताने पडली एवढे नक्की .किमान महानोर ,कर्णिक यांनी बोलून दाखवण्याचे धाडस केले,छान झाले .
On 2/5/2010 8:29 AM Rahul said:
अहो, या पुरस्कारांचा खूपच सूळसुळाट झालाय...आणि तुम्हाला तर साऱ्या रसिक श्रोत्यांनी आधीच "पद्म" पुरस्कार दिलेला आहे...आणि त्यांची संख्या तर वाढतच राहणार आहे....मग सरकार च्या "पद्म" पुरस्काराची चिंता कशाला ?
On 2/5/2010 4:31 AM abhay said:
आरे आरे ! वैट! पद्म न मिळाल्याची खंत व कवितेच प्रेम भिन्न. कार्णिक नि महानोर यानी तेच लिहाले आहे. आणी अधिक काहीही बोलायचे नाही हेच बरोबर.
On 2/5/2010 12:56 AM Dr.Shirish said:
माननीय मंगेशजी पाडगावकरांच अगदी बरोबर आहे. हे शासन कोणाही "लुंग्या-सुंग्याला" जर का पद्मा खिरापतीसारखे वाटत असेल आणि ते मिळविण्यासाठी काय काय क्लुपत्या लढवाव्या लागतात ते पाहून पद्गाव्कारांसारख्या जेष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांचे मन उद्विग्न होणे अगदीच स्वाभाविक आहे! त्यावर श्री.ना.धों. महानोरांनी केलेले भाष्य अनाठायी आहे असे वाटते.
On 2/5/2010 12:43 AM akira said:
a person of such a stature should not seek awards. Awards are for people like Saif Ali Khan, not like you Mr Padagaonkar.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: