झारखंडमध्ये माओवाद्यांनी लोहमार्ग उडविले
पीटीआय
Tuesday, February 09, 2010 AT 11:28 AM (IST)
रांची - झारखंडमधील गिरीध जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटे दोन ठिकाणी माओवाद्यांनी लोहमार्ग उडविल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
माओवाद्यांनी प्रथम पारसनाथ रेल्वे स्थानकाजवळ सुरुंगाच्या स्फोटाने सुमारे सहा मीटर लोहमार्ग उडविला. यानंतर माओवाद्यांनी कर्माबाद रेल्वे स्थानकावर स्फोट घडविला. या दोन्ही ठिकाणी लोहमार्ग दुरुस्तीचे काम सुरु आहे. माओवाद्यांच्या हल्ल्यांचा झारखंडमधील रस्ते व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात गाड्या रद्द आणि सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. माओवाद्यांनी तीन दिवस झारखंड, बिहार, ओरिसा आणि पश्चिम बंगाल राज्यांत बंद पुकारला आहे.