मोहोळमध्ये पोलिस स्टेशनसमोर वृद्धाची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 11:20 AM (IST)
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे महादेव सोंडगे (वय ७०) या वृद्धाने पोलिस स्टेशनच्या कुंपणाच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली.
या वृद्धाचा मुलाविरुद्ध चरितार्थ चालविण्यासाठी पोटगीसाठी खटला चालू आहे. त्याचे मानसिक संतुलन ढळल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी गेल्या शनिवारी त्यांनी मोहोळ न्यायालयाच्या आवारातील झाडाला टांगून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.