Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा डावाने पराभव
वृत्तसंस्था
Tuesday, February 09, 2010 AT 04:49 PM (IST)
Tags: sports,   cricket,   india,   south africa

नागपूर - डेल स्टेनने सामन्यात मिळविलेल्या  दहा बळींमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्य़ात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव व ६ धावांनी पराभव केला. भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावात केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानाला धोका निर्माण झाला आहे.
 
भारताकडून या सामन्यात वीरेंद्र सेहवाग व सचिन तेंडुलकरने नोंदविलेल्या शतकांचा अपवाद वगळता एकही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. सचिनने कसोटी कारकिर्दीतील ४६ वे शतक झळकाविले.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात केलेल्या ५५८ धावांसमोर भारताचा डाव डेल स्टेनच्या गोलंदाजीपुढे २२९ धावांत संपुष्टात आला होता. यामुळे भारतावर फॉलोआॅनची नामुष्की आली होती. दुसऱया डावातही भारताची तिसऱया दिवसाखेर २ बाद ६६ अशी अवस्था झाली होती. आज सकाळी मुरली विजय आणि सचिन तेंडुलकर यांनी २ बाद ६६ वरून पुढे खेळण्यास सुरवात केली. पॉल हॅरिसने सकाळी लवकर मुरली विजयला बाद करीत दक्षिण आफ्रिकेला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यानंतर आलेल्या बद्रीनाथला पार्नेलने बाऊचरकरवी झेल बाद करीत भारताला आणखी धक्का दिला. यानंतर सचिन आणि धोनी यांनी डाव संभाळत पाचव्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. सचिनने आज १३ चौकारांच्या साहाय्याने शतकी खेळी केली. त्यानंतर लगेच दुसऱया चेंडूवर सचिनला हॅरिसने त्रिफळाबाद केले. यानंतर एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले व भारताला डावाने पराभव स्वीकारावा लागला. दोन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेत १-० अशी आघाडी मिळविली आहे.
प्रतिक्रिया
On 2/9/2010 11:23 PM Aditya said:
आपण फक्त बँटिँगला दोष देतो त्याला काही अर्थ नाही.आपली बाँलिँग फारच खराब झाली आहेँ.team india must improve its balling
On 2/9/2010 11:17 PM balaji said:
कळत नाही भारतीय खेळाडू असे का खेळतात, कधी कधी वाटते इंडिया न. १ आहे , आणि कधी वाटते बांगलादेश पण आपल्याला भारी आहे. ओके हे घडत राहत खेळामध्ये . पण सचिन आणि सेहवाग चांगले खेळले .
On 2/9/2010 10:25 PM Ganesh Pawar said:
सचिन आऊट झाला आणि आम्ही आता टीका करायला मोकळे बाकी येते काय हो आम्हाला , ४६ शतकी खेळी खाऊ वाटला काय २० वर्ष जो माणूस खेळत आहे त्याला फलंदाजी कशी करायची ते शिकवायला चालले कधी आयुष्यात क्रिकेट चे मैदान बघितले आहे का
On 2/9/2010 10:03 PM Dipak Kadam said:
Congratulations to litter master Sachin Tendulakar for complete your 46 century. Daro mat dosto picture abhi baki hai...........
On 2/9/2010 10:02 PM arbhaat said:
वा! फारच विनोदी आहे साचीनावरची टीका! अरे इतरांनी देखील "स्वतःच्या" शतकांसाठी खेळायला माझी काहीच हरकत नाही. होऊनच जाऊदे. प्रत्येकाने स्वतःच्या रेकॉर्ड साठी खेळा म्हणावे. काय माहीत, कदाचित भारत जिंकेलाही? हरला तरीही हरकत नाही. हे जेंव्हा घडेल तेंव्हा विचार करूया सचिन वर टीका करण्याचा, कसे?
On 2/9/2010 9:49 PM ganesh said:
आपण चुका मधून काही हि शिकत नाही हा इतिहास आहे. आपली batting फक्त कागदावर आहे. आपल्या मध्ये जिद्द नाही. सर्व जण स्वतः साठी खेळतात तेंव्हा संघाचा कसा विजय होणार? पहिल्यांदा जाहिरात मधून काम करायला बंदी आणा. नवीन खिलाडूना साध्या हॉटेलात ठेवा. Fielding मध्ये जास्त लक्ष ठेवा. जो Practice ला येणार नाही त्याला घरी पाठवा. क्रिकेट मध्ये कोणाचे लाड नको. हरभजन सिंग, शर्मा ला काढून टाका. एवीतेवी आपण हरणारच आहोत तर नवीन खेळाडूना संधी द्या.सचिनवर जास्त अवलंबून नको.तो चांगला खेळतो यात वाद नाही.
On 2/9/2010 9:48 PM Milind said:
congrats for Sachin's 46th Century....
On 2/9/2010 8:54 PM onkar said:
बांगलादेश आणि साउथ आफ्रिका यांचा मध्ये फरक आहे रे धोनी...
On 2/9/2010 8:34 PM Arvind said:
Once again we have shown that with pace attack from opposite side, our batsmen can't withstand pressure. Both Viru & Sachin scored century but it did not help team to avoid defeat. Yesterday Viru had scored 12 run in one over before he was out in same over by reckless shot. He should have played further and not attacking bowlers all time like one day. Finally our batsmen do't play for India but play for Indivisual record & this is our greatest Tragedy in Indian Cricket.Very very poor show.
On 2/9/2010 8:04 PM Marathi Manus said:
माझ्या मित्रांनो (सचिन विरोधक ) यांना विनंती की उगाच matchहरल्याचा दोष सचिन वर का म्हणून आणावा .............त्याने थोडी तरी चव राखली ..............अक्कलीचा भाग विकला कि काय तुम्ही लोकांनी ..................सचिन mhan खेळाडू आहे ...........tya बद्दल vadch nahi
On 2/9/2010 8:03 PM Yogesh Patil said:
सचिन आज फक्त शतक होण्यासाठी टिकून खेळला असा वाटलं....... सचिन भाऊ त्यात गैर काय ...? Ponting माघे लागला आहे त्याचे. सचिन ने 2०० धावा केले असते तर की फरक पडला असता ?
On 2/9/2010 7:42 PM sachin said:
सचिन आज फक्त शतक होण्यासाठी टिकून खेळला असा वाटलं.
On 2/9/2010 7:41 PM amol said:
दक्षिण आफ्रिका जबरदस्त टीम आहे नंबर १ ची खरी टीम तीच आहे ............ सेहवाग,सचिन,झहीर चांगले खेळल्या बद्दल अभिनंदन ....... वेल played boys
On 2/9/2010 7:40 PM Yogesh Patil said:
सचिन ने अजून १०० रुन्स केले अस्ते तर का इंडिया जिंकला असता का ? २इंनिंग मध्ये १०० करणे सोप्पे नाही .... त्याने भारता ची लाज थोडी तरी राखली. सचिन तू महान आहेस ... महान लोकांवरच जळणारे टीका करता ...
On 2/9/2010 7:26 PM Rahul said:
सहजा सहजी हरलो नाही...गोलंदाजांनी सुद्धा प्रयत्न केले...आणि संघात प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती हे हारण्याचे कारण...पण धोनी पुढच्या सामन्यात परतफेडच करेल...कारण त्याच्या कारकिर्दीतील हा पहिलाच हरलेला सामना आहे ना...?
On 2/9/2010 6:35 PM Raj Patil said:
ओउ!!! गजानन पाटील...म्हणजे सचिन जर ९९ वर आउट झाला असता तर त्याची खेळी खूप चांगली होती असे म्हणायचे काय तुम्हाला...? बाकीच्या १० लोकांनी काय केले ते सांगा...? सचिन ची हि सलग ३ टेस्ट मधील ३रि शतकी खेळी आहे...एखाद्याच्या कास्ठला अशी दाद देवू नेये...तुम्ह्च्या बोलण्याचा सरळसरळ अर्थ असा आहे कि सचिन मुलेच भारत आज हरला आहे...!खरे तर भारताला आपल्याच निवड समितीने असला संग निवडून हरविले आहे...
On 2/9/2010 6:14 PM hrishikesh said:
मिस्तर Gajanan पाटील, आपली अक्कल पाजळू नका. इथे बसून बोलणे सोपे आहे. सचिन कायम देशासाठीच खेळत आला आहे. एवढे तरी कोणी खेळले का आज?
On 2/9/2010 5:54 PM vk said:
सचिन ने त्याचे काम केले.झुंज दिली.तरीही त्याच्यावर टीका करणारे डोम कावळे आता जागे होत आहेत.स्वतः काही करायचं नाही आणि इतर महान लोकांवर जाळायचं ही यांची वृत्ती.सचिन ला देव म्हणून डोक्यावरही घेवू नका त्यालाही मर्यादा आहेत मात्र तो महान खेळाडू आहे हे खुल्या दिलाने मान्य करा.
On 2/9/2010 5:54 PM T.Ram said:
सचिनचे ४६ वे शतकामुळे हरल्याचे काही नाही .
On 2/9/2010 5:43 PM Gajanan Patil said:
Another useless hundred by Sachin....which has no meaning!!! Sachin lost his wicket only after reaching hundred....that indicates Sachin plays Only for Century...not to Save or win the Test Match!!!
On 2/9/2010 5:35 PM harish said:
प्रत्तेक सामना आपण जिंकलाच पाहिजे अस तर होणार नाही .पण आज आपल्या फलंदाजांनी निराशा जनक कामगिरी केली पण शतकवीर सचिनच मनापासून अभिनंदन .
On 2/9/2010 5:33 PM रामशास्त्री प्रभुणे said:
भारताने कसोटी क्रिकेट मध्ये आपले वर्चस्व अनेक वेळा सिद्ध केलेले आहे. एखादा सामना हातातून गेला म्हणून एवढे निराश व्हायचे कारण नाही. राहुल द्रविड आणि लक्ष्मण हे फक्त सामना अनिर्णीत ठेवण्या साठीच उपयुक्त ठरतात. द्रविड १९२ चेंडूत ८५ धावा आणि लक्ष्मण १५९ चेंडूत ५४ धावा. जिगरबाज खेळी करणे दोनोंके बसकी बात नही.
On 2/9/2010 5:25 PM mahesh jadhav said:
भारतात ब्वालर कुठेच मिळत नाहीत का? झहीर सूडून बाकीच्यांनी क्रिकेट सोडून दुसर काही तरी कराव.सचिनच मनापासून अभिनंदन .
On 2/9/2010 5:13 PM Pratap Gaikwad said:
Sachin is Best Batsman than other batsman in World. He is Very Powerful & Talented Batsman in Indian Team. Thanking for your 46th Century. All the best for next Match.(and do the Another century 47th.)
On 2/9/2010 5:05 PM Swapnil said:
बाकीचे खेळाडू टीम मध्ये काय करतात हे आंपण पाहिलेच..... बिचारा सचिन एकटा खेळला तरी टीकाकार त्याच्याच नावाने शंख करतात.. म्हणजे खेळलात तरी रडारड ...आणि नाही तरी ही...
On 2/9/2010 4:57 PM Balasaheb Dalvi said:
दक्षिण आफ्रिका नंबर १ टीम आहे सेहवाग,सचिन झहीर चांगले खेळले badluck next time
On 2/9/2010 3:56 PM sandeep said:
दक्षिण आफ्रिका जबरदस्त टीम आहे नंबर १ ची खरी टीम तीच आहे ............ सेहवाग,सचिन,झहीर चांगले खेळल्या बद्दल अभिनंदन .......
On 2/9/2010 3:46 PM Rameshwar Chaudhari said:
सचिन तू ग्रेट आहेस, असाच खेळत राहा. तरुण क्रिकेटर नि काहीतरी शिकायला पाहिजे सचिन पासून, लवकरच १०० चे शतक कर.
On 2/9/2010 3:37 PM sandeep said:
दक्षिण आफ्रिका जबरदस्त टीम आहे नंबर १ ची खरी टीम तीच आहे ............ सेहवाग,सचिन,झहीर चांगले खेळल्या बद्दल अभिनंदन .......
On 2/9/2010 3:05 PM santosh dalvi said:
well done sachin.Tu asach khelat raha.Jyani kadhi galli cricket dekhil khelale nahit te dekhil salla kasa kay deoo shaktat.
On 2/9/2010 2:47 PM MANGESH said:
SACHIN IS ONE OF THE BEST BATSMAN IN THE WORLD THIS IS ONCE AGAIN PROVED YA ALTHOUGH WE ARE AT LOOSING SIDE BUT WAY HE BATS IS AMAZING.
On 2/9/2010 2:38 PM Raj Patil said:
द्रविड आणि लक्षिमन ची कसोटी क्रिकेट ला किती गरज आहे हे यातून दिसून येते... दुसर्या डावात शतकी खेळी करणे वाटते तेवढे सोपे नाही आणि तेही आफ्रिकन टीम च्या विरुद्ध...! आत्ता विरोधक सचिन वर टीका करायला मोकळे...शतक केले पण भारत जिंकला कुठे? पण म्हणून काय एवढी चिवट खेळी वाया गेली का?
On 2/9/2010 2:21 PM rahul said:
फुकट गेले शतक ........... स्वार्थासाठी खेळतो आहे..... खेळपट्टी वर टिकून राहणे महत्वाचे होते शतक नाही........ त्यासाठी राहुल द्रविडच हवा .....
On 2/9/2010 2:13 PM Sachin's Fan said:
Ithape प्रवीण....अहो बाकीच १० प्लायेर्स कशासाठी आहेत... एकदा सचिन तेंडूलकर चा रेकॉर्ड विकिपीडिया.ऑर्ग वर चेक करा आणि मग तुमची प्रतिक्रिया द्या... १९३ मध्ये त्याचे १०० रन्स आहेत..अहो तुमची एकाच काम २ वर्ष केलात तरी कंटाळता आणि तो गेली वीस वर्षे खेळत आहे...ते पण त्याच स्पिरीट ने...सचिन ने केलेल्या शतकामुळे भारत जिंकतो ते विसरतो... आणि लवकर ओउत झाला कि मात्र त्याला शिव्या घालतो... कधीतरी स्वतामध्ये झाकून बघा कि तुम्ही एवढ्या कॉन्सिस्तान्त्ली एखादे काम केले आहे का आणि मगच बोला...
On 2/9/2010 1:59 PM datta said:
He was worried about his century only.
On 09/02/2010 13:49 महेश आखाडे said:
आज हिदुस्तानाला पठान सारख्या अष्टपैलुंची गरज आहे.
On 2/9/2010 1:40 PM Ithape Pravin said:
This is a travesty, how long has this happened, so many times. He got the 100, record, got out. Who cares if India loses. Why are people cheering so much for the 100? India is losing
On 2/9/2010 1:38 PM Ithape Pravin said:
He gets out soon after completing his century. No doubt he is one of the best in the world. When there is a need to save the match, he is noway in the picture. Kallis, Ponting, Jayawardena, Mohd Yousuf are certainly different.
On 9/02/2010 1:26 PM Ajit said:
सचिनचे मनापासून ४६व्या शतकाबद्दल अभिनंदन...........म्हातारा अजूनही तरुणांना लाजवेल असा खेळत आहे
On 2/9/2010 12:12 PM Ithape Pravin said:
"Another century for Sachin in the second innings will go waste as no other batsman were successful and Indian media will say - Sachin cant help India win matches! sad! "


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: