Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

केंद्र सरकारने बीटी वांग्याला परवानगी नाकारली
पीटीआय
Tuesday, February 09, 2010 AT 05:24 PM (IST)

नवी दिल्ली - बीटी वांगी बाजारात येण्यापूर्वी त्याची स्वतंत्र चाचणी घेतल्याशिवाय केंद्र सरकारकडून या वांग्याला परवानगी देण्यात येणार नसल्याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी आज (मंगळवार) सांगितले.

रमेश म्हणाले, "बीटी वांग्याचा संबंध अन्नपदार्थाशी व वातावरणाशी निगडीत असल्याने त्याच्यावर विचार होणे आवश्‍यक आहे. या वांग्यांवर अधिक अभ्यासाची गरज असून, तज्ज्ञांची मते जाणूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत बीटी वांग्याला परवानगी देण्यात येणार नाही. देशातील अकरा राज्यांमध्ये बीटीपासून बनविलेल्या भाज्या खाल्या जात आहेत.
प्रतिक्रिया
On 2/9/2010 8:11 PM Janardan Mali Mumai said:
"बीटी वांग्याचे तंत्र संपूर्ण देशी आहे, त्यांच्या मुलीने आठ वर्षे यावर संशोधन केलेले आहे,जनतेच्या आरोग्य व हिताशी कधीही प्रतारणा करणार नाही" असे शेती शास्त्रद्न्य डॉ.बारवाले म्हणतात. त्यांच्य़ा प्रामाणिकपणा बद्द्ल बिलकुल शंका घेण्याचे कारण नाही. त्यांनी ठामपणे जाहिर करावे की ही बीटी वांगी त्यांनी स्वतः, त्यांच्या कुंटुंबियानी, नातेवाईकांनी गेली आठ वर्षे खाल्लेली आहेत व त्यांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.असे विधान बीटी वांग्यासंदर्भात धोरणनिश्चिती करण्यास निश्चित उपयोगी पडेल असे वाटते.
On 2/9/2010 7:55 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
जयराम रमेश यांनी ह्या योजनेला विरोध करत असलेल्यांना बैठकी मधून फेकून देण्याची धमकी दिलेली होती. अशा उर्मट मंत्र्याला ही चांगली चीक्षा मिळाली. आता ते या प्रश्नावर अधिक अभ्यासाची गरज आहे असे म्हणत आहेत. प्रश्न आहे तो ही अक्कल त्याना ही धमकी देण्या पूर्वी का आली नाही?
On 2/9/2010 7:17 PM Raj Patil said:
अहो सगळे खरे आहे...संकरीत अन्नपदार्थ खाणे चांगले नाही पण काय करणार...आपली लोकसंख्ये केवढी आहे...आणि मग लोकांच्या पोटाची खळगी कशी भरणार? संकरीत उत्पादनाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आपल्याकडे...!


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: