Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जळगावात पाणीपट्टी दुप्पट; घरपट्टी दीडपट
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 01:07 AM (IST)
जळगाव - महापालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली करवाढ काहीअंशी कमी करून स्थायी समिती सभेने पाणीपट्टी दुप्पट; तर घरपट्टी दीडपटीने आकारणी करण्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. तब्बल आठ वर्षांनंतर ही वाढ करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी गटाचे सभागृह नेते रमेश जैन यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी या करवाढीस विरोध दर्शविला आहे.

महापालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी घरपट्टीत दुप्पट; तर पाणीपट्टीत तिप्पट वाढ सुचविली होती. करवाढीस नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. मात्र, सत्ताधारी गटाने करवाढ काहीअंशी कमी केलेली असली, तरी मोठ्या प्रमाणात ती कायम ठेवली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती राजकुमार अडवानी यांनी 496 कोटी 66 लाख 66 हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यात करवाढीचे प्रस्ताव देण्यात आले आहेत.

पाणीपट्टीकरात दुप्पट वाढ सुचविण्यात आली आहे. सद्यःस्थितीत घरगुती पाणीपट्टीकर वार्षिक 806 रुपये आहे. आता ती 1,612 रुपयांप्रमाणे आकारणी करण्यात येईल, तर घरपट्टी करयोग्य मूल्याच्या 10 टक्‍क्‍यांप्रमाणे आकारणी करण्यात येत होती. आता ती 25 टक्‍क्‍यांप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागासाठी आता ती 806 रुपये आकारणी करण्यात येईल. यापूर्वी ती 400 रुपये दराने आकारणी करण्यात येत होती. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचेही नागरिकांना आश्‍वासन देण्यात आले आहे. महापालिकेच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर मेहरुण व पिंप्राळा या भागात दोन मोठी रुग्णालये बांधण्यात येणार आहेत. घरकुल योजना पूर्ण करून घरकुलांच्या विक्रीचे धोरणही त्यांनी जाहीर केले आहे.

सहाव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव
महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी निधी राखीव ठेवला होता. स्थायी सभेने मात्र तो फेटाळला आहे. याबाबतची तरतूद त्यांनी रद्द केली असून, ते आम्ही देऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.

औद्योगिक वसाहतीसाठी पाच कोटी
औद्योगिक वसाहतीतील रस्ते, गटारांच्या विकासकामांसाठी प्रशासनाने पाच कोटी रुपये प्रस्तावित केले होते. ती तरतूद स्थायी समिती सभेनेही कायम ठेवली आहे.

थिएटरसाठी प्रचंड बोजा
चित्रपट व नाट्यप्रदर्शन करात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. चित्रपटासाठी प्रति "शो'च्या दरात तब्बल तिप्पट वाढ करण्यात आली आहे. प्रति "शो'चा दर 15 रुपये ऐवजी आता 50 रुपये करण्यात आला आहे. नाटक व आनंदमेळ्याच्या "शो' दरात तब्बल दोनशे पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ती 15 रुपये आकारण्यात येत होती. आता ती 500 रुपये प्रति 'शो'प्रमाणे आकारण्यात येणार आहे.

अशी आहे सध्याची, प्रस्तावित स्थायी सभेने मंजूर केलेली कराची स्थिती
कराचे नाव प्रशासनाचे प्रस्ताव स्थायी सभेचे कर सध्याचे दर
1) सामान्य कर 40 टक्के 25 टक्के 15 टक्के
2) पाणीपट्टी 2,418 रु. 1,612 रु. 806 रु.
3) साफसफाई 10 टक्के 08 टक्के 04 टक्के
4) रस्ता कर 10 टक्के 03 टक्के 1.5 टक्का
5) विशेष साफसफाई 10 टक्के 04 टक्के 01 टक्का
6) मैला प्रवाह 10 टक्के 04 टक्के 02 टक्के
7) वृक्षकर 01 टक्का 01 टक्का 0.5 टक्का
8) मोठ्या इमारती 10 टक्के 05 टक्के
प्रतिक्रिया
On 2/9/2010 7:14 PM Roshan Patil. said:
1) सामान्य कर 40 टक्के 25 टक्के 15 टक्के 2) पाणीपट्टी 2,418 रु. 1,612 रु. 806 रु. 3) साफसफाई 10 टक्के 08 टक्के 04 टक्के 4) रस्ता कर 10 टक्के 03 टक्के 1.5 टक्का 5) विशेष साफसफाई 10 टक्के 04 टक्के 01 टक्का 6) मैला प्रवाह 10 टक्के 04 टक्के 02 टक्के 7) वृक्षकर 01 टक्का 01 टक्का 0.5 टक्का 8) मोठ्या इमारती 10 टक्के 05 टक्के ९} अजून काही कर नाहीत का ते ही लावा, मणजे शेतकरी अजून आत्महत्या करतील ? रोषण पाटील


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: