'१८५७ चे स्वातंत्र्य समर' ग्रंथ सवलतीत मिळणार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 21, 2010 AT 12:00 AM (IST)
पुणे - जागतिक मातृभाषा व जागतिक मराठी दिनानिमित्त ग्राहक पेठेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित "१८५७ चे स्वातंत्र्य समर' हा ग्रंथ साडेतीनशे रुपयांऐवजी शंभर रुपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. या कार्यक्रमानिमित्त २१ ते २७ फेब्रुवारी हा सप्ताह "उत्सव मराठी मनाचा' म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त खास थालीपीठ, भाजणी, मेतकूट, तळलेली मिरची, चकली, शेवया, पापड, कुरडई, महाराष्ट्रीयन मसाले व मराठी कॅलीग्राफी टी शर्ट दहा टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक व प्रा. अनिल गोरे यांनी कळविली आहे.