Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सूर्य तापण्यासाठी झाला सज्ज !
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 03, 2010 AT 01:52 AM (IST)
जळगाव - दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदाचा हिवाळा खूपच दिलासादायक ठरला आहे. संपूर्ण ऋतूत तब्बल 46 दिवस 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहिल्याने जिल्हावासीयांना खऱ्या अर्थाने गुलाबी थंडीचा अनुभव घेता आला. फेब्रुवारीअखेरपर्यंत मेहेरबानी करणाऱ्या हिवाळ्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असून, जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.

एव्हाना 15 ऑक्‍टोबर ते 15 जानेवारी या कालावधीतच हिवाळा जास्त जाणवतो. मात्र, गेल्या तीन वर्षांची स्थिती पाहता हिवाळा केव्हा लागला अन्‌ केव्हा संपला, याचाही पत्ता लागत नव्हता. त्यातही संपूर्ण ऋतूत मोजून 15 दिवस मोठ्या मुश्‍किलीने कडाक्‍याची थंडी पडायची. तुलनेत यावर्षी हिवाळा अगदी वेळेवर सुरू झाला आणि पंधरा दिवस उशिराने संपला. अर्थात, महिन्याच्या अंतराने नियमितपणे हजेरी लावणारा अवकाळी पाऊसही त्यास कारणीभूत ठरला. 31 ऑक्‍टोबरला पहिल्यांदा रात्रीचे तापमान साडेनऊ अंशापर्यंत घसरवून थंडीने जोरदार सलामी दिली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये साधारण सहा दिवस साडेआठ ते दहाच्या दरम्यान तापमान राहिले. डिसेंबरमध्येही जवळपास 11 दिवस साडेसात ते नऊच्या दरम्यान तापमान राहिले; तर जानेवारीत पावसाळी वातावरण थोडे निवळल्याने तब्बल 26 दिवस रात्रीचे तापमान 10 अंश सेल्सिअसवर गेलेच नाही. या काळात सातत्याने कडाक्‍याची थंडी जाणवली. फेब्रुवारीची सुरवात झाल्यावर हिवाळा निरोप घेईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात थंडीने मार्च येण्याची वाट पाहिली. संपूर्ण फेब्रुवारी पारा 12- 13 अंशाच्या वर गेला नाही.


थंडीचे फायदे
उशिरा पेरणी झालेल्या पिकांना लाभ.
थंडी, हिरव्या चाऱ्यामुळे दुग्धोत्पादनात वाढ.
तापमान कमी राहिल्याने जनजीवन सुरळीत.
पाणीटंचाई उशिराने जाणवण्यास सुरवात.
पंखे आणि कुलरला सक्तीची विश्रांती.

महिना 10 अंशांपेक्षा कमी तापमानाचे दिवस
(2008) (2009)
नोव्हेंबर ------ सहा
डिसेंबर सात दिवस 11
जानेवारी ------ 26
फेब्रुवारी ------ तीन

""गेल्या तीन वर्षांपासून हिवाळा खूपच कमी प्रमाणात जाणवत होता. संपूर्ण ऋतूत जेमतेम आठवडाभरच थंडीचा कडाका जाणवायचा. मात्र, यंदा तब्बल 46 दिवस थंडी मुक्कामी राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. विशेषतः रब्बी पिकांसाठी पोषक स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम उत्पादनवाढीवर होऊ शकतो.''
-प्रा. एच. एस. महाजन, निरीक्षक वेधशाळा ममुराबाद.
प्रतिक्रिया
On 3/12/2010 10:59 PM pradeep said:
हिवाळा आला कि १९७० पर्यंत आम्ही शेकोट्या चा अनुभव घेत असू . नंतर बाकी हळू हळू हिवाळा कमीकमी होत चालला आहे असे जाणवायला लागलेले आहे. त्याचे कारण वृक्ष तोडी मुळे असे कित्येक जन झन मानत आलेले आहेत.पण आता असे दिसते कि निसर्गाची मर्जी असेल तेव्हा तुम्हाला तो season उपभोगायला मिळतो .या वर्षी जळगाव जिल्हा मजेत राहिला .पुढच्या वर्षी काय होईल ते सांगता येत नाही. ग्लोबल warming च्या ऐवजी global cooling तर होत नाहीय .आत्ताच पुन्हा पावसाळा सुरुझाला . गम्मतच आहे .कि haiti च्या भूकंपाने पृथ्वी चा axis बदल
On 3/12/2010 5:05 PM urmila said:
देव अशीच कृपा सदैव करो


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: