Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मराठी साहित्यातही 'पायरसी'चा शिरकाव
संतोष धायबर (santosh.dhaybar@esakal.com)
Wednesday, March 03, 2010 AT 12:40 AM (IST)
पुणे - जगभरातील प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकांना "पायरसी'चा मोठा फटका बसतोच; परंतु "पायरसी'ची झळ आता मराठी पुस्तकांनाही बसू लागली आहे. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे यांची पत्नी विनिता यांनी लिहिलेल्या "टु द लास्ट बुलेट' या पुस्तकाची "पायरेटेड' प्रत सध्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने "पायरसी'ने आता मराठी पुस्तकांचा उंबरठा ओलांडला असल्याचे उघड झाले आहे.

मुंबईवरील हल्ल्यात अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, मुंबईतील दहशतवादविरोध पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, "चकमकफेम' पोलिस निरीक्षक विजय साळसकर शहीद झाले होते. कामटे यांच्यावर आधारित "टु द लास्ट बुलेट' या इंग्रजी पुस्तकाचे "अमेय प्रकाशन'तर्फे २४ नोव्हेंबर २००९ रोजी, तर मराठी आवृत्तीचे २२ डिसेंबर २००९ रोजी प्रकाशन झाले. हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी बुलेटप्रूफ जॅकेटचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे खळबळ उडाली होती. अल्पावधीत पुस्तकाला भरपूर प्रसिद्धीही मिळाली. त्यामुळे "पायरसी'च्या बाजाराचेही पुस्तकाकडे लक्ष वेधले गेले असण्याची शक्‍यता आहे. सध्या मुंबईत काही ठिकाणी "टु द लास्ट बुलेट' या पुस्तकाच्या "पायरेटेड' प्रती मिळत आहेत. पुस्तकाचा दर्जा, फोटोंवरून हे पुस्तक "पायरेटेड' असल्याचे सहज लक्षात येते.

याबाबत पुस्तकाचे प्रकाशक उल्हास लाटकर म्हणाले, "पायरेटेड' प्रतींची माहिती नुकतीच समजली. पायरेटेड पुस्तकाच्या काही प्रती हातात आल्या आहेत. "पायरसी'च्या आक्रमणाविरुद्ध सर्व घटक संस्थांनी मिळून एकत्रितपणे उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.''

मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता म्हणाले, "पायरसी'कडे सरकारने लक्ष द्यायला हवे, यामुळे सरकारचाच मोठ्या प्रमाणात महसूल बुडतो. पोलिसही याकडे दुर्लक्ष करतात. "पायरसी'विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिस घेत नाहीत. कडक कायदे केले, तरच याला वचक बसू शकेल.''

लेखिका विनिता कामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

कसे ओळखाल पायरेटेड पुस्तक?
- हलक्‍या प्रतीचा कागद
- छायाचित्रांचा दुय्यम दर्जा
- पुस्तकाचा लहान आकार
- छपाई, बांधणी सुमार दर्जाची.
प्रतिक्रिया
On 3/3/2010 6:11 PM cyberdaku@gmail.com said:
पायरसी वाईट आहे मान्य आहे.. पण आम्हाला परवडत नाही हो.. २०० पानाचे पुस्तक ५०० रुपयामध्ये घ्याला त्याला आम्ही तर काय करणार ??? तेच पुस्तक जर आम्हाला १०० रुपल्याला मिळाले तर आम्ही का घेऊ नये.. ह्यावर साधा उपाय सुचावतो.. तुमच्या पुस्तकाची किंमतच ५० रुपये ठेवा.. त्यात सुद्धा तुम्ही नफा कामु शकता.. पण तुम्ही असे नाही करणार आणि म्हणून आम्ही पायरसी वाले पुस्तक विकत घेणार..


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: