Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'पुढारी'पणाचा अट्टहास मोडणार 'सकाळ'
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, March 10, 2010 AT 12:00 AM (IST)
व्यक्‍तिद्वेषी, समाजविरोधी धिंगाण्याला ठाम विरोध
कोल्हापूर - वृत्तपत्राचे काम असते समाजाला पुढे नेण्याचे, दिशा देण्याचे, चांगले घडविण्याचे. याउलट एखादे वृत्तपत्र तथाकथित "मार्केट लीडरशिप'च्या आवरणाखाली समाजाला मागे खेचणारी आणि मटक्‍या-गुटख्यासारख्या मोहात अडकविणारी भूमिका घेत असेल आणि तरीही "पुढारी'पणाचा दावा करीत असेल, तर त्याला विरोध करायलाच हवा. "हम करे सो...' वृत्तीने गेली काही दशके कोल्हापुरात सुरू असलेला धिंगाणा आता बस्स झाला. हा धिंगाणा आणि "पुढारी'पणाचा अट्टहास मोडून काढण्याचा निर्धार "सकाळ'ने केला आहे.

कोल्हापूरची जनता साक्षीला आहे. "पुढारी'ने पत्रकारितेला आणि वाचकांच्या स्वातंत्र्याला हरताळ फासणारे किती प्रयोग कुठल्या थराला जाऊन केले. वृत्तपत्रांनी समाजातल्या चांगुलपणाला बळ द्यावे, अंधश्रद्धा मोडून काढाव्यात, काही परंपरा, विचारधारा पाळाव्यात, ही अपेक्षा असते. तिला मातीत घालण्याचे काम रोज आपण अनुभवत आहोत. वृत्तपत्रांची स्पर्धा आज सुरू झाली आहे आणि या स्पर्धेत उभे राहण्याची आणि जिंकण्याची धमक "सकाळ'मध्ये आहे. कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढायची "सकाळ'ला गरज नाही. मुद्दा वृत्तपत्रांच्या स्पर्धेचा नाही आणि विक्रेत्यांच्या सुरू असलेल्या बहिष्काराचाही नाही. त्याचा समाचार वाचकच घेत आहेत. मुद्दा समाजाच्या व्यापक हिताचा आहे, वाचकांच्या स्वातंत्र्याचा आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा आहे, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेल्या स्वैराचाराला रोखण्याचा आहे. वाचकांनी आज "सकाळ'ऐवजी घरात टाकलेला पुढारी विक्रेत्यांना परत देऊन पुढारीच्या दादागिरीला "कोल्हापुरी झटका' दिला आहे. कोल्हापूरकर या दादागिरीला का कंटाळले, त्यालाही एक कारण परंपरा आहे. म्हणूनच वाचकांचा हक्क अबाधित राखण्यासाठी "सकाळ' या लढाईत उतरला आहे.

काय घडविले "पुढारी'ने आणि काय बिघडविले, याचा लेखाजोखा कधीतरी मांडायलाच हवा. कोल्हापुरात सूर्यही आमच्याच परवानगीने उगवला पाहिजे, हा उद्दामपणा राजर्षी शाहूंच्या विचारांवर पोसलेल्या मर्दांच्या नगरीत किती काळ चालू द्यायचा, यालाही मर्यादा आहेत. सुरवात करूया मटक्‍यापासून. मटका हा रोग आहे. समाज नासवणारी कीड आहे. तरीही रोज तो छापणारच आणि त्या आकड्यांच्या जिवावर खपाचे आकडे फुगविणार, हा अट्टहास किती काळ पाहायचा? मटक्‍याने अनेकांची घरे, संसार उद्‌ध्वस्त केले. अनेकांना आत्महत्येच्या आत्मनाशी मार्गावर आणून सोडले. तरीही मटका छापणारच, असा अट्टहास करणाऱ्या दैनिकाला आपल्या घराच्या उंबऱ्याच्या आत येऊ द्यायचे की नाही, हा मुद्दा आहे. जे मटक्‍याचे तेच गुटख्याचे. "सकाळ'ने ना कधी मटका छापला, ना गुटख्याचा पुरस्कार केला. "पुढारी'पणा करणाऱ्या वृत्तपत्राचे मात्र त्याशिवाय पाऊलही पुढे पडत नाही.

ताठ मानेच्या आणि कण्याच्या पत्रकारितेला धंदेवाईकतेचे ग्रहण कोणी लावले, ते या कोल्हापुरात वेगळे सांगायला नको. निवडणुकांतच नव्हे तर वर्षभर हाच धंद्याचा मार्ग बनविणारे असे वृत्तपत्र जगाच्या पाठीवर कुठे नसावे. विरोध आहे तो या सवंगपणाला.

माझे ऐकत नाही त्याला मोडून काढू. त्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करू, असली टोकाची व्यक्तिद्वेषी भूमिका मांडण्याला आणि त्याला प्रतिष्ठा देण्याला "सकाळ'चा विरोध आहे. दाखले अनेक आहेत. शिवाजी विद्यापीठात तत्कालीन कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांच्या विरोधात रान पेटविण्याचा "प्रताप' घडविण्यामागचे मूळ कारण काय? हे सारेच जाणतात. केवळ मुलाची परीक्षेची बैठक व्यवस्था बदलली नाही, यासाठी साऱ्या समाजाला वेठीस धरले गेले नव्हते काय? कोल्हापूरचा महापौरही मीच ठरविणार. एखाद्या गावचा सरपंचही मीच ठरविणार आणि आमदार-खासदार कोणी व्हायचे, हेही मीच ठरविणार, ही लोकशाहीलाच चूड लावणारी भूमिका किती काळ पाहत राहायची? ज्यांचा समर्थाघरचे श्‍वान असा उद्धार केला, तेच अचानक सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय असल्याचे या वृत्तपत्राला कसे वाटू शकते. कोलांटउड्या मारण्याचे यापेक्षा वेगळे उदाहरण कुठले असेल? खासगी स्वरूपाच्या वादातून एका होतकरू नगरसेवक तरुणाला महापौर होऊ द्यायचेच नाही यासाठी भाऊसिंगजी रोडवरून झालेला आटापिटा कोल्हापूर विसरलेले नाही. या सगळ्या उदाहरणांत कोणती तात्त्विकता होती.

या कोल्हापुरात माझ्यापेक्षा मोठा, सन्मानित कोणी असताच कामा नये, या अट्टहासाला आणि त्याच्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला आता कोल्हापूरची सुजाण आणि सुज्ञ जनता कंटाळली आहे. मला मानपत्र मिळाल्यानंतर जणू मानपत्रच बंद झाले पाहिजे, अशा स्वरूपाची विखारी भूमिका कोल्हापूरने पाहिली नाही का? आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत मुद्रा उमटविणारे ज्येष्ठ उद्योगपती आर. एम. मोहिते यांना मानपत्र देण्यावेळी झालेला थयथयाट कोल्हापूर विसरलेले नाही.

विकासाच्या कल्पना, काम उभे करणे, हा जगन्नाथाचा रथ असतो; पण कोल्हापुरात जे काही चांगले घडले, ते माझ्यामुळेच झाले, अशी टिमकी ऐकून कोल्हापूरकरांचे कान किटले नाहीत काय? ग्रामीण भागात एक म्हण आहे, ""आबाची गाडी, बाबाची बैलं, सख्या हाकणार आणि तुक्‍या बसणार.'' प्रत्येक वेळी साधनं जमा करायची दुसऱ्यांनी आणि हा "तुक्‍या' माझ्यामुळेच सगळं झालं, असं मिरवणार. मग मुद्दा कोल्हापूरच्या विकासाचा असो की, ऊस दराच्या आंदोलनाचा. ऊस दराचे आंदोलन माझ्याच टेबलवर मिटले पाहिजे, हा अट्टहास झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे चित्र रंगविले गेले. खरोखरच शेतकऱ्यांना ठरलेला दर मिळाला काय? असला रिकामा मोठेपणा काय कामाचा?

कोल्हापूरला पुरोगामी विचारांची बैठक आहे. त्यापायी कोल्हापूरने प्रत्येक काळात लढा दिला आहे. एकीकडे ती परंपरा सांगायची आणि दुसरीकडे जगाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्यासारख्या अशास्त्रीय थोतांडाचे उदो उदो करायचे, हे आपण पाहिले नाही का? फार जुने सोडून द्या. हुपरीत गुप्तधनाच्या शोधासाठी शेतात भुयार खणण्याच्या वेडाचाराला "ही अंधश्रद्धा आहे' हे स्पष्टपणे दिसत असताना त्याचेही समर्थन करण्याचा प्रकार नुकताच पाहिला नाही का? पवनचक्‍क्‍यांमुळे दुष्काळ पडतो, पवनचक्‍क्‍या पाऊस पळवून लावतात, अशा शोधाला याच वृत्तपत्राने एकेकाळी गाजविले होते. शासनाने नेमलेल्या ताकवले समितीने हा मूर्खपणा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. एवढेच नव्हे तर पुढच्याच वर्षी संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात हाहाकार उडविणारा धो-धो पाऊस पडला आणि पवनचक्‍क्‍यांमुळे पाऊस जातो, असले अशास्त्रीय खूळ नाचविणाऱ्यांचे पितळ उघड पडले

समाजस्वास्थ्य नावाची चीज असते आणि ती राखण्याची जबाबदारी वृत्तपत्रांचीही आहे, याचे भान अयोध्येच्या दंगलीपासून मिरजेतल्या दंगलीपर्यंत कधी तरी दिसले का? सुज्ञ आणि विचारी कोल्हापूरकराला याचे वैषम्य वाटत नाही काय?

व्यक्तिद्वेषातून अनेकांना मोडून काढणे असो की, समाजाला मागे खेचणाऱ्या विचारांचे समर्थन असो आणि हे सारे करून रोज वाचकांच्या माथ्यावर स्वतःचा मोठेपणा लादणे असो, या वाचकद्रोही भूमिकेचा ती घेणाऱ्या "पुढारी' आणि प्रतापसिंह जाधवांचा व्यक्ती किंवा संस्था म्हणून नव्हे, तर चुकीच्या गोष्टीला नकार म्हणून विरोध करायलाच हवा. "सकाळ' दंभस्फोट करतो आहे ते त्यासाठीच. यात ना स्पर्धेचा संबंध आहे, ना व्यक्तिगत आकस. आजवर सारीच साधनशूचिता गुंडाळून आम्हाला हवे तेव्हा, हवे तसे करू, हे यापुढे चालणार नाही. जी साधने समोरून वापरली जातील, त्याच साधनांनी उत्तर देण्यास "सकाळ' सज्ज आहे. "धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट', हाच विचार त्यामागे आहे. "पुढारी'पणापायी चाललेल्या या धटिंगणपणाला सामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सारे घटक कंटाळले आहेत. दबावतंत्राचा कधी ना कधी प्रत्येकाला त्रास झाला. अशा अकारण छळवाद सहन कराव्या लागणाऱ्या प्रत्येकाच्या मागे "सकाळ' ठामपणे उभा राहील. "त्या' वृत्तपत्राने विरोध केल्याने अकारण कोणी मोडून पडणार नाही, यासाठी "सकाळ'चा भक्कम आधार असेल. जाहिरात दिली नाही, अंकवाढ केली नाही, यासाठी असो, की एखादे नियमबाह्य काम नियमात बसविण्यासाठी असो, होणाऱ्या दमबाजीविरोधात "सकाळ' ठाम आणि आग्रही भूमिका घेईल. लोकांनीही आता दबावाला झुगारण्यास पुढे यावे. "सकाळ' तुमच्या पाठीशी आहे.

बांधूया बोक्‍याच्या गळ्यात घंटा
कोल्हापुरात वृत्तपत्राच्या बुरख्याआड अडवणूक नवी नाही. त्याचे अनुभव अनेकांनी घेतले आहेत. यात कित्येक जण होरपळले आहेत. अशा साऱ्यांना कधी तरी हे संपले पाहिजे, असे वाटते; पण बहुतेकांपुढे प्रश्‍न असतो "बोक्‍याच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी?' हे सहन करणे आता बस्स झाले. दबाव झुगारून देऊया. कोणतीही दहशत अनंत काळ चालत नाही. ठामपणे उभी राहिलेली समूहशक्ती त्याचा अंत करू शकते. चला तर बोक्‍याच्या गळ्यात घंटा बांधूया.

प्रतिक्रिया
On 3/11/2010 11:41 PM अमोघ केळकर ...अस्सल कोल्हापुरी..... said:
स्वतःचे कौतुक किती करावे याला पण काही मर्यादा असतात. सकाळने स्वतःचे कौतुक कधी केले आहे असे मला आठवत नाही.. पण पुढारी कारांनी आपल्या आईच्या निधनानंतरही स्वतःचे कौतुक करायची संधी सोडली नाही. त्यांच्या अंतयात्रेला कोण कोण आलेलं हे १० दिवस फोटोसकट पेपरमधून येत होत.... जे पेपरमध्ये..तेच यांच्या रेडिओवर... निदान आपोल्या आईला तरी सोडा ओ !!!
On 3/11/2010 10:57 PM Dipak, Karad said:
Waicharik Patrakarita kya aste ani bhasha hi samaj jodnari medium aste he bahuda Pudhari wisarla ahe. Lokmanyancha warsa aslele wa vikhari bhasha aslele patrakarita hya don waglya style ahet. samajyatil aplayla soiyechay nastil ashaya ghataka babat lekmala lihayche ani nantar tnychaya kadhunch paise gheue wadhdiwas vishesh ank kadhayche ha kasla dutapipana. Matkyache chart, Lucky draw kupane ani faltu gallichap batmya chapaycha ani khapacha uchank mhanayche he kasle patrakarita. Sakaal plz go on
On 3/11/2010 10:35 PM deshi said:
मी बरेच वर्षापासून सकाळ व पुढारी वाचत आहे. पुढारी हे दुय्यम दर्जाचे दैनिक आहे. उगीच फालतू बातम्या छापतात. पूर्वी पुढारीची बातमी म्हणजे "बोगस" अशी मानली जात असे. आताही त्यात फारसा फरक पडलेला नाही. आणि हो, कुठल्याही दैनिकाने आरक्षणाला सपोर्ट देणे अथवा विरोध करणे अशा गोष्टी करू नये. पुढारी ते करतो. हे खरे वृत्तपत्र नाही.
On 3/11/2010 10:13 PM Raju said:
सकाळ नि मनावर घेतले आहे , ते पूर्ण करा , खर सत्कार्य आहे. आजचा अंक खरा तर एका मनो विकृत माणसावर आहे हे कोनिहि मानेल. हि विर्कुती वेळीच गाडा.
On 3/11/2010 9:49 PM milind said:
सकाळ आज सकाळ झाली पुढारी चा दबाव झुद्कारून संस्कृती विरुद्ध असंस्कृती चा लढ्यात सकाळ संस्कृतीचा विजय झाला मिलिंद
On 3/11/2010 7:46 PM vikas surdi said:
best!
On 3/11/2010 7:03 PM VIVEK said:
मला सुद्धा एक अतिशय वाईट अनुभव आला आहे. मागे सोलापूर मध्ये रेल्वे अपघातात सहा शाळकरी मुले रुळावर मरण पावल्याची बातमी छापताना या पुढारी ने मधोमध येंका CATARER ची पोटभरून जेवण्याची जाहिरात छापली होती. तेंव्हा अत्यंत वाईट वाटले.तेंव्हा कळवूनही साधे उत्तर पाठविण्याची तसदी या पुढारी वाल्यांनी घेतली नाही.
On 3/11/2010 5:19 PM Abhijit said:
सकाळला शुभेच्छा. मला पुढारी कधीच आवडला नाही.. काय त्या बातम्या.. ह्याचा सत्कार त्याचा वाढदिवस.. फक्त गल्लीतल्या बातम्या.. अरे जगात, देशात काय चालले आहे, विज्ञानाने काय प्रगती केली आहे.. ते काही नाही.. फक्त भडक शब्दात काहीतरी लिहिणे.. बहुतेकवेळा एखाद्या व्यक्तीवर खासगी टीका करून त्याचे आयुष्य खराब करणे.. इतकेच. पुढारी वाचून कधी काही माहिती मिळाली असे कधी वाटलेच नाही.. आता सकाळवर कोल्हापूरकरान पर्यंत चांगली निरपेक्ष आणि निर्भीड माहिती पोहोचवायची महत्वाची जबाबदारी आहे..तो सकाळने तोल ढळू देवू नये
On 3/11/2010 5:04 PM vachak said:
झक्कास
On 3/11/2010 3:00 PM Dhananjay - Dubai said:
Yes close this Pudhari paper. For example If you see the internate paper - you will find in add colums about " make frienship". Why this Jadhav buggers are publishing such adds in news paper and after some days this people are shouting and writing the articles in news papers.......... what a stuped things....... close this news paper for god seek and for better human rights........ya jadhav & company la jode mara.........
On 3/11/2010 2:49 PM bhagwan Gawali,Pune said:
''सलाम'' ## सकाळ## ..... सर्व सकाळ वाचकांना नम्र विनंती आहे. पुढारी वाल्यांची एक वेळेस आमदारकीची उमेदवारी नाकारली तेव्हा पासूनचा हा थयथयात आहे.स्वतःचे ठेवायचे झाकून आणि शेजाऱ्याचे बघायचे वाकून. आणि स्वतःची पाठ स्वतः थोपटायची हेच धोरण आहे पुढारीचे त्यामुळे सर्व वाचकांनी च पुढारीवर बहिष्कार घालावा. शेम शेम पुढारी
On 3/11/2010 2:37 PM Bipin said:
सकाळ ला सर्व कोल्हापुर्कारंच पाठींबा आहे. रंकाल्यातला गाळ आणि रस्त्यावरचे खडडे ह्या पुढार्याला कधी दिसलेच नाही. नुसती लोकांची माथी भडकावून चालत नाही तर सामाज्प्व्योगी कामहि केले पाहिजे. धन्यवाद सकाळ. कृपया हि प्रतिक्रया पेपरमध्ये छापा आणि बघा किती मझे कोल्हापूर कर बांधव ह्या पुढार्याला नतमस्तक वीला लावताते.
On 3/11/2010 2:38 PM Sawan said:
चांगले लिहिले आहे, पटणारे आहे. काही गोष्टी मनासारख्या घडत गेल्या कि आत्मविश्वास वाढतो आणि असेच आणखी थोडे पुढे गेले कि अति-आत्मविश्वास - मस्ती येते. अगदी तसेच काहीसे 'पुढारी' बाबत झाले आहे. त्यांची पत्रकारिता काही प्रमाणात पुर्वागृहादोषित असते. 'माझे ऐकत नाही त्याला मोडून काढू' असले विचार तर सगळेच मिडीयावाले करत आहेत. सगळेच विसले आहेत कि वृत्तपत्र / मिडीया यांचे काम काय आहे ! लोकप्रबोधन,अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, समाज घडवणे हे यांनी सोडून दिले आहे. त्याचे एक उदाहरण 'पुढारी' आणि दुसरे ...?
On 3/11/2010 2:25 PM ek sanglikar said:
माझा एक अनुभव सांगतो,पुढारी-सांगली मध्ये एका अतिशयोक्तीपूर्ण बातमी साठी मी एक वाचक म्हणून नाराजी कळवली, तर तिकडून एखाद्या गाव गुंडा सारखी,खालच्या पातळीवर येऊन धमकीवजा भाषा वापरली गेली....
On 3/11/2010 1:18 PM Pratik Mane said:
sakal la amchya shubheccha.amhi tumachya barobar ahot.Hi gundagiri modun kadha Pudharichi.Ashlil Photo,Mataka,Gutakha,Ghanerada Kagad,Ghaneradi Chhapai,Asambadha Batamya,Andhale Vartankan.Ek changali gosht dakhvun dya pudharit.Geli anek varshe asach dhanda kela yani.Sakal ch fakta yanchi gundagardi modun shakto.Sakal la 1 vaicharik baithak ahe,te ek susanskrut,dolas,nirbhid,nipaksha vruttapatra ahe.Mhanun tyanchyat achat dhadas ahe.Sakal tumhi pudharichi ghan hatva kolhapuratun.
On 3/11/2010 1:14 PM Rahul said:
आरे "पुढारी" वाल्यांनो...त्या लोकसत्ता पेपर वाल्यांकडे कधी गेला आहात का तुम्ही? बाकीच्यांनी पेपरची किंमत कमी केली म्हणून त्यांच्या विक्रीत फरक पडत नाही; कारण आहे त्यांची गुणवत्ता. आणि तुम्ही "पुढारी"ला पुढाऱ्यांच्या बोटावर नाचणारे वृत्तपत्र बनवलंय. "पुढारी"त फक्त कुणाचे "उदो उदो" करण्याच्या,खुनाच्या,मटक्याच्या,दरोड्याच्या,किंवा दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या बातम्या असतात.समाजाला वाचायला आवडतील,समाजाचे प्रबोधन करतील अशा बातम्या कधी त्यांनी दिल्या आहेत का? आधी चांगले करायला शिका..मग असले उद्योग करा.
On 3/11/2010 1:05 PM Prasad said:
i liked your this report & initiative to rule out odds in Kolhapur. Many of your points mentioned above are valid. Mataka and GUtkha are true examples. Pudhari despite been popular and famous publication for so many years...is getting in to an extremist era. & hence someone needs to do/demonstrate : nir kshir vivek "
On 3/11/2010 12:29 PM Pankaj said:
pudhari mhanje saglyat phaltu paper (?) ya pratap che dukan kayamche band karun taka....kutrala gharatch bhunkat basu det
On 3/11/2010 12:27 PM amit said:
सकाळ ला कोण्याच्या हे सिर्तीफिकॅते ची गरज nahi , त्यामुळे सकाळ ने अश्या गोष्टी कडे लक्ष घालू नये . आम्हा वाचकांना सर्व गोष्टी कळतात .
On 3/11/2010 12:23 PM subhash sawant pune said:
प्रतापरावच्या बापाची जहागीरी आहे . का हो कोलाहापुरात सकाळ पेपर बंद करायला निगाला .लोकशाही . आहे भारतात समजल का निघाला ! सकाळ पेपर बंद करायला ! सकाळ पैसा घेउन . स्तंब लिहीत नाही . सकाळ सकाळ पेपर कुणाचा गुलाम नाही . तो गुलाम आहे फक्त लोकशाहीचा ! सकाळ सरका पेपर नाही दुसरा ! जय महाराष्ट्र !
On 3/11/2010 12:18 PM Avadhut Koparde said:
जरी विक्रेत्यांनी बंद केला तरी सकाळ चा खप कमी होऊ देणार नाही अशी खंबीर पावले सकाळने उचलावीत. सकाळ हा सुसंस्कुत नि सुविचारी लोकांचा पेपर आहे. याउलट पुढारी आहे. सकाळ ला या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शुभेच्छा. तुम सिर्फ आगे बढो बाकी अपने आप पीछे जायेंगे. All the Best...
On 3/11/2010 12:08 PM muskaan shaikh said:
hi dainikatil atishay jeevgheni spardha aahe. Pudharine je kahi kele te sakal ne sangitale. Pan sakal hi khahi dhutlya tandalasarakha swachcha nahi. He hi ya nimittane sangayachi garaj aahe. Sakal jase naitikatecha aav aanat aahe, ti naitikata sakal ne hi nivdanukichya kalat gamavali hoti, he hi vachakani lakshat ghyayla have. Aamhi samanya vachak aahot. Aamhala konte hi paper sakrakhach aahet. Pan asha padhdtine akadhya paprla Sakal jevha badnaam karto, tevha sakal chya hetuchi shanka yete.
On 3/11/2010 12:00 PM anil bedagkar said:
सकाळ च्या या धाडसाला आम्हा वाचकांचा सलाम ! आता अश्या अशास्त्रीय खूळ नाचविणाऱ्यांचे,स्वताहून टिमकी वाजवून घेणार्यांचे अनेक पितळ बाहेर पडतील,हे नक्की !
On 3/11/2010 11:54 AM anil bedagkar said:
खरोखरच शेतकऱ्यांना ठरलेला दर मिळाला काय? ......नाही मिळाला हेच सत्य आहे, नंतर "त्यांनी" चकार शब्दही काढला नाही,याच गुपित काय ?
On 3/11/2010 11:40 AM nphargude said:
प्रश्नः हा आहे की जर सकाळला रुपये १ मध्ये वृत्तपत्र देणे परवडत असेल ते देखील उत्कृष्ट प्रतीच्या स्वरुपात तर इतर वृत्तपत्रवाल्यांना हे का परवडू नये. लोकांना नाहक जास्त दरात वृत्तपत्र गळ्यात का मारले जाते.
On 3/11/2010 11:15 AM sagar bhat said:
मी आपल्या या विचाराशी सहमत आहे. मुंबई मध्ये सुधा असले प्रकार घडले. शिवडी मतदार संघामध्ये विनाकारण घाटी विरुद्ध कोंकणी वाद लाऊन दिला. मुळात हा वाद नसताना लोंकाच्या मनात भावना भडकून दिल्या. मला तर वाटते पद्नाश्री ग गो जाधव यांची पत्रकारीत्ता आणि सध्याची प्रताप जाधव यांची पत्रकारीत्ता खूप वेगळी वाटते. मुंबईमध्ये येण्याचे मुख्य कारण शिवसेनेला संपवणे, तसेच कॉंग्रेस चे गोडवे गाणे आहे.शाहू महाराजाचे विचार समाजाला जोडणारे होते,हे लाचार समाज तोडण्याचे काम करतात.
On 3/11/2010 11:10 AM Chandramohan Shinde said:
पुढारीच्या दादागिरीला कधीतरी विरोध करायला हवा. स्वत:ची आरती स्वत: ओवाळून घेण्याची परिसीमा झाली. ब्लाक्मेलिंग करून हप्ते वसूल करण्याची प्रथा या वृत्तपत्राने सुरु केली. कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक नेत्याने आपल्या कार्यालयाला भेट दिलीच पाहिजे हा यांच्या संपादकांचा हट्ट. मुख्यमंत्र्याने आपल्या घरी presentation दिल्याची शेखी मिरवून मुख्यमंत्र्यालाहि थिटे केले. फायद्यासाठी लांगुलचालनाच्या मर्यादेपलीकडे जाण्याची या संपादकांची तयारी. कुणी विरोधाचा सूर काढला तर त्याची बदनामी सुरु. हे बंद झाले पाहिजे.
On 3/11/2010 11:07 AM manisha said:
सकाळची भूमिका योग्य आहे.आम्ही सकाळशी सहमत आहोत.
On 3/11/2010 11:01 AM मंगेश बेंडखळे. said:
सलाम !!.....सकाळ च्या या खंबीर भूमिकेला. प्रतापसिंह जाधव मटक्याचे आकडे छापतात अन वर जाहिरात करतात आकडे बोलके असतात ..........पद्मश्री पण पैशे देऊन मिळवला हे कुणी सांगायची गरज आहे काय ???? मंगेश बेंडखळे. कडवे , शाहुवाडी कोल्हापूर
On 3/11/2010 10:55 AM अमोघ केळकर ...अस्सल कोल्हापुरी..... said:
ह्यांनी केलेले सर्वेक्षण म्हणजे थापा मारण्याची हाईट आहे...... पुढारीचा खप कोटी मध्ये... आणि बाकी पेपर न कसल तरी सर्तीफिकेटच नाही...... म्हणून त्यांचा खपच नाही... हे कोणत लॉजिक?? हीच गोष्ट विश्व संचार ची...... ह्याच्यापेक्षा "संध्यानंद" बरा, अश्या बातम्या इथ असतात... संध्यानंद, मिड डे आणि असलेच काहीतरी मसाला पेपर वाचून बातम्या छापणे म्हणजे पत्रकारिता का????? पत्रकारितेच सगळ्यात बेस्ट उदाहरण सकाळ आहे यात वादच नाही... मग जागर असुदे किंवा रंकाळा वाचविण्यासाठी केलेली मानवी साखळी.
On 3/11/2010 10:48 AM Hidayat ,India said:
पुढारी म्हणजे संध्यानाद चा दुसरा पर्याय झाला आहे.पामेला एन्डरसन आणी मल्लिका शेरावत शिवाय पाहोतो मिळत नाही प्रिंट करायला .घरी असा पेपर आई वडिलान समोर वाचायला लाज वाटते.
On 3/11/2010 10:47 AM अमोघ केळकर ...अस्सल कोल्हापुरी..... said:
"पुढारी....." हा पेपर आहे कि चेष्टा असा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडला आहे. गेली १० १२ वर्षे मी सकाळ वाचतोय.. आणि पुढारीपण... पण जे सकाळमध्ये आहे ते पुढारी मध्ये कधीच सापडणार नाही. सगळ्यात थर्ड क्लास क्वालीटीचा कागद वापरतात पुढारीवाले. कोड सोडवताना शाईचा पेन वापरला कि सगळ विस्कटत. जिथ पिक्चरच्या जाहिराती येतात तिथच मुंबई आणि कल्याण मटक्याचे आकडे पण छापतात. कायम स्वतःच्या नावाचा जयघोष..... पोस्टाच तिकीट छापलं तर आठवडाभर बोंबाबोंब करायची काहीच गरज नव्हती..


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: