Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मेक्सिकोचे स्लिम जगातील सर्वाधिक श्रीमंत
वृत्तसंस्था
Thursday, March 11, 2010 AT 09:59 AM (IST)
न्यूयॉर्क - मेक्सिकोतील उद्योपती कार्लोस स्लिम हे जगातील सर्वात श्रीमंत गृहस्थ ठरले आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस यांना त्यांनी दुस-या क्रमांकावर ढकलले आहे. गेल्या एका वर्षातच जगातील अब्जाधीशांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी आणि लक्ष्मी मित्तल हे भारतीय पहिल्या पाच अब्जाधीशांमध्ये आहेत, असे दरवर्षी श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध करणा-या फोर्बस या नियतकालिकाने म्हटले आहे.
 
जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत १९९५ पासून केवळ दोन अपवाद वगळता पहिल्या क्रमांकावर असणारे बिल गेटस यांना मागे टाकणा-या स्लिम यांची संपत्ती ५३.५ अब्ज डॉलर आहे. गेटस यांची संपत्ती ५३ अब्ज डॉलर असल्याचे या नियतकालिकाने म्हटले आहे. तिस-या क्रमांकावर गुंतवणूक गुरू वॉरन बफे आहेत. त्यांची संपत्ती ४७ अब्ज डॉलर एवढी नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या या तिघा उद्योजकांनी एकत्रित ६८ अब्ज डॉलरचे नुकसान सोसले होते. मात्र यंदा त्यापैकी ४१.५ अब्ज डॉलरची भरपाई त्यांनी केली आहे.
 
जगातील अब्जाधीशांची संख्या गेल्या तीन वर्षांत, आर्थिक मंदीमुळे कमी झाली होती. मात्र २०१० मध्ये त्यात वाढ झाली आहे. संपलेल्या वर्षात जगात १,०११ अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ७९३ आणि २००८ मध्ये १,१२५ इतकी होती. या अब्जाधीशांची संपत्ती गेल्या वर्षीच्या २.४ पद्म डॉलरच्या तुलनेत ३.६ पद्म डॉलरपर्यंत वाढली आहे. तथापि, २००८ मध्ये त्यांची एकत्रित संपत्ती ४.४ पद्म डॉलर होती.
 
प्रत्येक अब्जाधीशाकडे सरासरी ३.५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५०० दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. महिला अब्जाधीशांची संख्याही ७२ वरून ८९ वर पोचली आहे. मंदीतून जग सावरत असल्याने, अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ होत आहे, असे फोर्बसचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह फोर्बस यांनी सांगितले.
आशिया प्रशांत महासागर प्रदेशातील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स आणि पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल यांनी अपेक्षेप्रमाणे पहिल्या पाच अब्जाधीशांच्या यादीत नाव नोंदविले आहे. अंबानी यांची २९ अब्ज डॉलर, तर त्यांचा पाठलाग करणा-या मित्तल यांची संपत्ती २८.७ अब्ज डॉलर आहे.
प्रतिक्रिया
On 3/11/2010 7:48 PM MP said:
Satya katu asta,,,Satya bolala ki ZOMBTE!
On 3/11/2010 2:49 PM nagesh jahagirdar said:
हा पैसा हुशारीने आणि कष्टाने कमविला आहे , त्या मुले त्यांनी तो का लोकांना वाटावा....ज्या माणसात धमक नसते तो आशा वाटण्याचा गाप्पा करतो....
On 3/11/2010 2:45 PM Prasad said:
you are right RK....त्यांनी आपल्या मेहनतीने कमावलेला पैसा आहे त्यांनी तो त्यांच्या मर्जी ने वापरावा फुकट खायची आम्हा भारतीयांना सवय लागली आहे जनतेचाच पैसा जाणते साठी वापरला जात नाही तर त्यांच्या कडे कश्याला मागताय?
On 3/11/2010 2:14 PM RK said:
हा ज्याने त्याने कमावलेला पैसा आहे. गरिबांना वाटण्याची काही आवश्यकता नाही. ज्याने त्याने आपापला पैसा कमवावा. गरिबांनी आणि शेतकर्यांनी सुधा
On 3/11/2010 2:09 PM BigB said:
Why should they(Ambani/Mittal) use or donate their hard earned money to indian farmers or workers? How many of you donate a small part of your salary to NGO's across India?We all need to change our style of thinking and the way we act. All these billionarie people already given jobs to millions people across the globe. How can you forget this fact. As far as my knowledge concerns they all donate money to NGO's and Social Foundation across the globe.
On 3/11/2010 1:06 PM अतुल जोशी said:
एकीकडे फिरायला आलिशान गाड्या आणि दुसरीकडे प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही.....धन्य आहे उगवती महासत्ता.
On 3/11/2010 12:50 PM Manoj Gole said:
हे सगळे पैसे शेतकरी आणि कामगार यांच्या भल्यासाठी वापरा
On 11-03-2010 12:11:28 sakharam said:
वरील सर्व अधिकृत अब्जाधीश आहेत. इथे स्विस बँकेत पैसा असलेले बरेच अनधिकृत अब्जाधीश असतील. चोर साले सगळे नेते माराले पाहिजेत एक एक चौकात आणून,...
On 3/11/2010 12:04 PM bobby gorge said:
ये सब लोग एकसात मिलके एक khush हाल देश बनासकते हैं मगर हमारी सोच बदले tab na
On 3/11/2010 11:06 AM somnath said:
swise banket hachy hi pekesh jasta pasie bhartiyanchi aastil...
On 3/11/2010 11:01 AM anonymous said:
वरील सर्व अधिकृत अब्जाधीश आहेत. इथे स्विस बँकेत पैसा असलेले बरेच अनधिकृत अब्जाधीश असतील.
On 3/11/2010 10:40 AM Pat said:
यातील १०% संपती शेतकऱ्यांसाठी वापरली तर hindusthanateel shetkaree aaplya mulbhoot garja purna karu shakteel!! JAI HO...Raj साहेब kase nahi ya listmadhye?


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: