डॉ. मनमोहन सिंग यांना 'वर्ल्ड स्टेट्समन' पुरस्कार

वॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना "द अपील ऑफ फाउंडेशन'ने २०१० वर्षासाठी "वर्ल्ड स्टेट्समन' पुरस्कार आज (शुक्रवार) जाहीर केला आहे. हा पुरस्कार सप्टेंबरमध्ये देण्यात येणार आहे. भारताच्या राजदूत मीरा शंकर यांच्या निवासस्थानी अमेरिकेचे माजी उप परराष्ट्रमंत्री जॉन नेग्रोपॉंट यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी पुरस्काराचा स्वीकार केल्याचे मीरा शंकर यांनी सांगितले.
ब्रिटिश पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन (२००९), फ्रान्सचे पंतप्रधान निकोलस सारकोझे (२००८), जर्मनीच्या चॅंन्सलर अँजेला मरकेल (२००७) आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनाशियो लुला द सिल्वा (२००६) यांना "वर्ल्ड स्टेट्समन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.