विदर्भात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
सकाळ वृत्तसेवा
Friday, March 12, 2010 AT 09:17 AM (IST)
पुणे - नागपूर, वाशीम, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज (शुक्रवार) पहाटे अडीच ते पाच या काळात जोरदार वादळी वारे वहात होते. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारा पडल्याचेही वृत्त आहे. ताशी सुमारे ७० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या शहरांमधील काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
वादळीवाऱ्यामुळे अनेक झाडे पडली असून उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.