Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रेक्षकांना घाबरवायला आवडते - विक्रम भट
पीटीआय
Friday, March 12, 2010 AT 04:03 PM (IST)
मुंबई - प्रेक्षकांना घाबरवायला मला आवडते, त्यामुळेच मी रहस्यमय, भीतीदायक चित्रपट बनवित असल्याचे निर्माता-दिग्दर्शक विक्रम भट याने सांगितले. भट याने दिग्दर्शित केलेला शापित चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे, त्यापार्श्‍वभूमीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने भीतीदायक चित्रपट काढण्यामागील आपली भूमिका मांडली.

दिग्दर्शक डेव्हिड धवन, करण जोहर, मधुर भांडारकर हे त्यांच्या आवडीनुसार अनुक्रमे करमणूकप्रधान, प्रेम भावना मांडणारे आणि सामाजिक विषय हाताळणारे चित्रपट काढतात. त्याप्रमाणेच भीतीदायक चित्रपट करण्यात आनंद मिळत असल्यामुळे आणि प्रेक्षकांना घाबरवायला आवडत असल्यामुळे मी भीतीदायक चित्रपट काढतो, असे भट याने सांगितले.

भट याने राझ आणि १९२० या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शापित चित्रपटात पार्श्‍वगायक उदीत नारायण याचा मुलगा आदित्य नारायण आणि श्‍वेता आगरवाल यांची प्रमुख भूमिका आहे.
प्रतिक्रिया
On 3/12/2010 8:58 PM शिवराम गोपाळ वैद्य said:
प्रेक्षक स्वतःचे पैशे खर्च करून थेटरात घाबरण्यासाठी येतात अशी तुझी समजूत आहे की काय? जनतेला प्रत्यक्षात घाबरवण्यासाठी परमेश्वराने येथे "कॉंग्रेस सरकार" नामक संस्था निर्माण करून ठेवलेली आहे. त्याप्स्सून वाचावे म्हणून ते घटकाभर करमणूक करवून घेण्यासाठी थेटरात येतात. करमणूक करणारे सिनेमे जमात असेल तर काढावे नाहीतर संन्यास घेऊन घरी बसावे.
On 3/12/2010 7:56 PM varun said:
खरच हा पिक्चर काढणार म्हणाल्यावर आधीच लोक गर्भगळीत होतील ..........
On 3/12/2010 7:22 PM Girish said:
आररर,tu Picture kadhar..tya mule lok jasti ghabartil..hehehehe
On 3/12/2010 4:35 PM gajanan said:
तुझे picture येणार म्हणूनच लोकांना भीती वाटते रे.. कॉपी कात..कुठून उचलला आहेस का सिनेमा...
On 3/12/2010 4:23 PM महेश कुलकर्णी said:
टि.व्ही वर ट्रेलर पाहीला तरी भिती वाटते..बाप रे याने परत पिक्चर काढला......


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: