मुंबईतील चकमकीत शार्पशूटर सुनील बंगाली ठार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, March 13, 2010 AT 09:42 AM (IST)
मुंबई - छोटा शकील गॅंगचा शार्पशूटर सुनील मंडल ऊर्फ सुनील बंगाली (वय ३०) शुक्रवारी (ता. १२) पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत जागीच ठार झाला.
गोवंडीजवळील देवनार भागात असलेल्या संभाजीनगर उज्ज्वल हौसिंग सोसायटी येथे बंगाली येणार असल्याचे खबऱ्यांकडून समजले होते. त्यानुसार पोलिसांना सापळा रचला होता. रात्री मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तो दिसताच पोलिसांना त्याला शरण येण्याचे आवाहन केले. परंतु, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी मुंबई क्राईम ब्रॅंच बरोबर झालेल्या चकमकीत झालेल्या चकमकीत तो गंभीर जखमी झाला. त्याला राजेवाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मरण पावल्याचे सांगितले. त्याच्यावर खून, मारामाऱ्या, खुनाचे प्रयत्न असे १४ गुन्हे दाखल होते. अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.