Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जागतिकीकरणाची अरिष्टे पुस्तकाचे आज प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
Sunday, March 14, 2010 AT 12:15 AM (IST)
नाशिक - कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय व कोल्हापूरच्या गोविंद पानसरे अमृतमहोत्सव समितीतर्फे आज (ता. 14) सायंकाळी सहाला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात "जागतिकीकरणाची अरिष्टे' या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. उत्तम कांबळे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. एन. डी. पाटील करतील. गोविंद पानसरे अध्यक्षस्थानी राहतील. महाराष्ट्रातील परिवर्तनाच्या चळवळीत आयुष्यभर लढणारे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कोल्हापूर येथील गोविंद पानसरे अमृतमहोत्सव समितीतर्फे विविध ग्रंथनिर्मितीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या प्रकल्पाचाच एक भाग आहे, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: