कोलकता नाईट रायडर्सचा सलग दुसरा विजय
पीटीआय
Sunday, March 14, 2010 AT 06:06 PM (IST)
कोलकता - मनोज तिवारी आणि ब्रँड हॉज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर कोलकता नाईट रायडर्सने बेंगलुरु रॉयल चॅलेंजर्सवर सात गडी राखून विजय मिळविला. कोलकता नाईट रायडर्सचा आयपीएलमधील हा सलग दुसरा विजय होता.
आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात आज (रविवार) ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात कोलकता नाईट रायडर्सचा कर्णधार सौरव गांगुली नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोस्वामी आणि कॅलीसने डावाची सुरवात केली. मात्र, गोस्वामी लँग्वेटच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्याने बंगळुरुची अवस्था वाईट झाली. कॅलीसने शेवटपर्यंत फलंदाजी करीत संघाला १३५ धावांपर्यंत मजल मारुन दिली. अँजेलो मॅथ्यूजने ४, तर मुरली कार्तिकने २ बळी मिळविले.
या आव्हानासमोर कोलकताच्या सलामीवीरांनी दमदार सुरवात करून पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी नोंदविली. मनोज तिवारीने २९ चेंडूत तर ब्रँड हॉजने ४५ चेंडूत अर्धशतक केले. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या सौरव गांगुलीने या सामन्यात २३ धावांची खेळी केली. विजयासाठी कोलकताच्या फलंदाजांना शेवटपर्यंत झगडावे लागले.