लेखकांच्या लेखनाचा अभ्यास झाल्यास संस्कृतीचा विकास
सकाळ वृत्तसेवा
Monday, March 15, 2010 AT 12:15 AM (IST)
पुणे - ''लेखकांच्या लेखनाचा अभ्यास झाल्यास संस्कृतीचा विकास होण्यास मदत होईल,'' असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी व्यक्त केले.
राजन खानलिखित "कथा आणि कथेमागची कथा' या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा. ग. जाधव, अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर, राजन गवस या वेळी उपस्थित होते. साधना प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. कोत्तापल्ले म्हणाले, ""लेखकांच्या लेखनाचा सर्वच अंगांनी अभ्यास झाला पाहिजे. खान यांची लेखनशैली सर्वसामान्यांना जवळ करणारी आहे.''
डॉ. जाधव म्हणाले, ""मराठी लेखकांचे लेखन संकलित करून ते सर्वांपर्यंत पोचविले पाहिजे. तसे झाल्यास वाड्.मयाला निश्चित चालना मिळेल. त्यामुळे प्रत्येक लेखकाच्या लेखनाचा शोध घेतला पाहिजे.''
"लेखन करताना भान नसते. जसे सुचते तसे मांडतो. एखादा विषय मांडताना कोणताही उद्देश नसतो,' असे खान यांनी या वेळी सांगितले. विनोद शिरसठ यांनी प्रास्ताविक केले.