Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जपानी खाद्य-पदार्थ अन्‌ तेही पुण्यात !
श्रीकांत अत्रे (japanmitra@gmail.com)
Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: mejwani,   food,   recipes

पानी खाद्य पदार्थ, तेही जपानी लोकांनी येउन कसे बनवायचे हे दाखवून आपल्या पुणेकर मंडळीना पुण्यात खायला मिळणे ही खवय्या लोकांसाठीची फार मोठी पर्वणीच म्हणायची ! ती काल सायंकाळी योगिनी गर्भे या जपानी भाषेच्या अभ्यासक - शिक्षिका व त्यांच्या सहाध्यायी अंजनी पंचभाई यांनी त्यांच्या जपानमधून आलेल्या मित्र-मैत्रिणिना मदतीस घेउन साकार केली अन खाणार्या लोकांची वाहवा मिळवली.
 
सर्वप्रथम साकुराची सुकवलेली फुले घातलेल्या जपानी चहाने उपस्थितांचे स्वागत केले गेले. उत्साही बघ्यांपैकी खूप लोकांनी जपानी शेफ लोकाना मदतही केली भाज्या वगैरे कापायला ! या उत्साहात एकेक डिश कश्या बनल्या अन कधी संपल्या हे  कुणालाच कळले नाही !
 
हाचीजोजीमा या जपानच्या दक्षिणेस असलेल्या बेटावरून आलेले साकुरादा सान सांगत होते, जपानी तेंपुरा (भजी) चवदार बनवण्यासाठी थोड़ी किंगफिशर बीअर त्यांनी का वापरली, अन बघणारे मात्र अवाक होउन पहात आणि ऐकत होते. चव मात्र मस्त होती यात वादच नव्हता. बनले  केंव्हा अन संपले केंव्हा हे कुणालाच कळले नाही. १७० डि.से. हे तेलाचे तापमान अंदाजे कसे ठरवायचे हा त्यांचा सल्लाही  उपस्थित महिलांना चकित करून गेला ! तसेच त्यांनीच सर्वात शेवट बनवलेली 'ओकोनोमियाकी' ही जपानी 'ओम्लेट' सदृश पाक-कृती इतकी चवदार होती की जपानी फ्रूट आणि राईस केकचे डेझर्ट खाऊन थंड झालेल्या लोकांनाही त्यानी आग्रहात पाडलेच !
 
चिराशी-गोहान हा जपानी भात म्हणजे एक प्रकारचा सुन्दर दिसणारा (त्याचे घटक गुलाबी असल्याने असेल) चवीला थोड़ा आम्बट-गोड असा होता, त्यात थोड़े व्हिनेगर आणि जपानमधून आणलेली काही जपानी लोणची (जसे मुरवलेले आल्याचे, मुळयाचे तुकडे इ.) होती. बनेबनेपर्यंत चापला लोकांनी अन बनवणाऱ्या जपानी महिला [कितागावा सान आणि उमेझावा सान] या पहातच राहिल्या नुसत्या !
 
श्री व सौ सुझुकी हे तो-क्यों नजीकच्या हाचिओजी येथून आलेले असल्याने तेथील ख़ास पदार्थ 'झारू-सोबा' [नूडल्स] करण्यात मग्न होते. ख़ास जपानी नूडल्स ही तर जपानी लोकांनाही पर्वणीच की ! मग गेले एक वर्ष पुण्यात रहात असलेले अन  टी.म.वि. मधे जपानी भाषा शिकवणारे प्रो.  तानाबे आणी मिस हायाशी पुढे सरसावले आणि खास जपानी पद्धतीने नूडल्स 'भुरकून' त्यांनी उपस्थित मुलांना 'ओहाशी' अथवा काडयानी ते कसे खायचे तेही शिकवले.
 
ओकिनावा येथील प्रसिद्ध 'गोया-चाम्पुरु  ' नावाचा पदार्थ म्हणजे कारले आणि तोफू एकत्र करून मंद फ्राय केलेली डिश ! उपस्थितांचे तोंड कडू होणे हे जरा स्वाभाविकच होते, पण त्याला कारण आपल्याकडील कार्ली आहेत यावर जपानी लोकांचेही एकमत झाले. जपानमधे कार्ली आकाराने खूप मोठी अन थोड़ी कमी कडू असतात. पण मग आपणही जपानमधे गेलो की या पदार्थाची खरी चव तिथे अनुभवता येईलच ना ! चला तर मग, यापुढील 'वा-शोकू' [जपानी जेवण] प्रत्यक्ष जपान मधेच जाऊन चाखू या !
 

 

 

 

 

 

 

प्रतिक्रिया
On 3/24/2010 2:33 PM sachin said:
thanks Sneha and Rajesh. i will try all these items suggested by both of u.......lets seeeeee.....arigato gozaimasu....
On 3/19/2010 2:13 PM चेतन said:
कौनुचीव्हा, मी पण जपान मध्ये आहे. काही डिशेस जपान मध्ये चांगली आहेत. परंतु त्यांची नावेही आवर्जून लक्षात ठेवावी लागतात. स्नेहा ने सांगितल्याप्रमाणे याकीतोरी आणि तेम्पुरा हे खरेच चांगले आहे. krab पण चांगले मिळतात. एन्जॉय.
On 3/19/2010 2:09 PM Rajesh said:
सचिन , तु कोकोईचीबान या रेस्तारौंत मध्ये चिकन करी राइस खाऊ शकतोस.
On 3/18/2010 4:55 PM namrata said:
खूपच छान , मला पण जपान मध्ये खालेले तेंपुरा & सुशी ची आठवण झाली.
On 2010/03/18 11:56 sneha said:
Hi Sachin,i was also in Japan for 6 months,and really i also found it difficult to eat japnese food.but there are some dishes which doesnt contain beef and pork and which we can eat like monjya without pork and beef ,also yakitori(it contains fried chicken),udon(u can have egg udon and chicken udon),tenpura(u can get veg tempura),onarijushi(rice and egg).ganbatte kudasai.
On 3/17/2010 3:20 PM sachin said:
Hi, from last six months I am in japan. But till I am not able to eat Japanese food. As it is less spicy, half boiled and most of there items contains pork and beef. Can u suggest me some spicy Japanese curry’s (chicken is ok), nuddels and other food items having the test similar to our food. Arigato odahimas.
On 3/17/2010 2:35 PM Prashant Marathe said:
Hi Azim, You can get Japanese dishes at Hotel "Off Beat" located near Karishma Society, Karve Road.
On 3/17/2010 2:09 AM dev said:
photo baghun tondala pani sutale.....plea se yachya recipes sanga
On 3/17/2010 12:38 AM जयदेव said:
एकदम मस्त !!
On 3/15/2010 5:55 PM Azim said:
श्रीकांतजी अगदी छान! वाचून तोंडाला पाणी सुटले आणि जपान मध्ये चापलेल्या तेम्पुरा ची आठवण झाली. वरचे सर्व मेनू शकाहारी दिसतात, सुशी वैगेर असल्यास आणखी मजा आली असती. असे एखादे रेस्तोरंत पुण्यात असल्यास कळवावे. धन्यवाद...


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: