Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पंचावन्न वर्षांची महिला होणार उद्या माता
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 01:10 AM (IST)
Tags: health,   mother,   thane,   mumbai
डोंबिवली - महाराष्ट्रात प्रथमच 55 वर्षांची आई उद्या आपल्या बाळाला जन्म देणार आहे. डोंबिवलीतील डॉक्‍टर संदीप माने यांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेचे हे फलित असून त्याची फलनिष्पती होणार आहे. ठाण्यातील द ओरिजिन फर्टिलिटी सेंटरमध्ये मागील दहा ते बारा महिन्यांपूर्वी सायली नावाच्या महिलेवर शस्त्रक्रिया करून टेस्टट्युब बेबीचा प्रयोग करण्यात आला. स्वतः मधुमेही, थायोराईड, ब्लडप्रेशर यांसारख्या आजारांचा सामना करत असतानाही त्याचा आपल्या प्रेग्नन्सीवर कोणताही ताण येणार नाही, याची काळजी या आईने घेतली हे विशेष.

स्वतःला मूल होत नाही, म्हणून सर्व प्रकारचे उपयोग कयून थकलेल्या धुळे येथील जोडप्याला दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदावर संदीप माने यांच्या ओरिजिन फर्टिलिटी सेंटरची माहिती मिळाली. हे कात्रण घेऊन पत्ता शोधत ते ठाणे येथे पोहोचले. एवढ्या विश्‍वासाने इतक्‍या लांबून आलेल्या त्या महिलेवर डॉक्‍टरांनी त्याचदिवशी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे पुन्हा एकदा आई होण्याचा विश्‍वास सायली यांना वाटू लागला आणि डॉक्‍टरांनी केलेल्या उपचारामुळे तो सत्यातही उतरला.

डॉ. संदीप माने हे लंडनच्या रॉयल कॉलेजमधून सर्टिफिकेट ऑफ एन्डोस्कोपी या विषयातील तज्ज्ञ असून आजवर त्यांनी शेकडो इंग्लड आणि अमेरिकेतील डॉक्‍टरांना प्रशिक्षण दिले आहे. डॉ. माने यांनी लंडनच्या रॉयल कॉलेजमध्ये ट्रेनिंग इन्चार्ज म्हणून 12 वर्षे काम केले असून लॅप्रोस्कोपी, एन्डोस्कोपी, टेस्ट टयुब बेबी या विषयावरील तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे, तर आजवर 20 देशांतील सुमारे 48 जोडप्यांना डॉ. माने यांनी टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून मातृत्व बहाल केले आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: