Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:57 AM (IST)
Tags: crime,   suicide,   mumbai
डोंबिवली - येथील पूर्व भागातील देसलेपाडा भोपर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पतीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व भागातील गरिबाचा वाडा येथे राहणारे सुरेश लक्ष्मण गोसावी यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, त्यांची मुलगी मनीषा हिने ऑक्‍टोबर 2005 मध्ये उमेश रामचंद्र चव्हाण याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाह झाल्यानंतर उमेश मनीषाला दारू पिऊन त्रास देत होता. मनीषाला मारहाण करून माहेरून पैसे आण, असा तगादा लावत होता. तसेच लहान मुलगी जान्हवी हिलादेखील मारहाण करायचा. पतीच्या जाचाला कंटाळून मनीषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा तिचा पती आहे, असे फिर्यादीत गोसावी यांनी म्हटले असल्याने पोलिसांनी मनीषाचा पती उमेशच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: