Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'सकाळ'चे वरिष्ठ वार्ताहर जे. डी. पाटील यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 06:49 PM (IST)
Tags: j d patil,   sakaal,   reporting,   media
मुंबई - सकाळ मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ बातमीदार जनार्दन डी. पाटील (वय ५०) यांचे आज सकाळी काविळीच्या विकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारादरम्यान ते कोमात होते. दुपारी साडेबारा वाजता वरळी कोळीवाड्यातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुन्हेगारीसंदर्भातील उत्कृष्ट बातम्यांबद्दल गेल्या वर्षी त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे गौरविण्यात आले होते.
 
काही दिवसांपूर्वी त्यांना हेपाटायटिस बी (कावीळ) या विकारामुळे बाँबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर कोमात गेल्यामुळे त्यांना नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
सकाळमध्ये १९७६ मध्ये मुद्रितशोधक म्हणून त्यांनी कारकिर्द सुरू केली. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी मुंबईतील गुन्हेगारीचे वृत्तांकन केले. मुंबई क्राईम ब्रँच पत्रकार संघटनेचे काही काळ त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. प्रत्येक बातमीच्या खोलात शिरण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे, पोलिस खात्यात त्यांचा दबदबा होता. गेल्या काही वर्षांपासून मुंबई टुडे या पुरवणीचे वृत्त समन्वयक म्हणून ते काम पाहात होते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: