Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

गोल करण्याची संधी साधायला हवी!
-
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: football,   world cup,   sports

मी ब्राझीलचा प्रशिक्षक आहे, त्यामुळे आमच्या सामन्याच्या निकालाबाबत अंदाज बांधणे मला आवडत नाही. आता आजच्या उत्तर कोरियाविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत, हे वेगळे सांगण्याचीही गरज नाही. स्पर्धेतील सराव सामन्यात आमच्या बचावपटूंनी चमकदार कामगिरी केली होती. तसेच काका आणि रॉबिन्होच्या खेळातही चांगली सुधारणा झाली आहे. त्यांना सूर गवसत आहे. ते आता फॅबिआनोच्या साथीत जोरदार आक्रमण करतील.
उत्तर कोरिया आमच्याविरुद्ध धसमुसळा खेळ करण्याची शक्‍यता आहे, त्यांना 5-3-1-1 या पद्धतीने खेळणे आवडते. ही पद्धत म्हणजे पूर्णपणे बचावच आहे. त्यांच्या संघात जॉंग तेई से हा एकमेव आक्रमक आहे. विश्‍वकरंडकातील कोणतीही लढत सोपी नसते हे मान्य, पण आम्हाला या सामन्यात गोल करण्याच्या संधी उपलब्ध होतील व त्याचा फायदा घेणे ही आमची जबाबदारीच आहे.

स्लोवाकियास संधी
न्यूझीलंड तसेच स्लोवाकिया आज विश्‍वकरंडकातील पहिली लढत खेळणार आहेत. अर्थातच सलामीला पराभव टाळण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. न्यूझीलंडचे खेळाडू खूपच उत्साही आहेत तसेच जोषपूर्णही. कर्णधार रिकी हर्बर्ट याने स्थानिक खेळाडूंच्या मदतीने संघाची चांगली उभारणी केली आहे. त्यांनी 4-4-2 या पद्धतीने खेळ करीत चांगली कामगिरी केली आहे. स्लोवाकिया संघही गुणवान आहे. या संघाचे नेतृत्व बावीस वर्षीय मॅरेस हॅमसिक करीत असला, तरी त्यांना कमी लेखण्याची गरज नाही. भक्कम बचावपटू असल्यामुळे प्रशिक्षक वेस यांची 4-3-1-2 ही पद्धत प्रभावी ठरेल. वेगवान आक्रमणे करणाऱ्या हॅमिक याच्यामुळे स्लोवाकियाच्या आक्रमणाची ताकद वाढली आहे, त्यामुळे ते विजयाचे तीन गुण मिळवू शकतील.

पोर्तुगाल संधी साधेल
आयव्हरी कोस्ट आणि पोर्तुगाल यापैकी कोणता पात्र संघ ठरणार याचा निर्णय दोघांमधील लढतीत होऊ शकेल. या महत्त्वाच्या सामन्यात आयव्हरी कोस्टचा अव्वल आक्रमक दिदिएक द्रोग्बा खेळू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्‍न असेल व त्यावरच त्यांची कामगिरी कशी होईल हे अवलंबून असेल. पोर्तुगाल संघात नॅनी नसेल, पण क्वेईरॉझ, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिएदसन, सिमाव, डेको, पेपे यांसारखे खेळाडू पोर्तुगालकडे आहेत. त्यांनी पात्रता स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली नाही, पण तरीही हा संघ नक्कीच धोकादायक आहे. त्यामुळे प्रशिक्षक स्वेन गोरान एरिकसन आणि हत्तीसमोर खडतर आव्हान असेल. त्यांचा बचाव चांगला आहे, पण भक्कम नक्कीच नाही. मधली फळी तुलनेत चांगली आहे, पण आक्रमणावर त्यांची प्रामुख्याने मदार असेल. माझ्या मते पोर्तुगालचे आक्रमक आयव्हरी कोस्टच्या कमकुवत बचावफळीवर दडपण आणतील आणि रोनाल्डोला गोल करण्याच्या संधी उपलब्ध करून देतील व तो सामना जिंकून देऊ शकेल.
- डुंगा
(पीएमजी)



आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: