Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मनीषा कोईरालाचे 18 जूनला लग्न
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:54 AM (IST)
मुंबई - "इलू इलू'गर्ल मनीषा कोईराला आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. येत्या 18 जूनला तिचा विवाह आपल्या वयापेक्षा सात वर्षांनी छोट्या असलेल्या व्यावसायिक सम्राट दहेलशी लागणार आहे. हा विवाह पारंपरिक नेपाळी पद्धतीने पार पडेल.

मनीषा कोईराला आणि दहेलची मैत्री गेल्या एक वर्षापासून आहे. काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाने त्याच्या विवाहाची तारीख निश्‍चित केली होती; मात्र त्यानंतर ती तारीख पुढे ढकलण्यात आली होती. काठमांडू येथील एका आलिशान हॉटेलात मनीषाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर 18 जूनला हा विवाह शाही थाटात पार पडणार आहे. त्या वेळी दोन्ही घरची नातलग मंडळी उपस्थित राहतील. लग्नानंतर दोन दिवसांनी मनीषा कोईराला येथे हॉटेल सॉल्टी प्लॉझा क्राऊनमध्ये एक शानदार पार्टी देईल.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: