|
|
|
|
|
|
मुंबई -  युरोपातील पेच वाढल्याने अमेरिकी डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर आज मोठा परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज दिवसभरात 54.56च्या पातळीवर गेले होते. हा रुपयाचा आतापर्यंतचा सर्वांत नीचांक आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाच्या मूल्यात अतिशय किरकोळ सुधारणा होऊन तो 54.50च्या मूल्यावर बंद झाला. रुपयाचे मूल्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 54.30च्या नीचांकी पातळीपर्यंत गेले होते. आज त्याने तो "विक्रम'ही मोडला.
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : रु. 27,940 (-165) शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,070 (-165) चांदी (एक किलो) : रु. 52,440 (-1,110) --- अंड्यांचा भाव (एनईसीसी) शंभर नगांचा भाव : रु. 276 --- ब्रोमार्क चिकनचे भाव जिवंत (एक किलो) : रु. 93 ड्रेस्ड (एक किलो) : रु. 126 ----- परकी चलन डॉलर : रु. 54.29 पौंड : रु. 86.84 युरो : रु. 69.34 येन (100) : रु. 67.73
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - युरोपातील पेच वाढल्याने अमेरिकी डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर आज मोठा परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज दिवसभरात 54.56च्या पातळीवर गेले होते. हा रुपयाचा आतापर्यंतचा सर्वांत नीचांक आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाच्या मूल्यात अतिशय किरकोळ सुधारणा होऊन तो 54.50च्या मूल्यावर बंद झाला.
Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - रुपयाचे मूल्य अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 54.56च्या खाली घसरल्याने शेअर बाजारात आज विक्रीचा जोरदार मारा झाला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज सोळा हजारांची पातळी तोडल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले. नंतर तो थोडा सावरला असला, तरी गुंतवणूकदारांचे तब्बल 77 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. दिवसअखेरीस निर्देशांक 298.16 अंशांनी घसरून 16,030.09 अंशांवर बंद झाला. चार महिन्यांत निर्देशांक पहिल्यांदाच सोळा हजारांची तोडली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - डॉलर भक्कम झाल्याने सोने-चांदीच्या दरातील चढउतार बुधवारीही कायम राहिली. कालच्या तुलनेत चांदीचा भाव आज बाराशे रुपयांनी कमी होऊन 53,900 वर स्थिरावला, तर सोने 28,550 वरून 28,350 पर्यंत घसरले. डॉलरचा भाव आज 54 रुपयांवर गेल्याने मुंबई बाजारात सोन्या- चांदीच्या दरात घसरण सुरू झाली. सकाळी सोन्याच्या दहा ग्रॅमचा भाव 28 हजार 100 रुपयांपर्यंत उतरला होता.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - नुकत्याच झालेल्या जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अठराव्या वर्धापनदिनानिमित्त फडणीस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विनय फडणीस यांना "उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत झालेल्या सोहळ्यात लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय कोळसामंत्री प्रतीक पाटील आणि खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील उपस्थित होते.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,105 (-75) शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,235 (-75) चांदी (एक किलो) : रु. 53,550 (-140) --- अंड्यांचा भाव (एनईसीसी) शंभर नगांचा भाव : रु. 276 --- ब्रोमार्क चिकनचे भाव जिवंत (एक किलो) : रु. 93 ड्रेस्ड (एक किलो) : रु. 126 ----- परकी चलन डॉलर : रु. 53.84 पौंड : रु. 86.59 युरो : रु. 69.00 येन (100) : रु. 67.38
Wednesday, May 16, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - प्रत्यक्ष कर संहिता विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज दिली. या विधेयकाबाबत स्थायी समितीच्या बहुतांश शिफारशी स्वीकारल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेत मंजूर केलेले वित्त विधेयक, 2012 राज्यसभेत विचारार्थ सादर करताना मुखर्जी यांनी ही माहिती दिली. ""अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्यावर मी स्थायी समितीच्या शिफारशी पाहीन.
Wednesday, May 16, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - कॅपिटल गुड्स, धातू आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातील घसरणीला आज "ब्रेक' लागला. युरोपीय शेअर बाजारातील तेजी सुरू झाल्यानेही काही प्रमाणात खरेदी झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 112.41 अंशांनी वधारून 16,307.12 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 35 अंशांनी वधारून 4,942.80 अंशांवर बंद झाला.
Wednesday, May 16, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली -  नव्या ड्रिमलायनर विमानासाठी प्रशिक्षण वेळापत्रकात बदल, या मूळ मागणीवरून सुरू झालेला एअर इंडिया वैमानिकांचा संप आता चिघळत चालला आहे. आज (सोमवार) संपाचा सातवा दिवस होता.   दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वैमानिकांनी संप सुरूच ठेवल्यामुळे सरकारने हा संप निरर्थक घोषित केला आहे. परिणामी, सरकारने आंदोलक वैमानिकांशी बोलणी करण्यासही नकार दिला आहे. आज एअर इंडियाची एकूण 14 आंतरराष्ट्रीय विमाने रद्द करण्यात आली.
Tuesday, May 15, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,180 (-220) शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : रु. 28,310 (-220) चांदी (एक किलो) : रु. 53,690 (-440) --- अंड्यांचा भाव (एनईसीसी) शंभर नगांचा भाव : रु. 276 --- ब्रोमार्क चिकनचे भाव जिवंत (एक किलो) : रु. 92 ड्रेस्ड (एक किलो) : रु. 124 ----- परकी चलन डॉलर : रु. 53.71 पौंड : रु. 86.74 युरो : रु. 69.46 येन (100) : रु. 67.64
Tuesday, May 15, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - चलनवाढीच्या दरात पुन्हा वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपातीची आशा मावळल्याने गुंतवणूकदारांमध्ये आज निरुत्साह होता. शेअरच्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 77 अंशांनी घसरून 16,215.84 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 21.10 अंशांनी घसरून 4,907.80 अंशांवर बंद झाला.
Tuesday, May 15, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - भाज्या, मटण, मासळी आणि दुधाचे भाव आणखी वाढल्याने एप्रिल महिन्यात चलनवाढीचा दर आणखी वाढून, तो 7.23 टक्क्यांवर पोचला. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरांत कपात होण्याची शक्यता कमी आहे. एकीकडे औद्योगिक उत्पादन आणि आर्थिक विकास दरही कमी झाला असताना, चलनवाढीचा दरही वाढणे ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चलनवाढीचा दर 9.74 टक्के इतका होता.
Tuesday, May 15, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - क्रिकेटपटू झहीर खानच्या पुण्यातील दुसऱ्या "झहीर खान्स' या रेस्टॉरंटचे औपचारिक उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी झहीर खानने आपल्या कुटुंबीयांसोबत केक कापून आनंद साजरा केला. तसेच रॉयल चॅलेंजर्स, बंगळूर या आपल्या संघातील सहकारी खेळाडूंसाठी भोजन आयोजित करून त्यांना मेजवानी दिली. त्यात विराट कोहली, अनिल कुंबळे, मुथय्या मुरलीधरन आणि मोहंमद कैफ यांचा समावेश होता.
Tuesday, May 15, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अध्यक्षपदी वाणिज्य सचिव राहुल खुल्लर यांची नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. ट्रायचे सध्याचे अध्यक्ष जे. एस. शर्मा यांची मुदत आज संपत असून, त्यांच्या जागी खुल्लर यांची निवड झाली आहे. सध्या दूरसंचार विभागाशी संबंधित अनेक गोष्टींबाबत वादविवाद सुरू असताना खुल्लर यांची निवड उल्लेखनीय मानली जात आहे.
Monday, May 14, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|