|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - प्रख्यात अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या शपथविधीचे कवित्व आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. शपथविधीच्या वेळी राज्यसभा टीव्हीने आपल्यावर वारंवार कॅमेरा रोखला. त्यामुळे वाहिन्यांना आयतेच सनसनाटी खाद्य मिळाले, अशी तक्रार खासदार जया बच्चन यांनी राज्यसभा सचिवालयाकडे आज केली. राज्यसभा टीव्हीने मात्र हा आरोप झटकत सरळ दूरदर्शनच्या कोर्टात चेंडू टोलविला.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली -  सचिनला शपथ घेण्यापासून रोखू शकत नाही, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने सचिन तेंडुलकरच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या विरोधातली जनहित याचिका फेटाळून लावली आहे. मात्र, या जनहित याचिकेवर 4 जुलैपर्यंत केंद्राने आपले म्हणणे सादर करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.   दिल्लीचे माजी आमदार, राम गोपाल सिंग सिसोदिया यांनी सचिनच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - अणुवीज प्रकल्पांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड सरकारला मान्य नाही. प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत शंका निर्माण होईल, अशी कोणतीही कृती सरकारतर्फे केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज संसदेत दिली. अतिरिक्त ऊर्जास्रोतांची आवश्यकता असताना अणुऊर्जा नाकारणे परवडणारे नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली -  संसदेच्या विशेष अधिवेशनानिमित्ताने दोन्ही सभागृहांतील खासदारांच्या सामुदायिक छायाचित्राच्या वेळी चांगलाच सावळागोंधळ दिसून आला. छायाचित्रात चमकण्यासाठी उत्सुक खासदारांनी कार्यक्रमाच्या शिस्तीची ऐशीतैशी करून पहिल्या रांगेतील जागा पटकाविल्याने ज्येष्ठ खासदार, मंत्री मागे आणि नवखे लोकप्रतिनिधी पुढे, असा प्रकार घडला.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली -  तिहार कारागृहातून जामिनावर सुटका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी "टू जी स्पेक्ट्रम' गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि माजी दूरसंचारमंत्री ए. राजा संसदेमध्ये परतले. गेल्या वर्षी एक फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर उत्साहात असणाऱ्या राजा यांनी पत्रकारांशी मात्र काहीही न बोलणेच पसंत केले. संसदेत दाखल झाल्यानंतर राजा यांनी थेट लोकसभेत जाणे पसंत केले.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बंगळूर -  न्यायालयाच्या फटकाऱ्यांमुळे अडचणीत सापडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी छापे घातले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बेकायदा खाणकामासंबंधातील येडियुरप्पांची भूमिका तपासण्यासाठी "सीबीआय'ने त्यांच्या दोन खाणींवरही धाड टाकली.
Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये भारताने शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये चीनला मागे टाकले असल्याची लेखी माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राज्यसभेत बुधवारी दिली. जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेमध्ये चीनचा वाटा पाच टक्क्यांचा आहे. 2007 ते 2011 या कालावधीमधील जागतिक शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारताचा वाटा चीनच्या दुप्पट म्हणजेच 10 टक्के असल्याचे अँटनी यांनी सांगितले.
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - पाकिस्तानमधून सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया तातडीने थांबल्या पाहिजेत तसेच दहशतवादाबद्दलच्या भारताच्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरेही मिळणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना स्पष्ट सांगितले.
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - संसदीय कामकाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लोकलेखा समितीच्या (पीएसी) पुनर्रचनेची प्रक्रिया राज्यसभेच्या विलंबामुळे रखडली आहे. साहजिकच अध्यक्षपदी फेरनियुक्तीच्या वृत्ताकडे डोळे लावून बसलेले ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे अधिकार असलेली "पीएसी' संसदीय कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असते. दरवर्षी तिची फेररचना होते.
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - चीनच्या लष्कराने दोन वर्षांत 500 पेक्षा जास्त वेळा भारत-चीन नियंत्रण रेषेवर उल्लंघन केल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृह राज्यमंत्री मुलाप्पल्ली रामचंद्रन यांनी ही माहिती दिली. पीपल्स लिबरेशन आर्मीकडून 2010 मध्ये सीमारेषेवर 228 वेळा उल्लंघन झाले, तर 2011 मध्ये 213 वेळा आणि एप्रिल 2012 पर्यंत 64 वेळा उल्लंघन झाल्याची माहिती रामचंद्रन यांनी दिली.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - शिर्डी मतदारसंघातील धनगर, तलवार कानडी आणि भटक्या विमुक्त समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेऊन त्यांच्या विकासासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवावा, अशी मागणी शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी लोकसभेत केली. अनुसूचित जमाती दुरुस्ती विधेयक 2011 संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये वाकचौरे म्हणाले, की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली/मुंबई - एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संपातून तिघांनी आज (बुधवार) माघार घेतली. सुमारे दोनशेहून अधिक वैमानिक गेले नऊ दिवस संपावर आहेत. दरम्यान, सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले आहेत, अशी भूमिका आंदोलक संघटना इंडियन पायलटस् गिल्डने (आयपीजी) घेतली आहे. तिघे आजारी वैमानिक कामावर हजर झाले असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. संपामुळे एअर इंडियाचे वेळापत्रक कोसळले आहे. दरम्यान, एअर इंडियाने आपत्कालीन वेळापत्रक अमलात आणले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पाटणा - बिहारमधील नितीशकुमार सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठा गाजावाजा करीत आमदार निधी बंद करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, यामुळे कामांतील "टक्का' बंद झाल्याने आमदार नाराज होते. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन आमदार निधी पुन्हा सुरू करण्याचा घाट सरकारने घातला आहे. आमदार निधीमुळे भ्रष्टाचार वाढत असून, त्यातून लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला तडा जात असल्याचा युक्तिवाद करत सरकारने हा निधी बंद केला होता.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - राष्ट्रीय गुन्हे नोंदी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीनुसार, 2008 ते 2010 या कालावधीत देशभरातून तब्बल 28,000 लहान मुलांचे अपहरण झाले असून, 1.84 लाख मुले बेपत्ता आहेत. गृहराज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. "एनसीआरबी'च्या नोंदींनुसार या कालावधीत अपहरण झालेल्या लहान मुलांची एकूण संख्या 28,595 आहे, असे जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच 1,84,605 मुले बेपत्ता झाली आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रायपूर - नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात आज चार पोलिस जखमी झाले. सुकना जिल्ह्याच्या बस्तरमध्ये ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी आज येथे भारत बंदचे आवाहन केले होते, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक राम निवास यांनी सांगितले. ते म्हणाले, की पोलिस दल नेहमीप्रमाणे पाहणी करण्यासाठी चालले असताना माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला त्याचप्रमाणे केलेल्या गोळीबारात चार पोलिस जखमी झाले.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|