|
|
|
|
|
|
सारे जण कौतुकानं बघायचे आणि एकच प्रश्न विचारायचे, "बाई गं, आम्हाला एक लेकरू सांभाळताना नाकी नऊ येतात मग तू ही तिळी कशी सांभाळतेस?' काय उत्तर देणार या प्रश्नावर? खरं तर ती तिळी नव्हतीच तर एका झुंजार आईचं आयुष्य होतं. अभेद्य, अतूट, अभंग, आनंददायी आणि जणू जन्माचं सार्थक करणारं...! शिवानीनं व्यवस्थेच्या, परंपरेच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. नुसताच प्रेमविवाह केला नाही, तर आंतरजातीय विवाह केला. तिचा संसारही सुरू झाला.
Sunday, May 13, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आज जागतिक मातृदिन... आईची माया आपल्या मनात तशी सततच दरवळत असते पण तीविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खास दिवस... कुठल्याच शब्दांत न मावणाऱ्या माय-माउलीच्या या मायेला वाहिलेली ही शब्दफुलं... वेगवेगळ्या ओंजळीतली! ----------------------------------------------------------------- एका आठवड्यात मोठा सुयोग जमून आला आणि मला दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा दीर्घकाळ "सत्संग' लाभला! एक होता सचिन तेंडुलकर आणि दुसरा राहुल द्रविड.
Sunday, May 13, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माता असावी तर जिजाऊसाहेबांसारखी, असं सार्थ अभिमानानं म्हटलं जातं. मोठ्या जिद्दीनं जिजामातेनं पुत्र शिवबाची जडणघडण केली... पुढं शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामागं खरी प्रेरणा होती ती जिजाऊसाहेबांचीच... "जिजिआऊ वालिदा-द-राजा शिवाजी' म्हणजे राजा शिवाजींची माता "जिजाऊ' ही राजमाता जिजाऊसाहेबांची मुद्रा आहे. जिजाऊसाहेबांच्या सदरेवरून सुटणाऱ्या आज्ञापत्रांच्या माथ्यावर दिमाखात ही मुद्रा उमटवली जात असे.
Sunday, May 13, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पडद्यावरची नायिका असो, लोकप्रिय गायिका असो, की आणखी कुठल्या क्षेत्रातील वलयांकित महिला असो...तिचं सार्वजनिक क्षेत्रातलं झगमगतं व्यक्तिमत्त्व साधारणपणे आपल्याला माहीत असतं....पण तिच्यातल्या "आई'चं दर्शन क्वचितच घडतं...अशाच काही वलयांकित "आई'विषयी सांगताहेत तिच्या लेकी मातृदिनानिमित्त. कांचन घाणेकर (सुलोचना), ईशा देओल (हेमा मालिनी), तनीषा (तनुजा), कविता पौडवाल (अनुराधा पौडवाल), मेघना सई (मुक्ता घई) या लेकींनी व्यक्त केलेल्या आईविषयीच्या भावना...
Sunday, May 13, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्राजक्ता आणि निशिगंधा या माझ्या दोन कन्या. निशूच्या बारशाला आलेली माझी एक मैत्रीण मला म्हणाली, ""तुला आता तिसरा मुलगा झाला की त्याचं नाव झेंडू ठेव!'' त्यावर माझे पती हसून म्हणाले, ""आता तिला झेंडू, गुलाब, मोगरा.. काय म्हणायचं ते ती मलाच म्हणेल. आम्हाला आणखी मूल नको.'' मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे, यावर आम्हा दोघांचा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या मुली सर्वार्थाने तशाच आहेतही.
Sunday, May 13, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
खरंतर प्रत्येक श्वास हाच मातृसोहळा असतो. दुर्दैवानं माझ्या आईचं निधन मी पाच वर्षांचा होतो तेव्हा झालं पण त्या वेळचं तिचं प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. तिचा आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर राहिला आहे. गुरुमूर्ती, अन्नपूर्णा मॉं यांनाही मी आईच मानतो. त्याचप्रमाणं जगातील प्रत्येक नारी ही माझ्यासाठी मॉं आहे. धरती, गंगा या आपल्या माता आहेत. ईश्वराच्या मूर्तीतही मला आईचंच दर्शन घडतं. खरंतर आई ईश्वरापेक्षाही मोठी आहे.
Sunday, May 13, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या आईनं जे जिवाचं रान केलं, ते मी विसरलो, तर मी जिवाणू म्हणूनसुद्धा जगण्याच्या लायकीचा नाही. अगदी अल्पशी परतफेड करण्याची संधीसुद्धा न देता ती निघून गेली, याच्या यातना जेव्हा आतल्या आत कल्लोळ उडवतात, तेव्हा तिचा आवाज आजदेखील माझी समजूत काढतो. "स्वतःच्या आधी इतरांचा विचार कर. त्यांच्या यातना कमी कर. त्यांचे अश्रू पूस. त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण कर.
Sunday, May 13, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
'ऐन उमेदीच्या वयात मला अंधत्व आलं... आयुष्याला जो जोडीदार लाभला तोही "समदृष्टी'चा... म्हणजे माझ्यासारखाच अंध! परिस्थिती बिकट होती पण जगणं मात्र पुढं जात होतं...निसर्गही थांबला नव्हता...आमच्या अंधारल्या वाटेवर उजेडाचा एक किरण जन्माला आला...नचिकेत त्याचं नाव. त्याला वाढवताना आम्ही जो संघर्ष केला तो अचाट असला, तरी अटळ होता. त्याच्यावर "डोळस'पणानं केलेल्या संस्कारांमुळं आता तो आम्हा आंधळ्यांची आई बनलाय...
Sunday, May 13, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपल्या मुलांना मुक्त श्वास घेता यावा, यासाठी आपणही अवकाश द्यायला हवा. ती आपली भविष्याची गुंतवणूक म्हणून आपण जन्माला घातलेली नाहीत, हे नेहमीच लक्षात ठेवून आईपण निभवायला हवं. एका तळ्याकाठी बेडकी अन् तिची पिल्लं राहायची. त्या बेडकीचं आपल्या पिल्लांवर फार प्रेम होतं. सापापासून बचाव कसा करायचा, पानाआड कसं लपायचं, याचे धडे बेडकी आपल्या पिल्लांना द्यायची. तिची ती पिल्लंही पावसा-पाण्यात भिजत, चिखलात उड्या मारत, छान मजा घ्यायची.
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
तिच्या श्रद्धेच्या सत्त्वपरीक्षेचा क्षण होता तो. तो तडफडत होता, विव्हळत होता. पाण्याच्या थेंबासाठी आसुसला होता. तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं. अखेरच्या घटका मोजणाऱ्या आपल्या तृषार्त पुत्राला ती थेंबभर पाणीही देऊ शकत नव्हती. किती क्रूर असते नियती. उरात दूध आणि डोळ्यांत अश्रू...हेच मातृत्वाचं फलित असतं, हे तिला जाणवलं! या जगाचा निरोप घेताना, त्यानं तिला विश्वाची माता केलं.
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कसा होता मातृत्वाचा क्षण...कसं पेललं मातृत्व...भविष्यातील आई कशी असावी, यासंदर्भात जाणून घेतलेली ही काही मनोगतं... ----------------------------------------------------------- मी आई होणार हे कळलं...माझ्यातल्या मुलीचं आईत रूपांतर होणार...किती सुंदर भावना होती ती पण दुसऱ्याच क्षणी मनात तऱ्हेतऱ्हेच्या विचारांची गर्दी झाली...आपण हे कसं निभावणार? आपल्याला हे कसं जमणार? पण हाही विचार काही काळच...नंतर पुन्हा मी स्वप्नात रंगले...
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
----------------------------------------------------------- जीवनातील सर्वात आनंदाचा टप्पा मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा टप्पा. मलाही हे सुख लाभणार असल्यानं घरातील सर्व मंडळी खूप आनंदात आहेत. घरात गोजिऱ्या तान्हुल्याचं आगमन होणार, ही गोड बातमी कळल्यापासूनच सर्वजण त्याच्या आगमनाची जय्यत तयारी करीत आहेत. मला काय हवं, काय नको, याची काळजी घेत आहेत. हे आनंदाचे क्षण शब्दांत वर्णन करणं कठीण आहे.
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मातृत्वाचा आनंद अवर्णनीय असतो. त्यासाठी सोसलेल्या सर्व दुःखांचं बाळाला बघून विस्मरण होतं. या मातृत्वाच्या आनंदासाठी पूर्ण नऊ महिन्यांची शारीरिक व मानसिक तयारी लागते. ती जर तुम्ही ताण न घेता सहजतेनं केली तर पूर्ण गरोदरपणाचा कालावधीही तुम्हाला तितकाच संस्मरणीय वाटेल जितका प्रत्यक्ष मातृत्वाचा क्षण! मूल होण्याचा अनुभव हा स्त्रीच्या आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा आणि अतीव आनंदाचा अनुभव.
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अभिनेते-अभिनेत्री टीव्हीत, सिनेमात, स्टेज शोमध्ये, इव्हेंटमध्ये जाऊन कितीही मोठे झाले तरी, आपली आई रंगभूमी हीच आहे, असंच आजही मानतात. पोटासाठी जन्मभर वणवण करणारी लेकरं आईकडं घटकाभर येऊन टेकतातच तसंच कलावंतही अधूनमधून का होईना, रंगमंचावर काही करू पाहतातच! "प्रेमस्वरूप-वात्सल्यसिंधू' अशा आईला हिंदी सिनेमात जे स्थान आहे, ते मराठी नाटकांत फारसं नाही.
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मला आई होती पण ती मला दिसली नाही. लहानपणी आठवण येण्यापूर्वीच ती मला सोडून गेली. माणसाला तीन वर्षांनंतरचं आठवणीत राहतं म्हणे ! ती तर मला मी दोन महिन्यांचा असतानाच सोडून गेली म्हणे! मग मला एक परित्यक्ता आईनं सांभाळलं. ती जगातली सर्वोत्तम स्त्री... आई.. सर्व होती ती. एक जन्म सोडला तर तुमची आई जे जे करते... सोसते ते तिनं केलं खरी आई बनून. आई नावाचं खोटं नाणं जगाच्या कोणत्याही टांकसाळीत तयार होत नाही. तो असतो बंदा रुपया...
Sunday, May 13, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|