|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - "आयपीएल'मधील फिक्सींगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना निलंबित केले असले तरी तेवढी कारवाई पुरेशी नाही. या समस्येची पाळेमुळे त्यांनी शोधून काढली पाहिजेत, असे फर्मान केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी काढले. हितसंबंधांची गल्लत होऊ नये म्हणून आयपीएलच्या आयोजनातील सहभाग "बीसीसीआय'ने काढून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.
Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सिडनी - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार मायकेल क्लार्क मंगळवारी येथे त्याची गर्लफ्रेंड मॉडेल किली बोल्डीशी विवाहबंधनात अडकला. सिडनीच्या उत्तरेला असलेल्या हंटर व्हॅली येथे हा विवाह झाला. क्लार्कने बुधवारी याविषयी ट्विटरवर माहिती दिली. किली बोल्डीशी विवाह करून मी जगातील सर्वाधिक आनंदी व्यक्ती बनलो असल्याचे त्याने म्हटले आहे. बोल्डीनेही ट्विटरवर मी जगातील सर्वाधिक नशिबवान ठरल्याचे म्हटले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी दिल्ली - एका टीव्ही चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू शलभ श्रीवास्तव याने सारवासारव करण्याची धडपड सुरू केली आहे. जखमी खेळाडू मॅचफिक्सिंग कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित करून त्याने आपण या प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धरमशाळा - सलग तीन विजयांनंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ उद्या (गुरुवारी) येथे होणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा सामना जिंकून आयपीएलच्या "प्ले ऑफ'मध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य बाळगून असेल. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून, "प्ले ऑफ'मधील अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली आहे. 14 सामन्यांतून 20 गुणांची कमाई करून "प्ले ऑफ'मध्ये स्थान मिळविणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स पहिला संघ ठरला आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबईला वानखेडे स्टेडियमवर हरविल्यामुळे आणि बंगळूरमधील सामन्यातही पकड घेतल्यामुळे आम्हाला दोन गुणांची अपेक्षा होती. आमच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली. झहीर खान आणि विनयकुमार यांनी सुरवातीलाच बळी मिळवून दिले, पण अंबाती रायुडूने चमकदार खेळी केली आणि मुंबईला बाजी मारून दिली. त्याला किएरॉन पोलार्डने चांगली साथ दिली. शेवटपर्यंत टिकल्यास पोलार्ड किती भारी पडू शकतो, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. दुर्दैवाने या वेळी आमच्याविरुद्ध हे घडले.
Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाच भारतीय खेळाडूंना निलंबित केल्यानंतर एकही प्रथम श्रेणी सामना न खेळलेल्या नवोदितांचा आयपीएलसाठी स्वतंत्रपणे लिलाव करण्याचा विचार आता भारतीय क्रिकेट मंडळ करीत आहे. आयपीएलमधील तीन फ्रॅंचाईजनी यासंदर्भात आग्रह धरला होता व त्यानुसार हा निर्णय मंडळाने घेतला असल्याचे समजते. एखाद्या प्रकरणात खेळाडू दोषी ठरल्यास संबंधित फ्रॅंचाईजची प्रतिमा खालावते.
Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  वानखेडेवर फिरकी प्रभावी ठरेल, हा कोलकताचा अंदाज अचूक ठरला. कोलकताने आपल्या यंदाच्या मोसमातील नीचांकी धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करताना वानखेडे स्टेडियमवर मुंबईला पाचवा पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. मलिंगा व हरभजन हे आघाडीचे गोलंदाज मोक्याच्या वेळी अपयशी ठरले. त्याचा फायदा घेत मनोज तिवारीने कोलकताला 2 बाद 6 वरून 140 पर्यंत मजल मारून दिली.
Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - आव्हानवीर बोरिस गेलफंडविरुद्ध वर्चस्व मिळविल्यानंतरही विजय मिळत नसल्यामुळे जगज्जेता विश्वनाथन आनंद काहीसा निराश झाला आहे. डावाच्या सुरवातीस भक्कम खेळ केल्यानंतरही विजय दुरावत असल्यामुळे आता आनंद डावाच्या मध्यास अधिक हुकमत मिळविण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या लढवेल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. आव्हानवीर बोरिस गेलफंडला आनंदच्या डावाच्या सुरवातीच्या चालीने बेजार केले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लंडन - भारताच्या सौरभ घोषाल याने ब्रिटिश ओपन स्क्वॅश स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने पहिल्या फेरीत इजिप्तच्या मार्वन एल शोर्बाजी याच्यावर 11-7, 11-6, 11-5 अशी मात केली. मार्वन ज्युनिअर विजेता आहे. घोषालने आक्रमक खेळाच्या जोरावर पहिल्यापासून पकड घेतली. त्याच्या धडाक्यासमोर मार्वन निष्प्रभ झाला. मार्वनचा मोठा भाऊ स्टेडियममध्ये उपस्थित होता. सामन्यादरम्यान मार्वनने एकदा त्याच्याकडे हताशपणे पाहिले. घोषालने सांगितले, की माझा खेळ चांगला झाला.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लंडन - वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्या (गुरुवार) पासून येथे लॉर्डसवर सुरवात होईल. या मालिकेत यजमानांची बाजू भक्कम ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. इंग्लंडमधील कौंटी हंगामाप्रमाणेच खेळपट्टी जलदगती गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली, तर वेस्ट इंडीजच्या आघाडी फळीतील फलंदाजांसमोर मोठे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडीजने 2009मध्ये जमैका येथे इंग्लंडला पराभूत केल्यानंतर 30 कसोटीत केवळ दोनच विजय मिळविले आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गेल्या वीस एक वर्षांपासून जागतिक क्रीडा क्षेत्रात उत्तेजक (डोपिंग) हा चर्चेचा आणि वादाचा एक मोठा विषय बनला आहे. 1988च्या ऑलिंपिक स्पर्धेत बेन जॉन्सनसारखा जागतिक कीर्तीचा मोठा मासा ऑलिंपिक वैद्यकीय मंडळाच्या गळाला लागला. उत्तेजक तपासणीच्या यंत्रणेचे हे फार मोठे यश मानले गेले. अशा प्रकारे उत्तेजकांचा आधार घेऊन कामगिरी उंचावणाऱ्या खेळाडूंना आणि त्यांना तसे करण्यास भाग पाडणाऱ्यांना हा मोठा हादरा होता.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
किनहुआंगदाओ (चीन) - जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारून ऑलिंपिक कोटा मिळविण्याचे मेरी कोमचे स्वप्न संपुष्टात आले. तिला आज इंग्लंडच्या निकोल ऍडम्सविरुद्ध चुरशीच्या लढतीत हार पत्करावी लागली. कविता चाहलचा उपांत्य फेरीतील प्रवेश सोडल्यास भारताच्या पदरी आज निराशाच आली. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या पदकाच्या आशा केवळ कवितावरच अवलंबून आहेत. लंडन ऑलिंपिकपासून महिला मुष्टियुद्धाचा ऑलिंपिकमध्ये समावेश होणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मेरठ - भारताच्या आघाडीच्या महिला कुस्ती खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या अलका तोमरने लंडन ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे अखेर रुस्तम-ए-जमा दारासिंह कुस्ती स्टेडियममध्ये निवृत्तीची घोषणा केली. 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अलकाने सांगितले, की लंडन ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे मला अतिशय दु:ख झाले. जर मला संधी मिळाली असती तर निश्चितच माझी कामगिरी चांगली झाली असती.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) आयोजित तिसऱ्या डीईएस फर्ग्युसन करंडक पुरुष गटाच्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत पुण्याच्या बिगरमानांकित खेळाडू रोहन गिडेने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित रजत माहेश्वरीचा 6-, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत महाराष्ट्राच्या नितीन कीर्तने, यश देशपांडे, शहाबाज खान यांनी विजय मिळविले.
Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई - महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी राष्ट्रीय किशोर बेसबॉल स्पर्धेत ब्रॉंझपदक जिंकले. ब्रॉंझपदकाच्या लढतीत राज्याच्या मुलांनी ओरिसाला 7-0 असे तर मुलींनी मणिपूरला 12-5 असे पराजित केले. मुलांच्या निर्णायक लढतीत दिल्लीने छत्तीसगडचा 7-0 असा सहज पराभव केला तर मुलींच्या निर्णायक लढतीत दिल्लीने मध्य प्रदेशला 2-0 असे नमविले.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|