Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


ताज्या बातम्या
मुंबई -  प्रख्यात साहित्यिक व थोर नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले व चंद्रकांत गोखले, श्रीराम लागू यांच्यापासून दत्ता भट, यशवंत दत्त ते अगदी राजा गोसावी यांच्यापर्यंत तब्बल आठ दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने समर्थपणे पेललेल्या "नटसम्राट'वर आता चित्रपट बनतोय. या हिंदी चित्रपटात "नटसम्राट' म्हणजे गणपतराव बेलवलकर यांच्या भूमिकेत नाना पाटेकर दिसणार की अमिताभ बच्चन याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)

जळगाव -  दुष्काळाच्या झळा असह्य झाल्यामुळे पाण्याच्या अर्थकारणाची महाराष्ट्राला आठवण झाली. राज्याने गेल्या दोन दशकांत निधीचा महापूर अनुभवला खरा! पण, तरीही राज्य कोरडेच आहे.

Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई -  प्रख्यात साहित्यिक व थोर नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले व चंद्रकांत गोखले, श्रीराम लागू यांच्यापासून दत्ता भट, यशवंत दत्त ते अगदी राजा गोसावी यांच्यापर्यंत तब्बल आठ दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने समर्थपणे पेललेल्या "नटसम्राट'वर आता चित्रपट बनतोय. या हिंदी चित्रपटात "नटसम्राट' म्हणजे गणपतराव बेलवलकर यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई -  कुलाब्यातील आदर्श सोसायटीने सागरी किनारा नियमांची (सीआरझेड) पूर्तता केलेली नसून त्यांना सीआरझेडची मान्यता मिळालेली नाही, अशी साक्ष आज (बुधवार) मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी चौकशी आयोगापुढे दिली. 'आदर्श'ला परवानगी देण्याच्या काळात कुंटे राज्य नियोजन आयोगाचे तत्कालीन प्रधान सचिव होते. मात्र, त्यांनी आदर्शकडे सीआरझेडची परवानगी नसल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. आज न्या. जी. ए. पाटील व सदस्य पी.

Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)

(ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून) कोल्हापूर - काही ग्रंथालये केवळ कागदावरच, काहींचे अस्तित्व नुसतेच फलकापुरते! एका ग्रंथालयाचा वापर तर जळाऊ लाकूड ठेवण्यासाठी. काही ठिकाणी ग्रंथालय आणि घर एकच. घरचाच सेवक आणि अनुदानातून मिळणारा पगारही घरातच. ग्रंथालयांसाठीची पुस्तक खरेदी वाचककेंद्रित नव्हे, तर कमिशनवर आधारित... निर्धारित दर्जानुसार काम नाही पण अनुदानाची उचल मात्र वेळेवर...

Thursday, May 17, 2012 AT 02:15 AM (IST)

नवी दिल्ली - प्रख्यात अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या शपथविधीचे कवित्व आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. शपथविधीच्या वेळी राज्यसभा टीव्हीने आपल्यावर वारंवार कॅमेरा रोखला. त्यामुळे वाहिन्यांना आयतेच सनसनाटी खाद्य मिळाले, अशी तक्रार खासदार जया बच्चन यांनी राज्यसभा सचिवालयाकडे आज केली. राज्यसभा टीव्हीने मात्र हा आरोप झटकत सरळ दूरदर्शनच्या कोर्टात चेंडू टोलविला.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली -  सचिनला शपथ घेण्यापासून रोखू शकत नाही, असे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयाने सचिन तेंडुलकरच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या विरोधातली जनहित याचिका फेटाळून लावली आहे. मात्र, या जनहित याचिकेवर 4 जुलैपर्यंत केंद्राने आपले म्हणणे सादर करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.   दिल्लीचे माजी आमदार, राम गोपाल सिंग सिसोदिया यांनी सचिनच्या नियुक्तीला आव्हान दिले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली - अणुवीज प्रकल्पांच्या सुरक्षिततेच्या मुद्यावर कोणतीही तडजोड सरकारला मान्य नाही. प्रकल्पांच्या सुरक्षेबाबत शंका निर्माण होईल, अशी कोणतीही कृती सरकारतर्फे केली जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज संसदेत दिली. अतिरिक्त ऊर्जास्रोतांची आवश्‍यकता असताना अणुऊर्जा नाकारणे परवडणारे नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली -  तिहार कारागृहातून जामिनावर सुटका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी "टू जी स्पेक्‍ट्रम' गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि माजी दूरसंचारमंत्री ए. राजा संसदेमध्ये परतले. गेल्या वर्षी एक फेब्रुवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर उत्साहात असणाऱ्या राजा यांनी पत्रकारांशी मात्र काहीही न बोलणेच पसंत केले. संसदेत दाखल झाल्यानंतर राजा यांनी थेट लोकसभेत जाणे पसंत केले.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली -  संसदेच्या विशेष अधिवेशनानिमित्ताने दोन्ही सभागृहांतील खासदारांच्या सामुदायिक छायाचित्राच्या वेळी चांगलाच सावळागोंधळ दिसून आला. छायाचित्रात चमकण्यासाठी उत्सुक खासदारांनी कार्यक्रमाच्या शिस्तीची ऐशीतैशी करून पहिल्या रांगेतील जागा पटकाविल्याने ज्येष्ठ खासदार, मंत्री मागे आणि नवखे लोकप्रतिनिधी पुढे, असा प्रकार घडला.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

बंगळूर -  न्यायालयाच्या फटकाऱ्यांमुळे अडचणीत सापडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी छापे घातले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बेकायदा खाणकामासंबंधातील येडियुरप्पांची भूमिका तपासण्यासाठी "सीबीआय'ने त्यांच्या दोन खाणींवरही धाड टाकली.

Thursday, May 17, 2012 AT 02:00 AM (IST)

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये भारताने शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये चीनला मागे टाकले असल्याची लेखी माहिती संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राज्यसभेत बुधवारी दिली. जागतिक शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेमध्ये चीनचा वाटा पाच टक्‍क्‍यांचा आहे. 2007 ते 2011 या कालावधीमधील जागतिक शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारताचा वाटा चीनच्या दुप्पट म्हणजेच 10 टक्के असल्याचे अँटनी यांनी सांगितले.

Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)

नवी दिल्ली - संसदीय कामकाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लोकलेखा समितीच्या (पीएसी) पुनर्रचनेची प्रक्रिया राज्यसभेच्या विलंबामुळे रखडली आहे. साहजिकच अध्यक्षपदी फेरनियुक्तीच्या वृत्ताकडे डोळे लावून बसलेले ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे अधिकार असलेली "पीएसी' संसदीय कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असते. दरवर्षी तिची फेररचना होते.

Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)

लंडन - बराक ओबामा यांच्याशी घटस्फोट घेण्याचा मिशेल यांचा बारा वर्षांपूर्वी विचार होता, असा सनसनाटी दावा एका एडवर्ड क्‍लेन लिखित "द ऍमॅच्युअर' या पुस्तकात केला आहे. "शिकागोची निवडणूक लढविण्यास मिशेल यांनी ओबामा यांना विरोध केला होता. हा विरोध ओबामा यांनी दुर्लक्षित केला. त्यानंतर मिशेल यांनी घटस्फोटाचा विचार केला होता. हे समजल्यामुळे ओबामा कमालीचे निराश झाले. ते आत्महत्या करतील, अशी भीतीही जवळच्या मित्रांना वाटत होती,' असे पुस्तकात म्हटले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)

नवी दिल्ली - पाकिस्तानमधून सुरू असलेल्या भारतविरोधी कारवाया तातडीने थांबल्या पाहिजेत तसेच दहशतवादाबद्दलच्या भारताच्या प्रश्‍नांची तपशीलवार उत्तरेही मिळणे आवश्‍यक असल्याचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना स्पष्ट सांगितले.

Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)

मुंबई -  युरोपातील पेच वाढल्याने अमेरिकी डॉलरला मागणी वाढल्याने रुपयाच्या मूल्यावर आज मोठा परिणाम झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आज दिवसभरात 54.56च्या पातळीवर गेले होते. हा रुपयाचा आतापर्यंतचा सर्वांत नीचांक आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाच्या मूल्यात अतिशय किरकोळ सुधारणा होऊन तो 54.50च्या मूल्यावर बंद झाला. रुपयाचे मूल्य गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 54.30च्या नीचांकी पातळीपर्यंत गेले होते. आज त्याने तो "विक्रम'ही मोडला.

Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)

नवी दिल्ली - शिर्डी मतदारसंघातील धनगर, तलवार कानडी आणि भटक्‍या विमुक्त समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेऊन त्यांच्या विकासासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवावा, अशी मागणी शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी लोकसभेत केली. अनुसूचित जमाती दुरुस्ती विधेयक 2011 संदर्भात झालेल्या चर्चेमध्ये वाकचौरे म्हणाले, की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी दिल्ली - चीनच्या लष्कराने दोन वर्षांत 500 पेक्षा जास्त वेळा भारत-चीन नियंत्रण रेषेवर उल्लंघन केल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृह राज्यमंत्री मुलाप्पल्ली रामचंद्रन यांनी ही माहिती दिली. पीपल्स लिबरेशन आर्मीकडून 2010 मध्ये सीमारेषेवर 228 वेळा उल्लंघन झाले, तर 2011 मध्ये 213 वेळा आणि एप्रिल 2012 पर्यंत 64 वेळा उल्लंघन झाल्याची माहिती रामचंद्रन यांनी दिली.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

वॉशिंग्टन -  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार छोटा शकील आणि टायगर मेननवर अमेरिकेने निर्बंध लावले आहेत. त्यांच्यावर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे. अमेरिकन वित्त विभागाच्या विदेशी संपत्ती नियंत्रण कार्यालयाने हे निर्बंध लावले आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी दिल्ली/मुंबई - एअर इंडियाच्या वैमानिकांच्या संपातून तिघांनी आज (बुधवार) माघार घेतली. सुमारे दोनशेहून अधिक वैमानिक गेले नऊ दिवस संपावर आहेत. दरम्यान, सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले आहेत, अशी भूमिका आंदोलक संघटना इंडियन पायलटस्‌ गिल्डने (आयपीजी) घेतली आहे. तिघे आजारी वैमानिक कामावर हजर झाले असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने दिली. संपामुळे एअर इंडियाचे वेळापत्रक कोसळले आहे. दरम्यान, एअर इंडियाने आपत्कालीन वेळापत्रक अमलात आणले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी दिल्ली - राष्ट्रीय गुन्हे नोंदी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीनुसार, 2008 ते 2010 या कालावधीत देशभरातून तब्बल 28,000 लहान मुलांचे अपहरण झाले असून, 1.84 लाख मुले बेपत्ता आहेत. गृहराज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाचे लेखी उत्तर देताना ही माहिती दिली. "एनसीआरबी'च्या नोंदींनुसार या कालावधीत अपहरण झालेल्या लहान मुलांची एकूण संख्या 28,595 आहे, असे जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले. तसेच 1,84,605 मुले बेपत्ता झाली आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

पाटणा - बिहारमधील नितीशकुमार सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मोठा गाजावाजा करीत आमदार निधी बंद करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला होता. मात्र, यामुळे कामांतील "टक्का' बंद झाल्याने आमदार नाराज होते. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन आमदार निधी पुन्हा सुरू करण्याचा घाट सरकारने घातला आहे. आमदार निधीमुळे भ्रष्टाचार वाढत असून, त्यातून लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला तडा जात असल्याचा युक्तिवाद करत सरकारने हा निधी बंद केला होता.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी दिल्ली - "आयपीएल'मधील फिक्‍सींगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना निलंबित केले असले तरी तेवढी कारवाई पुरेशी नाही. या समस्येची पाळेमुळे त्यांनी शोधून काढली पाहिजेत, असे फर्मान केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माकन यांनी काढले. हितसंबंधांची गल्लत होऊ नये म्हणून आयपीएलच्या आयोजनातील सहभाग "बीसीसीआय'ने काढून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

रायपूर - नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात आज चार पोलिस जखमी झाले. सुकना जिल्ह्याच्या बस्तरमध्ये ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी आज येथे भारत बंदचे आवाहन केले होते, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक राम निवास यांनी सांगितले. ते म्हणाले, की पोलिस दल नेहमीप्रमाणे पाहणी करण्यासाठी चालले असताना माओवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला त्याचप्रमाणे केलेल्या गोळीबारात चार पोलिस जखमी झाले.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

नवी दिल्ली - अमेरिकेकडून शेल गॅसची आयात करण्याचा सरकारचा विचार आहे, असे आज परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीत घट होण्याबाबत अमेरिकेचा भारतावर दबाव आहे, या वृत्ताचाही मंत्रालयातर्फे इन्कार करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरउद्दिन म्हणाले, की अमेरिकेने बंधने लादण्यापूर्वीपासून गेली काही वर्षे इराणहून होणाऱ्या खनिज तेलाच्या आयातीत घट होत आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:30 AM (IST)

रांची - 2005मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी सार्वजनिक व्यवस्थेचा भंग केल्याबद्दल झारखंड विधानसभा अध्यक्ष सी. पी. सिंग यांना एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, लगेचच त्यांना जामिनही देण्यात आला. गोवामधील भाजपचे सरकार विसर्जित केल्याबद्दल 2005 मध्ये सिंग यांनी अल्बर्ट एक्का चौकात सोनियांचा पुतळा जाळला होता. त्यावेळी सिंग हे भाजपचे मुख्य प्रतोद होते.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

सिडनी - ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार मायकेल क्‍लार्क मंगळवारी येथे त्याची गर्लफ्रेंड मॉडेल किली बोल्डीशी विवाहबंधनात अडकला. सिडनीच्या उत्तरेला असलेल्या हंटर व्हॅली येथे हा विवाह झाला. क्‍लार्कने बुधवारी याविषयी ट्विटरवर माहिती दिली. किली बोल्डीशी विवाह करून मी जगातील सर्वाधिक आनंदी व्यक्ती बनलो असल्याचे त्याने म्हटले आहे. बोल्डीनेही ट्विटरवर मी जगातील सर्वाधिक नशिबवान ठरल्याचे म्हटले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

लखनौ - उत्तर प्रदेशच्या कनौज लोकसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल या समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर कनौजची जागा रिकामी आहे. अखिलेश यादव यांनी 14 मेस विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. कनौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पक्षासाठी सुरक्षित मानला जातो. या मतदारसंघातून अखिलेश यादव हे तीन वेळा निवडून आले होते.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

अहमदाबाद - गुजरातमध्ये कच्छच्या जंगलात गेल्या काही दिवसांपासून मोरांची मोठ्या प्रमाणात शिकार केली जात आहे. रापर तालुका व परिसरात मोरांच्या शिकारीचे प्रमाण अधिक आहे. मंजवास गावात मंगळवारी (ता. 15) रात्री काही लोकांनी बाराहून अधिक मोरांची शिकार केली. एका पोत्यात त्यांना नेले जात होते पण गावकऱ्यांनी पाठलाग करून सहा शिकाऱ्यांना पकडले. मोरांच्या मृतदेहांसह त्यांना वनखात्याच्या स्वाधीन करण्यात आले.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

नवी दिल्ली - पितृत्वाच्या चाचणीसाठी रक्ताचे नमुने देण्यास नकार देणाऱ्या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. ""डीएनए चाचणी करण्यासाठी तिवारी न्यायालयामध्ये येत नसतील, तर त्यांना येथे हजर करण्यासाठी सहरजिस्ट्रारने पोलिसांची मदत घ्यावी,'' असे न्यायमूती रेवा खेत्रपाल यांनी स्पष्ट केले.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

श्रीनगर - सर्वसामान्यांसाठी असलेले वाहतुकीचे कुठलेही नियम लाल दिव्याच्या गाडीला लागू नसतात, असाच सर्वसाधारण अनुभव असताना श्रीनगरमधील नागरिकांना मात्र मंगळवारी एक वेगळाच सुखद धक्का बसला. मौलाना आझाद रस्ता या शहरातील गजबजलेल्या रस्त्यावरून मंगळवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या वाहनांचा ताफा एका कार्यक्रमासाठी निघाला होता. एका चौकामध्ये "सिग्नल'वर लाल दिवा लागल्यानंतर अब्दुल्ला यांनी गाडी थांबविण्याचे आदेश दिले.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: