Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  | मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मराठवाडा
औरंगाबाद -  ""मंडल आयोग राज्यातही लागू व्हावा यासाठी मी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यामुळेच वंजारी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो आहे. समाजासमोर आता मोठे संकट आले आहे. आपले आरक्षण 12 टक्‍केच राहणार आहे. रंगनाथ मिश्रा अहवाल लागू न करता रेणके आयोग लागू करावा, अशी मागणी मी करणार आहे. केंद्र शासनाचा रंगनाथ मिश्रा अहवालाचा हा प्रस्ताव मी मंजूर होऊ देणार नाही,'' असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी (ता.

Monday, March 15, 2010 AT 01:00 AM (IST)

भोकर -  ""महिलांसाठी संसद व विधिमंडळात 33 टक्के आरक्षणाचे विधेयक राज्यसभेत संमत झाले आहे. त्यामुळे महिलांचे स्थान अधिक उंचावले आहे. जेव्हा विधिमंडळात हे विधेयक येईल, त्या वेळी ते विधेयक राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल. या विधेयकाची अंमलबजावणी करून पहिले पाऊल आम्ही उचलणार आहोत,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. 14) केले.

Monday, March 15, 2010 AT 12:15 AM (IST)

लातूर -  ज्येष्ठ साहित्यिक, कविवर्य विंदा करंदीकर यांचे निधन झाले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले "विंदा' यांना सोमवारी (ता. 15) सायंकाळी सहा वाजता हुतात्मा स्मारक येथे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. विंदा करंदीकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे दुःख मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेने व्यक्त केले आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:29 AM (IST)

नांदेड -  केंद्रीय रेल्वेअर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे तीनशे कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. मात्र मराठवाड्यातील रेल्वेमार्गाच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्‍त करुन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची गरज आहे, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडे रविवारी (ता. 14) केली. नांदेड- श्रीगंगासागर रेल्वेला मुख्यमंत्री व रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष एस.एस.

Monday, March 15, 2010 AT 12:45 AM (IST)

बीड -  ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून पालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या आठवडे बाजाराच्या कट्ट्यांवर स्थानिक व्यापाऱ्यांनीच कब्जा केल्याने शेतकऱ्यांना मात्र नदीपात्र, पुलावर आणि रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसावे लागते. येथील सेवादल मैदान म्हणून प्रसिध्द असलेल्या भागात गेल्या अनेक वर्षांपासून रविवारी आठवडे बाजार भरतो. हा परिसर तसा नदीपात्रातच येतो.

Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)

परभणी -  आरक्षण मागणीची घोषणाबाजी करीत छावाच्या काही कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. 14) दुपारी साडेचारच्या सुमारास परभणी - गंगाखेड रस्त्यावर बोरवंड पाटीजवळ एसटी महामंडळाच्या एका बसवर दगडफेक करीत बस जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा प्रकार केल्यानंतर आंदोलनकर्ते लगेचच घटनास्थळावरून निघून गेले. दैठणा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बसचा पंचनामा केला. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सध्या छावा संघटना सर्वत्र आंदोलन करीत आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)

औरंगाबाद -  ऍक्‍सल तुटल्यामुळे पाण्याचा टॅंकर उलटून टॅंकरखाली दबून क्‍लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. टॅंकरखाली दबलेल्या क्‍लिनर प्रमोद सुदाम चोबे याला पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने ओढून काढले. पैठण रोडवरील नक्षत्रवाडी येथील पाण्याचा टॅंकर (एमएच- 04 - 6022) पाणी भरून औरंगाबादहून चितेगाव औद्योगिक वसाहतीकडे जात होता.

Monday, March 15, 2010 AT 12:48 AM (IST)

औरंगाबाद -  चौकीदाराला चाकूचा धाक दाखवून आणि त्याचे हातपाय बांधून तीन ते चार चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांची घरफोडी केली. यात रोख रक्‍कम आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. शहानूरमियॉं दर्गा परिसरातील देवानगरी येथे राहणारे विवेकानंद व्यंकटरमण पेब्बी (वय 34) हे हैदराबादला गेले होते. जाताना घराला कुलूप लावलेले होते आणि घराची राखण करण्यासाठी चौकीदारही होता. आज रविवारी (ता.

Monday, March 15, 2010 AT 12:47 AM (IST)

औरंगाबाद -  गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरवात होते, या नववर्षाच्या पूर्वसंध्येला "सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ वृत्तपत्र आणि साम वाहिनी' तर्फे सोमवारी (ता.15) संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता "महाराष्ट्रोत्सव' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी सण-उत्सवांची परंपरा गायन, नृत्य संगीताच्या माध्यमातून रसिकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:44 AM (IST)

औरंगाबाद -  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे नुकत्याच कान, नाक, घसा विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील देशमुख यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने एका दहा वर्षीय मुलाच्या फुफ्फुसात अडकलेले पेनाचे टोपण यशस्वीरीत्या काढून त्या मुलाला जिवदान देण्यात यश मिळविले. जमिन शहा नसिर शहा हा 10 वर्षांचा मुलगा राहणार वाकळी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे खेळता खेळता पेनाचे टोपण घशात अडकले व नंतर ते फुफ्फुसात अडकून बसले.

Monday, March 15, 2010 AT 12:43 AM (IST)

बीड -  गेल्या तेरा वर्षांपासून बीडमध्ये संस्कार भारतीतर्फे सांस्कृतिक उपक्रम घेण्यात येत आहे. या वर्षी मंगळवारी (ता. 16) सायंकाळी सात ते दहापर्यंत नववर्ष स्वागतासाठी चौदावा कनकालेश्‍वर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात उस्ताद उस्मान खॉं उपस्थित राहतील, अशी माहिती संस्कार भारतीचे भारत लोळगे यांनी दिली. संस्कार भारतीच्या कार्यक्रमानिमित्त रविवारी (ता. 14) आयोजित पत्रकार परिषदेत श्री. लोळगे बोलत होते.

Monday, March 15, 2010 AT 12:42 AM (IST)

परळी वैजनाथ - भारिप बहुजन महासंघातर्फे सोमवारी (ता. 15) येथे गायरान हक्‍क परिषद आयोजित करण्यात आली आहे. शहरातील नटराज रंगमंदिर सभागृहात दुपारी साडेबारा वाजता ही परिषद सुरू होणार आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष हनुमंत उपरे, ज्येष्ठ साहित्यिक ज. वी. पवार, पत्रकार दादाभाऊ अभंग यांच्या नेतृत्वाखाली प्रा. एस. के. जोगदंड, डॉ. वाल्मीक सरवदे, ऍड. रमेश खंडागळे, प्रा.

Monday, March 15, 2010 AT 12:40 AM (IST)

बीड -  शासनाकडून प्राप्त अनुदानातून शासन दर करारानुसार जिल्हास्तरावरून डूयलडेस्क आणि प्लास्टिक मॅट तयार करून शाळांना वाटप करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत मंजूर होऊनही त्यास जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली आहे. ता.

Monday, March 15, 2010 AT 12:38 AM (IST)

जालना -  "रक्तामधल्या प्रश्‍नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे,' असा व्यापक विचार कवितेतून मांडणारे ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर यांना जालन्याच्या साहित्यिकांनी श्रद्धाजंली अर्पण केली. संवेदना जपणारा कवी : प्रा. बसवराज कोरे ओवी, अभंग, श्‍लोक, मंत्र यांबरोबरच सुनित आणि मुक्तछंदात कविता लिहिणारे प्रयोगशील कवी म्हणून "विंदा' मराठी साहित्यजगतात परिचित आहेत. शब्दांची मोडतोड न करता, अनुभवाच्या वास्तवतेचे चित्रण त्यांच्या कवितेतून दिसते.

Monday, March 15, 2010 AT 12:36 AM (IST)

जालना -  गेल्या वर्षीच्या मंदीच्या गर्तेतून आता सर्वच उद्योग बाहेर पडले आहेत. त्यातच सहाव्या वेतन आयोगामुळे नोकरदार वर्गाचा खिसाही चांगलाच गरम आहे. या सर्व बाबींचा लाभ आता बाजारपेठेतील मंदावलेल्या उढालीवर चांगला होत असून कपडे, सोने तसेच इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्या आठवडाभरापासून ग्राहकांची चागंलीच गर्दी झाल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याला हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:35 AM (IST)

जालना -  जालना शहराचा विकास करण्यासाठी जालना पालिका कटिबद्ध असून, विविध योजनांअंतर्गत शहरात विकासकामे करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा, यासाठी पालिकेने नुकताच शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी मंजूर होताच शहरात अधिक वेगात विकासाचे कामे केल्या जाऊ शकतील, असे मत पालिका वर्तुळात व्यक्त होत आहे. शहरातील दलित वस्तीत अनेक नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरपासून रोष आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:33 AM (IST)

विकास गाढवे लातूर  - घरच्या घरी कमी खर्चात कोंबडीच्या अंड्यांची उबवणूक करणारे लघू अंडी उबवणूक यंत्र व चांगले उत्पन्न देणाऱ्या कर्नाटकातील सुवर्णधारा कोंबडीची जात जिल्ह्यात आणणे, हे नवीन दोन प्रकल्प चार महिन्यांत यशस्वी करण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले. या यंत्रांतून पिले रविवारी (ता. 14) बाहेर पडली असून, या प्रकल्पात कोंबडीच्या प्रत्येक पिलामागे 23 रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:32 AM (IST)

मुरूड -  निवळी (ता. लातूर) येथील वन विभागाच्या वनक्षेत्रावर अतिक्रमण करण्यासाठी पारधी व लमाण समाजातील नागरिकांनी सुमारे चार हजार लहान-मोठी झाडे तोडली. वनात आगही लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी 29 जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः निवळी शिवारात गटनंबर 596 मध्ये वन विभागाची चाळीस हेक्‍टर जमीन आहे. या जमिनीवर वन विभागाने झाडे लावलेली असून, ही जमीन वनसंरक्षित क्षेत्र घोषित झालेली आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:30 AM (IST)

लातूर -  जिल्ह्यात कॉपी चालणाऱ्या परीक्षा केंद्रांच्या केंद्रसंचालकांविरुद्ध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी विभागीय मंडळाला दिले आहेत. मात्र, असे आदेश दिल्याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. दहावी व बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागीय मंडळाने यंदा कॉपीमुक्त अभियान राबवले. त्यासाठी मंडळाने प्रशासनाचे साह्य घेतले.

Monday, March 15, 2010 AT 12:27 AM (IST)

लातूर -  मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेक व बस जाळण्याचे प्रकार घडत आहेत. जिल्ह्यात एक बस जाळण्यात आली, तर तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बसचा मुक्काम जवळच्या पोलिस ठाण्यात हलवला आहे. मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:26 AM (IST)

नांदेड - कुठल्याही खेळात ठराविक वयाची मक्तेदारी कधी नसते... त्यासाठी गरज असते, ती उत्स्फूर्तपणे ओसंडणाऱ्या उत्साहाची. याच उत्साहाला प्रेरणा देत "मधुरांगण'ने सदस्यांसाठी शुक्रवारी (ता. 12) विवेकवर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर "बटाटे रेस', तीन पायांची लंगडी आणि दोरीवरच्या उड्या अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.

Monday, March 15, 2010 AT 12:25 AM (IST)

नांदेड -  "आहारात संतुलन ठेवा, मनावर ताबा ठेवा, रागापासून दूर राहा, मनाची उंची वाढावी यासाठी प्रयत्न कराच पण मनाची उंचीही वाढवा, तरच ताणतणांपासून मुक्त व्हाल आणि निरामय, निरोगी आयुष्य जगू शकाल', असा मौलिक सल्ला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू, साहित्यिक आणि ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांनी रविवारी (ता. 14) येथे दिला.

Monday, March 15, 2010 AT 12:24 AM (IST)

औरंगाबाद -  औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाखतींना रविवारी (ता. 14) सुरवात झाली. उद्या सोमवारीदेखील मुलाखती सुरू राहणार आहेत. सर्वच्या सर्व 99 वॉर्डांसाठी मुलाखती घेतल्या जात आहेत, सर्व वॉर्डांतून उमेदवार उभे करण्याची तयारी आहे, अशी माहिती पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष जी.एस.ए. अन्सारी यांनी दिली. हॉटेल अतिथीच्या सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

Monday, March 15, 2010 AT 12:15 AM (IST)

येरमाळा -  उस्मानाबाद येथील उपसा सिंचन विभागाच्या शाखा अभियंत्याला बेदम मारहाण करणाऱ्या फौजदार आणि गृहरक्षक दलाच्या जवानावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलिस खाते आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झाले शाखा अभियंता कृष्णा घुले यांच्यावर सध्या उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Monday, March 15, 2010 AT 12:20 AM (IST)

उस्मानाबाद -  भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. मिलिंद पाटील यांची रविवारी (ता. 14) बिनविरोध करण्यात आली. या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. भाजप जिल्हाध्यक्षाची निवड करण्यासाठी रविवारी दुपारी एक वाजता समर्थ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक निरीक्षक म्हणून माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर उपस्थित होत्या. मावळते जिल्हाध्यक्ष ऍड. खंडेराव चौरे अध्यक्षस्थानी होते.

Monday, March 15, 2010 AT 12:19 AM (IST)

चंद्रकांत गुड्ड अणदूर -  महिलांना आरक्षण मिळावे, हे आज कुणीही उघडपणे नाकारत नाही मात्र प्रत्येकजण आपापल्या परीने आडवाटेने विरोध करतो आहे. या विषयावर स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच चर्चा व्हायला हवी होती आता उशिरा का होईना महिलांसाठी एका चांगल्या युगाची सुरवात झाली आहे, असे प्रतिपादन समाजवादी जनपरिषदेचे सुभाष लोमटे (औरंगाबाद) यांनी केले. "सकाळ' आणि "हॅलो मेडिकल फाउंडेशन'च्या महिला शक्ती केंद्रातर्फे रविवारी (ता.

Monday, March 15, 2010 AT 12:17 AM (IST)

परभणी -  मध्यवस्तीसह परिसरातील वसाहतीतील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे सोमवारी (ता. 15) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. विमल पांडे यांनी दिली. संपूर्ण शहरातील बहुतांशी वस्त्या तीव्र पाणीटंचाईने हैराण आहेत.

Monday, March 15, 2010 AT 12:14 AM (IST)

परभणी -  29 वे अस्मितादर्श साहित्य संमेलन ता. आठ व नऊ मे रोजी परभणीत भरविण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीने दिली. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी जबाबदारी स्वीकारली असून सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:13 AM (IST)

परभणी -  राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढालेगाव (ता. पाथरी) ते ताडबोरगावपर्यंतचा (ता. मानवत) मार्ग जागोजागी उखडल्याने तसेच असंख्य खड्डे पडल्याने वाहतुकीस हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. गोदावरी नदीच्या पुलापासून म्हणजे ढालेगावपासून पाथरी, मानवत, कोल्हा, पेडगाव, परभणीपर्यंतचा रस्ता केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केला.

Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)

हिंगोली -  वसमत तालुक्‍यातील डिग्रस येथील बालकांच्या खून प्रकरणात एका महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्‍यातील डिग्रस येथील बालकांच्या खून प्रकरणात पोलिसांच्या तपासाला आता गती आली आहे. पोलिस उपअधीक्षक राहुल श्रीरामे यांचे पथक कुरुंदा व स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एम. ए.

Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)

हिंगोली -  पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल रविवारी (ता. 14) दुपारी जाहीर करण्यात आला आहे. लेखी परीक्षेत पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उमेदवार नापास झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील जिल्हा पोलिस दलाच्या 37 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पोलिस अधीक्षक केशव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेसाठी जिल्हाभरातील पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. पोलिस भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

Monday, March 15, 2010 AT 12:00 AM (IST)

आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: