|
|
|
|
|
|
शेवटचा पेपर झाला, की मामाच्या गावाला जायचे वेध लागायचे. "आलीस का गो बाय' म्हणत स्वागत करणाऱ्या आजीच्या कुशीत शिरताना किती सुख व्हायचं... मग ती धमाल, खेळणं अन् मनसोक्त आंबे खाणं, हुंदडणं... सकाळीच ताईचा फोन आला- "माखजनची मामी काल रात्री गेली.' ऐकून मन एकदम सुन्न झाले. मामी तशी महिनाभर आजारी होतीच पण जास्त त्रास न होता गेली. वाईट तर खूप वाटलं पण दिवसभर काम करताना मन सारखं भूतकाळात जात होतं. अगदी लहानपणात. माझं आजोळ माखजनचं.
Tuesday, May 15, 2012 AT 11:04 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आजच्या जगात तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय काही खरं नाही! त्यातही कॉम्प्युटर न येणं म्हणजे हद्दच झाली. मी या सगळ्यातून गेलोय. त्यात गंमत केली ती "फेसबुक'ने. आता मात्र मीच "फेसबुक'वर जास्त असतो... भा रत देशाने जागतिकीकरणात प्रवेश केलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जसे कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, थ्री-जी यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने काळासोबत बदलणे गरजेचे आहे.
Monday, May 14, 2012 AT 09:11 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दिवस कोणताही असो आईचं ऋण फिटणं अशक्यच! आपण आता "मातृदिन' साजरा करतो हे योग्यच पण आपला वाढदिवसच "मातृदिन' का होऊ नये? आईमुळेच आपण आहोत याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाढदिवसासारखा चांगला दिवस दुसरा कोणताच नसेल... अलीकडेच मी एका छोट्या मुलीच्या वाढदिवसाकरिता गेले होते.
Saturday, May 12, 2012 AT 08:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दिल को लगेगी तभी तो बात बनेगी... हे वाक्य "सत्यमेव जयते' ही मालिका सुरू होण्यापूर्वी आमिर खान आपल्या जाहिरातीमधून सातत्याने ऐकवत होता. त्याच वेळी आमिरचा हा कार्यक्रम कोणत्या दिशेने जाणार हे स्पष्ट होत होते. रविवारी सकाळी अकरा वाजता कार्यक्रम जेव्हा एअरवर गेला त्यानंतरची 90 मिनिटे फक्त आमिरची होती. या नव्वद मिनिटावरील (निदान पहिल्या भागात तरी) त्याची हुकुमत अगदी स्पष्ट दिसून आली. तो परफेक्सनिस्ट आहे...ते का हे पुन्हा सप्रमाण सिद्ध झालं.
Thursday, May 10, 2012 AT 05:57 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वैशाखात तप्त झालेल्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्यावर येणारा गंध, तान्ह्या बाळाला घेतल्यावर येणारा गंध अन् नवीन कोऱ्या पुस्तकांचा गंध मनाला किती सुखावून जातो, हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. दहावीत मी असा पुस्तकांचा कोरा गंध अनुभवला होता... परफ्यूमसुद्धा त्या वासापुढे फिके वाटतात... "आई, मी पुस्तक आणायला चाललो आहे. बहुतेक सेकंडहॅंडच घेईन.'' "का रे?'' "अगं, पुस्तक खूप जाड आहे. महाग असेल.
Thursday, May 10, 2012 AT 08:17 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हॉंगकॉंग हे एक अफलातून शहर आहे. सर्वांत कमी "क्राइम रेट' हे त्याचे वैशिष्ट्य. तेथे फिरताना मला दिसले नाहीत ते पोलिस ट्रॅफिक हवालदार आणि तिकीट चेकर. सगळ्यांमध्ये शिस्त भिनलेली. एवढी गर्दी पण कुठे धक्काबुक्की नाही... बईहून व्हाया दिल्ली विमानाने सकाळी हॉंगकॉंग विमानतळावर पोचलो. लिहून आणलेला पत्ता आणि हातवारे यावरून आम्हाला शेंझेनमधील हॉटेलमध्ये जायचेय हे तिथल्या लिमोझीन टॅक्सी सर्व्हिसच्या सुंदरीला एकदाचे कळले.
Wednesday, May 09, 2012 AT 08:53 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दुसऱ्याला मदत व्हावी आणि आपलेही काम व्हावे, हा परभाषेत बोलण्याचा साधा हेतू असतो. काही जणांच्या मातृभाषाप्रेमाविषयी आजकाल बरेच काही बोलले जाते पण या भाषाप्रेमामागे एक कारण असते- दुसरी भाषा न येणे. आपल्या मातृभाषेचे प्रेम हवेच पण आम्हाला अन्य भाषाही येतात, हे अभिमानाने सांगायलाही हवे... हल्ली बऱ्याच वेळा बोलण्यात आणि लिहिण्यात हिरिरीने एक विषय चर्चिला जातो.
Monday, May 07, 2012 AT 08:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दाट धुक्यामुळे ड्रायव्हरचा अंदाज चुकला आणि काही कळायच्या आत ट्रक थेट दरीत उतरला... पण दैव बलवत्तर असल्यामुळे झाडाच्या एका बुंध्यापाशी ट्रक अडला आणि ड्रायव्हर-क्लीनर बचावले. आजही तेथून जाताना त्या आठवणीने अंग शहारते... पाचगणीजवळच्या हॅरिसन फॉली परिसरात पश्चिमेकडील बाजूस दरीत हजार फूट खोल मोटार कोसळली. गाडी कोसळताना अनेक टप्पे खात खाली पडल्याने गाडीचा चक्काचूर होऊन एका युवतीचा मृत्यू झाल्याचे वाचून मन हेलावले.
Saturday, May 05, 2012 AT 08:51 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सुटी म्हणजे मुलांनी काही तरी शिकणं हेच आजचं समीकरण झालंय. मलाही पोहण्याच्या वर्गाला जावं लागलं होतं. पहिल्या वर्षी मी सगळ्यांची जणू परीक्षाच घेतली अन् तरीही पोहणं आलं नाहीच. पुढच्या वर्षी मात्र ते जमलं अन् मी पोहायला लागले. सगळ्यांना एकदम पाण्यात पडल्यावर पोहता येतं, असं थोडंच आहे? मार्च महिना संपत आला, की आम्हा सर्व बच्चेकंपनीला परीक्षेचे वेध लागतात आणि त्यानंतर लगेचच लागणाऱ्या सुटीचे.
Thursday, May 03, 2012 AT 09:18 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोणाच्या दिसण्यावरून त्याच्याबाबत मत बनवणं किती चुकीचं असतं, हे मला छोट्याशा बसप्रवासात समजलं. ज्याला मी उद्धट, बेफिकीर समजत होते, त्याच तरुणाने एका अंधाला रस्ता ओलांडून हवी ती बस मिळवायला सहजपणे मदत केली होती... काही कामानिमित्त मनपाला जाताना बसमधला घडलेला प्रकार कधीच विसरता येणार नाही. काळेवाडी फाट्यावरून बस सांगवी फाट्यावर येऊन थांबली असता, एक तरुण मुलगा बसमध्ये चढला. बस तशी बऱ्यापैकी रिकामी होती.
Wednesday, May 02, 2012 AT 10:03 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोवळ्या जीवांच्या त्या निष्पाप विश्वात वावरणं हा एक वेगळाच अनुभव होता... ती छोटी बाळं किती छान सांभाळली जात होती... महत्त्वाचं म्हणजे त्या मुलांना सांभाळणारी तरुण पिढी! केवळ देशीच नव्हे, तर परदेशी तरुणीही त्या कामात सहभागी झाल्या आहेत... महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत घडलेले खून, मारामाऱ्या, तोडफोडीच्या घटना पाहून जगात माणुसकी राहिलीच नाही, जीवनमूल्येही नाहीतच, असे वाटून मन अत्यंत विषण्ण झाले होते. काय करावे हेच कळत नव्हते.
Monday, April 30, 2012 AT 09:17 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पाणी ही गोष्ट अत्यंत मौल्यवान आहे. आपण प्रत्येकाने थेंब थेंब वाचवला तरी केवढी पाणीबचत होईल! अंधशाळेतल्या त्या विद्यार्थ्याने मला हाच धडा दिला होता आणि अंध असूनही तो डोळस होता... "पुणेकरांनो, तुम्ही फक्त एक लिटर पाणी वाचवा...'' पुण्याच्या महापौरांना निमगावच्या ग्रामस्थांनी घातलेले साकडे नुकतेच वर्तमानपत्रात वाचनात आले.
Saturday, April 28, 2012 AT 07:55 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लहानपणी भातुकली खेळताना मनात शिरलेलं ते चिमट्याचं झाड आजही मी शोधतेच आहे. निळी, पिवळी, गुलाबी, पोपटी फुलं असलेली झाडं दिसतात, पण माझं झाड काही सापडत नाही. असं झाड नसतं हे समजत असूनही मी चिमट्यांचं झाड शोधतीये... "थांब, थांब! दोन मिनिटं गाडी थांबव, बेटा!'' मी ओरडले. मुलगा म्हणाला, ""ममा, काय झालं?'' मी म्हणाले, ""अरे, ते झाड बघ ना! वेगळंच आहे. मला जरा ते बघू दे रे.
Friday, April 27, 2012 AT 08:40 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
लहानपणापासून आपण मुलांवर "लक्ष्मी'चे अर्थात पैशाचे महत्त्व लादत असतो जणू. पण फक्त पैसा म्हणजेच सगळं नाही, हे त्यांना कोण सांगणार? लक्ष्मी हवीच पण सरस्वतीसह! सरस्वती असते तेथे विवेक असतो. फक्त लक्ष्मीपूजन नको, सरस्वतीपूजनही हवे, तरच समाजातील अशांतता दूर होईल...
Thursday, April 26, 2012 AT 09:41 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रोज कोणाचे पाय धरायला नको म्हणून मी कार चालवायला शिकले पण आपल्या ज्ञानाचं प्रात्यक्षिक एवढ्या लवकर करावं लागेल, याची कल्पना नव्हती. रिसेप्शनच्या ठिकाणापासून सहकारनगरपर्यंत मी गाडी आणली पण पहिल्या आणि दुसऱ्या गिअरमध्ये! प्रत्येक वेळी कुठे लांब कामानिमित्त वा फिरायला जायचे असले, की आम्ही बहिणीच्या मोटारीने जात असू. परंतु, नेहमी घरातील पुरुष मंडळी वा ड्रायव्हर यांची काही ना काही कारणं असायची व प्रत्येक वेळी या मंडळींचे पाय धरायची वेळ यायची.
Wednesday, April 25, 2012 AT 08:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|