|
|
|
|
|
|
मुंबई -  महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली मेट्रो रेल्वे मुंबईत नोव्हेंबरमध्ये सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री सौगाता रॉय यांनी आज (बुधवार) लोकसभेत लेखी उत्तरात दिली. मात्र, मेट्रोची कंत्राटदार कंपनी असलेल्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे (एमएमओपीएल) विचारणा केली असता या वर्षाच्या अखेरीस मेट्रोचे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
Thursday, May 17, 2012 AT 04:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  केंद्र सरकारने लागू केलेल्या केबल डिजिटायझेशनची अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली मुदत वाढविण्याची मागणी करणारी याचिका केबलचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. न्यायालयाने याबाबत केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. ग्राहकांना लाभदायक ठरू शकणाऱ्या डिजिटायझेशनची अंमलबजावणी यंदा 30 जूनपर्यंत सर्व केबलचालकांना करावयाचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  कुख्यात गुन्हेगार विजय पालांडे याने दिल्लीतील बोगस पत्त्यावर पासपोर्ट मिळविल्याचे उघडकीस आल्यावर त्याची पत्नी सिमरीन सूद हिचा पासपोर्टसुद्धा बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालांडे व सिमरीन या दोघांचे पासपोर्ट बोगस असल्याचे स्पष्ट होत असतानाच दिल्लीत बनावट पासपोर्ट टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबईतील वरळी, प्रभादेवी, भायखळा आणि अंधेरी पूर्वेकडील परिसर अद्यापि मलेरियासाठी धोकादायक विभाग आहेत. या विभागांतून सर्वाधिक रुग्ण आढळले असून मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी महापालिका करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी चार वैज्ञानिकांचे केंद्रीय पथक तीन दिवसांपासून मुंबईत तपासणी करत आहे. मुंबई महापालिकेने 2010 मध्ये सात प्रभागांमध्ये मलेरियासाठी "हाय ऍलर्ट' जाहीर केला होता.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  'इलेक्ट्रॉनिक मीटर'मध्येही दलालांनी हात मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दलालांची दुकानदारी बंद करण्यासाठी परिवहन खात्याने इलेक्ट्रॉनिक मीटरचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचे मुंबई, ठाणे व पुण्यातील आरटीओ कार्यालयात मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यातच रिक्षाचालकांना ई-मीटर बसवून देण्यात येणार आहेत. 19 ते 20 मे रोजी सर्व आरटीओ कार्यालयांत हे मेळावे होणार आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. 19) दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. आयसीएसईची दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत तर बारावीची परीक्षा 13 फेब्रुवारी ते 3 एप्रिल या कालावधीत झाली होती. देशभरातून आयसीएसई बोर्डाचे एक लाख 32 हजार विद्यार्थी बसले होते. यापैकी मुंबईतून 7,823 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यातून बारावीच्या परीक्षेला 1232 विद्यार्थी त्यापैकी मुंबईतून 786 बसले होते.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  सध्या देशभरामध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या तुलनेत स्वतःचे बॅंकेत खाते असणाऱ्यांचे प्रमाण अवघे 50 टक्केच आहे. अशा ग्रामीण तसेच शहर भागांतील असंघटित कामगार क्षेत्रातील लोकांना लक्ष्य करीत एअरटेल मनी आणि एक्सिस बॅंक यांनी संयुक्तिकपणे विशेष घोषणा केली आहे. या सेवेनुसार एअरटेल सेवा वापरणाऱ्या मोबाईल ग्राहकांना बॅंकेचे नित्याचे व्यवहार मोबाईलचा वापर करून करता येतील.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  डिसेंबर 2012 अखेरपर्यंत राज्य भारनियमनमुक्त करण्याचे महाराष्ट्र सरकारने विधानसभेत जाहीर केले होते. प्रत्यक्षात डिसेंबरला केवळ सात महिने उरले असताना भारनियमनमुक्तीसाठी कोणत्या पद्धतीने नियोजन आणि आर्थिक तरतूद केली आहे, असा सवाल आज (बुधवार) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणला केला. त्याच वेळी राज्यातील ग्राहकांना विजेची भारनियमनमुक्ती देण्यासाठीचा नियोजनबद्ध आराखडा महावितरणने जुलैपूर्वी द्यावा, अशी सूचना केली.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबई महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील रक्तपेढी बंद असली तरी त्याचा रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियांवर परिणाम झालेला नाही. गेल्या पाच दिवसांत केवळ 17 मोठ्या शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयातून करण्यात आल्या आहेत. उर्वरित 325 शस्त्रक्रिया टिळक रुग्णालयातच झाल्या, अशी माहिती मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी आज दिली.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मुंबई व औरंगाबाद विद्यापीठांनी आघाडी घेतली असून तेथील 70 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. याउलट अन्य कोणत्याही विद्यापीठाचे काम 20 टक्केसुद्धा पूर्ण झाले नसल्याचे आढळून आले आहे. पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, जळगाव इत्यादी जवळपास सगळ्याच विद्यापीठांत उत्तरपत्रिकांची कामे ठप्प आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मोठ्या घरात राहणाऱ्यांवर मालमत्ता कराचा दुप्पट बोजा टाकणाऱ्या मुंबई महापालिकेला विरोध करीत, मालमत्ता करासाठी जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयूआरएम) योजनेची अंमलबजावणी करावी आणि सर्वांना समान कर लागू करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. ठाण्यामधील धर्मराज्य पक्षाचे सरचिटणीस राजेंद्र फणसे यांनी ऍड. व्ही. पी. पाटील यांच्यामार्फत ही याचिका केली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबईच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या जकातनाक्यांवर मंगळवारी टाकलेल्या छाप्यांनंतर आज (बुधवार) दिवसभर प्रत्येक मालवाहू वाहनाची कसून तपासणी सुरू झाली. त्यामुळे दिवसभर या जकातनाक्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. जकात कर्मचारी, दलाल व एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या तपासणीमुळे शहराच्या हद्दींवर सायंकाळी उशिरापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुंबईत दरवर्षी लाखो वाहनांची भर पडत आहे. गाड्या वाढल्या, कामाचा व्यापही वाढतोय आणि दुसरीकडे कर्मचारी दिवसेंदिवस कमी होत आहेत, अशा विचित्र कात्रीत मुंबईतील आरटीओ कार्यालये सापडली आहेत. मुंबईतील तीनही आरटीओत जवळपास 50 टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने "आरटीओ'तील कामाची गती मंदावली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात वडाळा, ताडदेव आणि अंधेरी "आरटीओ'चा समावेश होतो.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कल्याण -  कल्याण तालुक्यातील डोंबिवलीनजीक असलेल्या नांदिवली, दावडी, भोपर, आजदे, गोलवली या गावात काही बांधकाम व्यावसायिकांनी खोटे दस्तऐवज तयार करून बेकायदा इमारती उभारणाऱ्या सहा जणांच्या टोळीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  वेड्या बाभळीपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रफुल्ल कदम लिखित "सुरुवात एका सुरुवातीची... ऊर्जा, जल व कृषी क्रांतीची' या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात झाले, त्या वेळी ते बोलत होते.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) विद्यार्थ्यांसाठी फी सवलत योजनेसाठी निश्चित केलेली वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 15 हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनात तशी घोषणा संबंधित मंत्र्यांनी केली होती. 'ईबीसी' फी सवलतीसाठी यापूर्वीची अट 15 हजार रुपये इतकी होती. ती 18 वर्षांपूर्वीची होती. त्यानंतर ती आज बदलली.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  महाराष्ट्रातील वीजग्राहकांनी येत्या दिवसांमध्ये वीज दरवाढीसाठी मानसिकता ठेवावी, असे संकेत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दिले आहेत. वाढीव भारनियमनाच्या परिपत्रकाच्या मुद्द्यावर आज (बुधवार) झालेल्या सुमोटो सुनावणीत आयोगाने वरील मत जाहीर व्यक्त केले. देशभरामध्ये इंधनाच्या वाढलेल्या किमती, आयात आणि निर्यातीच्या कोळशाच्या किमतींमध्ये झालेली वाढ यामुळे वीजखरेदीचा खर्च वाढलेला आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील इतिवृत्तावर असमाधान व्यक्त करत आंदोलन सुरू ठेवणाऱ्या "एमफुक्टो'ला उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आणखी एक पत्र दिले आहे. या पत्राच्या अनुषंगाने आंदोलन मागे घ्यायचे किंवा नाही हे ठरविण्यासाठी आता "एमफुक्टो'च्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी (ता. 18) चर्चगेटमधील "बुक्टू'च्या कार्यालयात दुपारी आयोजित करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव रा. गो.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  जकात नाक्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे घातल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनही जागे झाले आहे. मुंबईतील जकात नाक्यांची नाकाबंदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला आहे. त्यासाठी वर्षभरात मुंबईतल्या पाचही जकात नाक्यांवर स्कॅनर बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. जकात नाक्यांवर कमी माल दाखवून जकात लुबाडून मुंबईत आलेल्या गाड्या मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्या आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्यातल्या हातमाग विणकरांना कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र सरकारने हातमाग उद्योगांचे पुनर्जीवन, सुधारणा व पुनर्वसन करण्यासाठी 3,800 कोटी रुपयांचे पॅकेज हातमाग उद्योगांना जाहीर केले आहे. यामध्ये राज्य सरकारने 20 टक्के कर्जमाफीचा भार उचलल्यास विणकरांचे 50 हजार रुपयांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  रिक्षा तसेच टॅक्सीच्या भाडेवाढीचे नवे सूत्र तयार करण्यासाठी आरटीओ, ग्राहक पंचायत आणि रिक्षा युनियनच्या संयुक्त पथकांकडून सुरू असलेले सर्वेक्षण म्हणजे केवळ "फार्स' आहे, असा आरोप रिक्षा मेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी आज पत्रकार परिषदेत केला. किलोमीटरवर आधारित भाडेपद्धती आम्हाला मान्य नाही. सरकारने ती लादल्यास याबाबतचा अहवाल सरकारकडे ज्या दिवशी सादर होईल, त्या दिवसापासून राज्यव्यापी रिक्षा बंद करू.
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  देशभरातील सर्व आयआयटी संस्था आणि अन्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल येत्या 18 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल संकेतस्थळावर उपलब्ध असेल. यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका पाहण्याची सुविधा आयआयटीमार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती. उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना तक्रार करण्याचीही सुविधा उपलब्ध केली होती.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नवी मुंबई -  एअर इंडियाच्या वैमानिकांच्या सुरू असलेल्या संपाचा परिणाम भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीवर होवू लागला आहे. हवाई मार्गाने आखाती आणि युरोपीय देशात दररोज सत्तर ते पंच्याहत्तर टन माल निर्यात होत असतो. मात्र, उड्डाणे रद्द झाल्याने हा निर्यात होणारा फळे आणि भाजीपाला असाच पडून आहे. इतर वैमानिक कंपन्यांनीही भाजीपाला निर्यातीवर भाववाढ केली आहे. त्यामुळे घावूक बाजारात हा भाजीपाला कमी किमतीत निर्यातदारांना विकावा लागत आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  दादरमधील वृत्तपत्र विक्रेते सुभाष कानोळकर यांच्या मृत्यूस जबाबदार असलेले मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे वृत्तपत्र विक्रेते आक्रमक झाले असून उद्या (ता. 17) संध्याकाळी 4 वाजता दादर येथील वनमाळी सभागृहात विक्रेत्यांची निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून बंद करण्याबात निर्णय घेण्यात येणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) विद्यार्थ्यांसाठी फी सवलत योजनेसाठी निश्चित केलेली वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 15 हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्याचा निर्णय आज (बुधवार) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनात तशी घोषणा संबंधित मंत्र्यांनी केली होती. "ईबीसी' फी सवलतीसाठी यापूर्वीची अट 15 हजार रुपये इतकी होती. ती 18 वर्षांपूर्वीची होती. त्यानंतर ती आज बदलली.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  कंपन्यांच्या मालकीच्या किंवा आयात करण्यात आलेल्या वाहनांच्या मोटार वाहन कराची कमाला मर्यादा 20 टक्के करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने मुंबई मोटार वाहन कर अधिनियम, 1958 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यात येईल. शासनाच्या महसुलात वाढ होण्यासाठी पेट्रोल व डिझेलवरील कारना मोटार वाहन कराच्या दरात दोन टक्के व चार टक्के वाढ यापूर्वीच करण्यात आली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  पोलिस ठाण्यात सर्वसामान्यांच्या तक्रारींवर कितपत कारवाई होते, ठाण्यातील अधिकारी सर्वसामान्य जनतेसोबतच त्यांच्या हाताखाली असलेल्या कर्मचाऱ्यांशी कशा प्रकारे वागतात, गुन्हे आणि जनरल रजिस्टरमध्ये होणाऱ्या नोंदी योग्य प्रकारे होतात अथवा नाही, अशा बारीकसारीक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी पोलिस आयुक्त अरूप पटनायक यांनी पोलिस ठाण्यांच्या झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून, या परिसराला प्रमोद महाजन यांचे नाव दिले जाणार आहे. नितीन गडकरी यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष राहता यावे यासाठी पक्षाच्या घटनेत फेरबदल करण्याची कार्यवाही या बैठकीत होणार असल्याने मानापमानाचे प्रसंग रंगण्याची शक्यता आहे.
Thursday, May 17, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  जागतिक स्तरावर आगळा ठसा उमटवलेले प्रख्यात गुप्तहेर विश्वनाथ खेतम यांचे 13 मे रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कामाची सचोटी, विश्वासार्हता आणि धडाडी या गुणांमुळे खेतम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक मिळविला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या सुरक्षा व्यवस्थेमधील प्रकरणांपासून नातेसंबंधांतील असुरक्षितता, त्यांचे बदलते पैलू यांचाही सूक्ष्म धांडोळा घेण्याची दृष्टी खेतम यांच्याकडे होती.
Thursday, May 17, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  गेल्या वर्षीच्या सोडतीतील पवईच्या 110 घरांची किंमत वर्षभरानंतर अचानक 15 लाख रुपयांनी वाढवण्याचा म्हाडाचा निर्णय अवास्तव आहे. वर्षभरात सोडत विजेत्यांना ही बाब लक्षात का आणून दिली नाही, याचा जाब म्हाडामधील संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज पत्रकारांना सांगितले.
Thursday, May 17, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेली पत्रकार जिग्ना वोराला घरचे जेवण देण्याची मागणी आज (बुधवार) विशेष मोक्का न्यायालयाने मंजूर केली. चार महिन्यांपासून जिग्ना भायखळा कारागृहात आहे. जे. डे यांच्या हत्येच्या आरोपात तिच्यावर आरोपपत्रही दाखल केले आहे. जामीन मिळावा यासाठी तिने अर्ज केला असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे. घरचे जेवण मिळण्यासाठी तिने अर्ज केला होता.
Thursday, May 17, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|