|
|
|
|
|
|
मुक्ताईनगर -  श्री संत मुक्ताबाई पुण्यतिथीनिमित्त (ता. 15) दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून (ता. 16) घराकडे जाणाऱ्या ऍपे रिक्षाला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने 8 भाविक जागीच ठार तर 17 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजता मुक्ताईनगर पासून 5 किलोमीटर अंतरावरील निमखेडी खुर्द गावाजवळ घडली. मयतामध्ये 10 वर्षीय बालकाचा समावेश असून मयत बोदवड व जामनेर तालुक्यातील आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 04:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे आज पहाटे ट्रेलरने ऍपेरिक्षाला दिलेल्या धडकेत नऊ जण जागीच ठार, तर अकरा 17 जखमी झाले. त्यांतील सहा गंभीर जखमींना तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी सांगितले, की मुक्ताईनगरहून जामनेरकडे जाणाऱ्या मिनीडोअरला ट्रेलरने औरंगाबाद- इंदूर महामार्गावरील निमखेडी खुर्द (ता. मुक्ताईनगर) गावाजवळ जोरदार धडक दिली.
Thursday, May 17, 2012 AT 04:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  महापालिकेने नाशिक शहरातील जकात वसुलीचा खासगी संस्थेला दिलेल्या ठेक्याची मुदत येत्या 18 तारखेला संपत असल्याने खासगी ठेकेदाराची जागा आता महापालिका प्रशासन घेईल. महानगरातील जकातीचे ठेके हस्तांतरित करण्यास शुक्रवारी सुरवात होईल. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विविध विभागांतून वाढीव कर्मचारी घेऊन जकात वसुलीसाठी जकात नाक्यानिहाय पथके तैनात केली जाणार आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला सध्या बदल्याचे वेध लागले आहेत. बदलीपात्र अधिकारी व कर्मचारी यांच्या याद्या तयार करण्यास सुरवात झाली आहे. असे असताना सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर "सेटिंग' सुरू झाली आहे. या बदल्या करताना सर्व संमतीने व दोघांच्या सोयीने व्हाव्यात, अशी अपेक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी पी.
Thursday, May 17, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  जिल्हा परिषदेच्या संगणकीकरणासाठी केल्या जाणाऱ्या कंत्राटी कामगार भरतीतही साठ हजारांपासून एक लाखांपर्यंतची रक्कम काही एजंट उकळत आहेत परंतु गेल्या तीन महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना ठरलेला पगारही मिळत नसल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली आहे. येत्या शनिवारी (ता. 19) निघणाऱ्या "आयटक'च्या मोर्चात या प्रश्नाकडे कर्मचारी प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे -  धुळे शहर व परिसराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दुपारी कमाल तापमान 42.1 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. ते यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे. यंदा उन्हाळ्याची सुरवात हिवाळा लांबल्यामुळे उशिराच झाली. मात्र, तापमानाने झपाट्याने चाळीसचा आकडा गाठत ही उणीव भरून काढली. मात्र, गेल्या आठवड्यात ढगाळ हवामान, बिगर मोसमी पावसाच्या हजेरीने तापमान 37 अंशांपर्यंत घसरले. आता आकाश निरभ्र झाले असून, तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
येवला -  कपाशीच्या बीटी बियाण्यांत होणाऱ्या काळाबाजाराच्या तक्रारी हंगामापूर्वीच होऊ लागल्या आहेत. येवल्यात होणाऱ्या या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी येत्या शुक्रवारी (ता. 18) एकाच वेळी सर्व विक्रेत्यांकडे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बीटीसह सर्व बियाणे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज येथे घेण्यात आला. पंचायत समितीच्या सभागृहात कृषिविकास जिल्हा अधिकारी शिवाजी आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विक्रेत्यांची बैठक झाली.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  एप्रिलपासून शहराच्या उष्म्यात वाढ कायम होती. मध्यंतरी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि जळगावकरांना काही दिवसांचा दिलासा मिळाला. आता पुन्हा तापमानाने उसळी घेतली आहे. जळगावचा पारा आज 42.2 अंशांवर गेला. मार्चपासून आतापर्यंत पाऱ्याने अनेकदा 44 अंशांची पातळी ओलांडलेली आहे. मेच्या अगदी सुरवातीलाच शहराचे कमाल तापमान 44 अंशांवर गेले होते. मध्यंतरी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने तापमानात घसरण झाली होती.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  दुष्काळाच्या झळा असह्य झाल्यामुळे पाण्याच्या अर्थकारणाची महाराष्ट्राला आठवण झाली. राज्याने गेल्या दोन दशकांत निधीचा महापूर अनुभवला खरा! पण, तरीही राज्य कोरडेच आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाशिक -  'रोज सकाळी उठून "सकाळ'मधील "चिंटू' वाचायचा छंदच मला लागला होता. त्यातून चिंटू आवडू लागला. या हास्यचित्रमालिकेवर चित्रपट तयार होत असल्याचे ऐकून मी हरखून गेलो. त्यातील "चिंटू'ची भूमिका करायची मला मनापासून इच्छा होती आणि ती मला मिळाली. खरं तर हा माझा "ड्रीम रोल' आहे..!'' बालकलाकार शुभंकर अत्रे अगदी सहज बोलत होता पण त्याच्या शब्द अन् देहबोलीतून "चिंटू'चा अवखळपणा ओसंडत होता.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन आठ महिन्यांपासून धूळ खात पडून आहे. जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी हे मशिन खरेदी करण्यात आले आहे, की "कमिशन' खाण्यासाठी खरेदी करण्यात आले आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. मशिन नादुरुस्त झाले तेव्हापासून त्याच्या दुरुस्तीसाठी काहीही हालचाली नाहीत.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार व उपप्रादेशिक परिवहन विभागाचा वाढलेला ताण लक्षात घेऊन जिल्ह्याच्या पश्चिम विभागासाठी नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सुरू करण्यासंदर्भात गेल्या वर्षापासून सुरू असलेला प्रयत्न अंतिम टप्प्यात येत आहे. नऊ मेस यासंदर्भात परिवहनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मिळालेल्या आदेशान्वये भडगावच्या "आरटीओ'चा नवीन प्रस्ताव आज परिवहन विभागाचे सचिव शैलेंद्रकुमार शर्मा यांना पाठविण्यात आला आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धुळे -  'एज्युकेशनल हब', निर्यातक्षम वस्त्रनिर्मितीच्या खासगी औद्योगिक प्रकल्पांमुळे नवी ओळख निर्माण करत औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान पटकावणाऱ्या शिरपूरला 15 कोटींच्या निधीतील वस्त्रोद्योगाच्या "क्लस्टर' प्रकल्पाला केंद्र शासनाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. या प्रकल्पामुळे आता रोजगाराची संधी निर्माण होऊन शिरपूरच्या वस्त्रोद्योगनगरीची ओळख देशासह सातासमुद्रापार जाणार आहे, तर जिल्ह्याच्या विकासाला नवा चेहरा लाभणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शिरपूर -  सावळदे (ता. शिरपूर) येथील गोळीबारप्रकरणी सोमवारी (ता. 14) थाळनेर पोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसरा संशयित विजयशंकर रामनरेश पटेल (वय 28) याला मंगळवारी शिरपूर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. दरम्यान, संशयित भावाला वाचवण्यासाठी सिक्युरिटी कंपनीच्या मालकाने आरोपींच्या नावात हेराफेरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सिडको -  मुंबई-आग्रा महामार्गावरील पेठेनगर भागात असलेल्या स्कोडा शो-रूमच्या गुदामाला आज रात्री लागलेल्या आगीत महागड्या गाड्या जळाल्या असून, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तब्बल पाऊण तास अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारी असणारा पेट्रोलपंप, तसेच वरच्या मजल्यावर असणाऱ्या गाड्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळले.
Thursday, May 17, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|