Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


पैलतीर
शिकागो- अमेरिकेतील ग्रेटर शिकागो परिसरात गेल्या आठवड्यात लहान मुलामुलींनी रामलीला नाट्य प्रयोग प्रथमच सादर केले. हिंदू स्वयंसेवक संघाच्या अरोरा आणि नेपरविल्‌ उपनगरांतील शाखेत बालगोकुलम्‌ गटाने रामलीलाचा बहारदार नाट्य प्रयोग सादर केला. 3 ते 13 वर्षे ह्या वयोगटातील 30 मुलामुलींनी नेपरविल्‌ येथील सेंटर स्टेज थिएटरमधे हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दवे, श्री. नंदप्रकाश गर्ग, श्री. नवीन तायले, श्री.

Saturday, May 05, 2012 AT 08:18 PM (IST)

डेन्वर - अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि इंडियन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेसचे संपादक किशोर जी. कुलकर्णी यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गोल्डन की इंटरनॅशनल हॉनर सोसायटीकडून 'उत्कृष्ठ शिक्षक' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किशोर कुलकर्णी हे गेल्या २३ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कुलकर्णी शिकवत असताना ताकद, उत्साह आणि प्रेम याचा वापर करत असल्याने, त्यांच्या वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जोश असतो.

Monday, April 23, 2012 AT 03:10 PM (IST)

पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचा "खासगी" भारत दौरा नुकताच आटोपला. ते सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या अजमेर येथील दर्ग्यावर प्रार्थना करायला आले होते. पण भारताच्या आणि पाकिस्तानच्या वृत्तसंस्थांसाठी प्रेक्षकांकडून उच्चतम मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची ही एक सुवर्णसंधीच होती.

Thursday, April 19, 2012 AT 04:16 PM (IST)

नवव्या युरोपियन मराठी साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस संगीत रसिकांसाठी मेजवानी ठरला. संतुरवादन, नाट्यगीते, भावगीते, रॉक, फ्युजन ते फक्कड लावण्यांपर्यंतचा आस्वाद युरोपियन मराठी समुदायाला दिवसातील तिन्ही सत्रातून मिळाला. पंडित उल्हास बापट यांचे संतूरवादन ‘नवव्या युरोपियन मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पंडित उल्हास बापट यांच्या संतूरवादनाचा रसिकांनी आनंद लुटला.

Monday, April 09, 2012 AT 03:36 PM (IST)

आपल्या मायभूमी पासून, आप्तेष्टांपासून दूर असलेल्या जर्मनीतल्या मराठी मित्रांनी सहपरिवार २४ - २५ मार्चला नवीन वर्षाची सुरुवात गुढी उभारून साजरी केली. फ्रान्क्फुर्त जवळ हुबिंगेन येथे एका निसर्गरम्य रेसोर्त मध्ये मराठी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या शहरातून अनेक कुटुंबीय उपस्थित होते. डॉक्टर प्रसाद भालेराव, सौ शर्वरी भालेराव , श्री रवी जठार आणि सौ नीता जठार ह्यांनी परिश्रम घेउन हा यशस्वी कार्यक्रम आयोजित केला होता.

Saturday, April 07, 2012 AT 07:43 PM (IST)

भा रताबाहेर राहणा-या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, 6 ते 8 एप्रिल 2012दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे होत आहे. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्षपद निभावत आहेत. कार्डिफ मधील मराठी मंडळाच्या पुढाकाराने, कार्डिफ येथील पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये नववे युरोपियन मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

Saturday, April 07, 2012 AT 02:24 PM (IST)

बुधवार दि २८ डिसेंबर २०११. डॉ पुरुषोत्तम काळे यांचा फोन आला. 'ग्रेस' नी वेळ दिली आहे ९.३० नंतरची. लगोलग निघ." हातात फक्त ३० मिनिटे होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. वेळ मिळाली याचा आनंद होता. दिवसेंदिवस उन्हा-तान्हात चालणारा वारकरी वाखरी पासून पुढे खूप हळू हळू चालतो म्हणतात. त्याचे पाय जड होतात. मन भरून येते. आणि कसा दिसेल माझा विठ्ठल याच्या विचारात त्याची चाल मंदावते.

Friday, March 30, 2012 AT 04:46 PM (IST)

ऑगस्टिनच्या मताप्रमाणे, जग हे जर पुस्तक मानले  तर, प्रवासी हा त्या पुस्तकाचा वाचक ठरतो. परंतु,  देशाटन करणार्‍या व्यक्तीमधे उत्तम निरिक्षणशक्ती, कथाकथन/लेखन-शैली असेल, तर अशा व्यक्तीच्या देशाटनाच्या अनुभवांतूनही इतरांच्या ज्ञानांतही भर पडते.

Friday, March 30, 2012 AT 07:05 PM (IST)

मराठी माणूस आणि मराठी नाटक यांचे एक अतूट नाते आहे. मराठी माणूस जगाच्या पाठीवर केठेही गेला तरी त्याचे मराठी नाटकांविषयीचे प्रेम जरा सुद्धा कमी होत नाही. मराठी नाटके पहाण्याबरोबरच त्याला मराठी नाटक सादर करण्यामधे सुद्धा आनंद मिळत असतो. म्हणूनच की काय परदेशी गेलेल्या मराठी मंडळींमधील स्थानिक हौशी कलाकार ठिकठिकाणी मराठी नाट्यप्रयोग सादर करीत असतात. गणेशोत्सवाव्यतिरीक्त एरवी पण हे नाट्य प्रयोग सादर होत असतात.

Friday, March 30, 2012 AT 05:31 PM (IST)

मलेशिया देशातील प्रसिद्ध प्रेक्षणिय ठिकाण पाहून झाल्यावर आता पुढे काय हा प्रश्न समोर होता. कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणचे आकर्षण थोड्याच वेळात कमी होते याचा मला हळू हळू अनुभव येत होता. परंतु इंटरनेटच्या अफलातून ताकदीने मी यावर मात केली व मलेशिया देशातील कोणालाच माहित नसलेली निसर्गाची अविश्वसनीय रचना शोधून काढली.

Friday, March 30, 2012 AT 05:00 AM (IST)

'अतुलनीय भारत' किंवा "अतिथी देवो भव', या जाहिरातींचा सध्या दूरदर्शन वरून सतत भडिमार सुरू आहे. मुख्य म्हणजे या जाहिराती देशाच्या पर्यटन मंत्रालयातर्फे प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यांचा मूळ उद्देश हा जागतिक दर्जाचा पर्यटन व्यवसाय आपल्या देशात विकसित व्हावा आणि त्याद्वारे परकीय चलन तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्याचबरोबर जास्तीतजास्त परदेशी पर्यटकांना आपल्या देशाकडे पर्यटनासाठी आकर्षित करून घेणे हा असतो.

Monday, March 26, 2012 AT 03:31 PM (IST)

चैत्र शुक्‍ल प्रतिपदेला नव्या संवत्सराचा प्रारंभ होतो. वसंत ऋतूचेही आगमन होते. सारा निसर्गच नवलाईने फुलून जातो. फाल्गुनची अमावस्या जशी लुप्त होते, तसा आपण ताणतणाव झटकून नवचैतन्याच्या झऱ्याकडे वाटचाल करू लागतो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे हेच वैशिष्ट्य आहे. भारतापासून म्हणजेच आपल्या मायभूमीपासून, आप्तेष्टांपासून दूर असणाऱ्या परदेशस्त भारतीयांना वेळोवेळी मायभूमीची, संस्कृतीची प्रकर्षाने आठवण येते.

Thursday, March 22, 2012 AT 02:49 PM (IST)

महाराष्ट्र मंडळ, दुबई तर्फे गेल्या शुक्रवारी (ता. ९) श्री. मनोहर काटदरे लिखित "घेतलं शिंगावर" या एका अतिशय गाजलेल्या मराठी नाटकाचा बहारदार प्रयोग स्थानिक कलाकारांनी आपल्या अफलातून कलाविष्काराने गाजवून सोडला. नाटकाच्या सुरवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवून, नाटकाची रंगत सर्वच कलाकारांनी खुमासदारपणे वाढवली.

Wednesday, March 14, 2012 AT 06:43 PM (IST)

नि शा शर्मा या तरुणीने हुंडा मागितल्याचे खोटे आरोप लादून तिच्या (न झालेल्या) पतीवर आणि (तिच्या न झालेल्या) सासरच्या काही तरुण व ज्येष्ठ स्त्री-पुरुष कुटुंबीयांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागला. नोइडाच्या 'गौतम बुद्ध नग' जिल्हा न्यायालयाने पुराव्याअभावी त्यातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय दिला.

Monday, March 12, 2012 AT 05:45 PM (IST)

आ पला सख्खा शेजारी म्यानमार अनेक वर्षांच्या लष्करी कोशातून हळूहळू बाहेर येत आहे. म्यानमार हा निसर्गसंपदेची भरपूर उधळण असलेला, सोशिक, सात्विक, प्रामाणिक, श्रद्धाळू व आतिथ्यशील लोकांचा देश. गेल्या महिन्यातील दहा दिवसांच्या भ्रमंतीत हा देश पाहताना मी भारावून गेले. सोने व हिऱ्या-माणकांनी मढवलेले पॅगोडा व भगवान बुद्धाच्या भक्तीत आकंठ बुडालेली जनता सर्वत्र दिसते. म्यानमार हा बर्मा या नावानेच आपल्याला परिचित आहे.

Wednesday, March 07, 2012 AT 03:04 PM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: