Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font


पुणे
पुणे - ""प्राध्यापक म्हणून प्रथम पुणे विद्यापीठात आलो. आज मला या विद्यापीठाचा कुलगुरू होता आले, ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. खरे तर मी विद्यापीठाचाच माणूस आहे. त्यामुळे पाच वर्षांचा "बॉण्ड' कशासाठी?'' असे नवनियुक्त कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी येथे सांगितले. कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - "लीला पूनावाला फाउंडेशन'च्या वतीने पदव्युत्तर शिक्षणासाठी यंदा जिल्ह्यातील 100 मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा लीला पूनावाला यांनी केले आहे. विद्यार्थिनींची गरज आणि गुणवत्ता लक्षात घेऊन मुलाखतीद्वारा केवळ पुणे जिल्ह्यातील मुलींची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. यंदा 100 मुलींना एक लाख रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांचे "फेसबुक'वर बनावट "अकाऊंट' तयार करणाऱ्या नवी दिल्लीतील एका विद्यार्थ्याला आर्थिक गुन्हे व सायबर सेलच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली. आयुक्त बोरवणकर यांचे फेसबुकवर बनावट अकाऊंट सुरू झाल्याची माहिती पोलिसांना नुकतीच मिळाली होती. त्याचा आढावा घेतल्यावर, या बाबतच्या गुन्ह्याचा तपास सायबर सेलकडे देण्यात आला होता. त्या नुसार "गुगल'च्या मदतीने तपास केल्यावर अनुभव बिपिनकुमार यादव (वय 19, रा.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पिंपरी - कॉंग्रेसच्या वाट्याला आलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाची एक जागाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने हक्काने हिरावून घेतल्याने शहर कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खिशात गेल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंचवार्षिकपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर अनेक राजकीय तडजोडी करून विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडून घेतलेल्या या राष्ट्रीय पक्षाचे शहरातील स्थान धोक्‍यात आले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:15 AM (IST)

पुणे - राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात गेल्या चार वर्षांत राबवण्यात आलेल्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या योजनांची तपासणी "यशदा' मार्फत करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहेत. या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांत सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या योजना राबवण्यात येणार आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे- इस्राईल देशातील "ऍग्रिटेक-2012' प्रदर्शनाच्या अभ्यास दौऱ्यासाठी 28 शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा एक अभ्यासगट रवाना झाला आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरवात 14 मे रोजी झाली. सात दिवसांच्या दौऱ्यात अभ्यासगट इस्राईलमधील ऍग्रिटेक प्रदर्शन तसेच, तेथील कृषी कंपन्या आणि प्रकल्पांना भेट देणार आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे भास्कर पाटील यांनी येथे दिली.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी "एचए' कामगार संघटनेचे सरचिटणीस अरुण बोऱ्हाडे यांनी सादर केलेल्या उमेदवारी अर्जाला शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी आक्षेप घेतला आहे. बोऱ्हाडे हे केंद्रीय कर्मचारी असल्याने अखिल भारतीय सेवा नियमानुसार त्यांचा उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात यावा, अशी मागणी सावळे यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त आर. एन. जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी (ता. 16) केली.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - खून झाला 19 वर्षांच्या युवकाचा पोलिसांनी मृतदेह हस्तगत गेला 30 वर्षांच्या युवकाचा, असा प्रकार नुकताच शहर परिसरात घडला आहे. त्या युवकाच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटकही केली, मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन दोन्ही संशयितांना जामीन देऊन तपासाचा आदेश पोलिसांना दिला आहे. आकाश अशोक आल्हाट (वय 19, रा.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - ""पुणे विद्यापीठातील अनेक विद्या शाखांना सध्याची जागा अपुरी पडत आहे. हे चित्र बदलण्यासाठी विद्यापीठाला आणखी जागेची गरज भासणार आहे. ती मिळाली तर संबंधित विद्या शाखा शैक्षणिकदृष्ट्या पुढे येतील. याबरोबरच नव्या इमारती उभ्या करून विद्यापीठातील एकसारखे विभाग एका जागेत आणता येतील,'' अशी भूमिका विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी येथे व्यक्त केली. डॉ. गाडे यांनी प्रभारी कुलगुरू डॉ.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - अनेक विद्यार्थ्यांना घडवणारे आणि त्यांच्यातील अंगभूत कलेला योग्य दिशा देणारे अभिनव कला महाविद्यालय 2015 मध्ये बंद होणार आहे. राज्य सरकारकडून अपुरे अनुदान मिळत असल्याने "भारतीय कला प्रसारिणी'ने हा निर्णय घेतला. संस्थेतर्फे पाषाण आणि टिळक रस्त्यावर दोन महाविद्यालये चालवली जातात. या महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण दिले जाते. सरकारकडून मिळणारा निधी आणि वाढणारा खर्च याचे गणित जुळत नसल्याने संस्थेवर कर्जाचा बोजा पडत आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - वर्षानुवर्षे प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना, बाजार समितीचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशासकाच्या नियुक्‍तीमागे अंतर्गत राजकीय वादापेक्षा अर्थकारणच दडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

हडपसर - हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये बुधवारी एका दिवसात ग्लायडर विमानांची दीडशे उड्डाणे करण्याचा विक्रम करण्यात आला. गेल्या वर्षी भारतीय नागरी विमान उड्डाण शताब्दी वर्षानिमित्त ग्लायडरची 101 उड्डाणे करण्याचा जगातील पहिलाच प्रयत्न या केंद्राने केला होता.

Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)

पुणे - ""बदलत्या काळानुसार सेट-नेटच्या परीक्षांचे स्वरूप बदलत आहे. क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर अंकगणित, संगणक, पाणीव्यवस्थापन, जैवविविधता, पर्यावरणात होणारे बदल, मूल्यशिक्षण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या विषयांकडे जास्त लक्ष दिल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळू शकतो,'' असे मत पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी बुधवारी व्यक्त केले.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

पुणे - मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी "वीकएंड पॅकेज', नवविवाहितांसाठी "हनीमून पॅकेज' जाहीर केले आहे. भोपाळ येथे 24 मे रोजी पर्यटन दिन साजरा करणार असल्याची माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक वीणा रमण यांनी दिली. शहरी भागातील पर्यटकांसाठी "वीकएंड पॅकेज' जाहीर केले आहे. यात मध्य प्रदेशमधील जास्तीत जास्त पर्यटन स्थळांना भेट घडविली जाईल. गुरुवार ते सोमवार असा या पॅकेजचा कालावधी आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

पिंपरी - राज्य सरकारच्या आदेशानुसार ऑटो रिक्षांना इलेक्‍ट्रॉनिक मीटर बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत रिक्षाचालक-मालकांमध्ये जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उत्पादकांसाठी दोन दिवसांचे विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. 19 व 20 मे रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत "आरटीओ' कार्यालयात हे शिबिर होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

पुणे - लोककलेसाठी आयुष्य वेचणाऱ्या... प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकेकाळी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या... पैशांपेक्षा कलेला अधिक महत्त्व देणाऱ्या... प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या पण सध्या दुर्लक्षित असलेल्या वीसहून अधिक कलावंताचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पद्मश्री पुरस्कारविजेत्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

पुणे - नागरिक आणि स्वःरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून पोलिस अधिकाऱ्यांनी गोळीबार केला असे तत्कालीन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांनी मावळ गोळीबार चौकशी आयोगासमोर उलटतपासणीत सांगितले. पोलिस अधिकाऱ्याचा जीव वाचविण्यासाठीच मी प्रथम गोळीबार केला होता, असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे आंदोलन नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Thursday, May 17, 2012 AT 12:45 AM (IST)

नसरापूर - वेल्हे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 21 जण इच्छुक आहेत. विद्यमान अध्यक्ष भगवान बांदल यांच्या नावावर बहुतेक इच्छुकांची सहमती असून, त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची संघटनात्मक निवडीसाठी बैठक नुकतीच पार पडली.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

वडगाव मावळ - राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मावळ तालुक्‍यात 15 ते 30 मेदरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा प्रारंभ जांभूळ येथे करण्यात आला. कृषी विभागाच्या वतीने प्रकल्प आधारित कृषी विस्तार कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)

पुणे - अफगाणी नाट्यकलेला वैशिष्ट्यपूर्ण संगीताची जोड देत "द कॉमेडी ऑफ एरर्स' हा नाट्याविष्कार बुधवारी सादर करण्यात आला. दोन देशांत सांस्कृतिक सेतू बांधण्यासाठी अफगाण तरुणाईने सादर केलेल्या या अनोख्या नाट्याविष्कारास पुणेकर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत खास दाद दिली. इंडिया कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) आणि पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने हा प्रयोग आयोजिण्यात आला होता.

Thursday, May 17, 2012 AT 12:22 AM (IST)

कात्रज - तळजाई पठारावरील पावसाळी वाहिन्यांतून ऐन उन्हाळ्यात "धोधो' पाणी वाहत असल्याचे वृत्त  "सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर पाणीपुरवठा विभाग आणि धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाने पावसाळी वाहिन्यांतून झिरपून येणाऱ्या पाण्याचा शोध लावला व त्याची दुरुस्ती केली. यामुळे तब्बल महिनाभर वाया जाणारे पिण्याचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहे. तळजाई पठार सर्व्हे क्र. तीनमध्ये महिन्यांपूर्वी पावसाळी पाण्याच्या वाहिन्या टाकल्या होत्या.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पुणे - दाताची कवळी तयार करण्याच्या साहित्याचा नियमित पुरवठा होत नसल्याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. ही व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले टाकण्यात येतील, असा विश्‍वास ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी यांनी दिली. ससून रुग्णालयातील दंतरोग शास्त्रांतर्गत असलेल्या कवळी विभागाची कार्यक्षमता गेल्या काही महिन्यांपासून कमी झाली आहे. गेल्या वर्षांपर्यंत या विभागात कवळी घेण्यासाठी प्रतीक्षा यादी होती.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून होत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या अनेक भागात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानाही पाणीपुरवठा कमी दाबाने कसा काय होतो, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत. चिंचवडगावातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने बांधलेली नवीन टाकी सहा महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाली.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पुणे - महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांची ज्योत रंगमंचाच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांतून नेणारे "सत्यशोधक' नाटक लवकरच आपला सुवर्ण महोत्सवी प्रयोग सादर करणार आहे. राज्याच्या विविध शहरांत केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत इतक्‍या वेगाने प्रयोग करून या नाटकाने प्रायोगिक रंगभूमीसाठी नवीन आशा निर्माण केली आहे. लवकरच दिल्ली, कोलकत्ता येथेही हे नाटक सादर होणार आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचे दर्शन घडविणारे हे नाटक गो. पु.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पुणे - बनावट जातवैधता प्रमाणपत्रप्रकरणी जातपडताळणी समितीने दिलेल्या तक्रारीची दखल येरवडा पोलिसांनी तब्बल एक महिन्यानंतर घेतली असून, समितीच्या कार्यालयात जाऊन बुधवारी कागदपत्रांची तपासणी करण्यात आली परंतु तेथे एकही अधिकारी हजर नसल्याने पोलिसांना चौकशी करता आली नाही. पोलिस गुरुवारी पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:18 AM (IST)

पौड - मुळशी तालुका पंचायत समितीत सरपंच समिती तयार करण्यात आली असून, तालुक्‍यातील 19 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची त्यात निकषानुसार निवड करण्यात आली. 19 पैकी 12 गावांच्या महिला कारभारणींना या समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे. उपसभापती हे सरपंच समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने महादेव कोंढरे यांची या समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नव्या पंचायत समितीचा कारभार सुरू झाल्यानंतर सरपंच समिती तयार करण्यात आली.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

सासवड - पुरंदर तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे क्रीडा सुविधांसाठी सुमारे नऊ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान अंतर्गत क्रीडा सुविधांसाठी हे अनुदान मिळाले असल्याची माहिती आमदार विजय शिवतारे यांनी दिली. दिवे क्रीडा संकुलासाठी पहिल्या टप्प्याचा 25 लाखांचा निधी आल्याने त्याचाही मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी काही लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सोडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तथापि, इतर रेल्वे आणि प्रवाशांच्या वेळापत्रकाची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार असल्याने, तूर्तास तरी शिवाजीनगर येथून "लोकल' सोडण्याचा प्रयोग राबविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या एक्‍स्प्रेस, पॅसेंजर, इतर रेल्वे गाड्या व वाढती प्रवासीसंख्या यामुळे "लोणावळा लोकल' शिवाजीनगर येथून सोडण्याचा निर्णय झाला.

Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)

पुणे - विरळ लोकवस्ती असलेल्या भागातील खासगी रुग्णालयांना मान्य "चटई क्षेत्र निर्देशांका' (एफएसआय) पेक्षा वाढीव "एफएसआय' देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी बांधकाम नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिकेस दिले आहेत.

Thursday, May 17, 2012 AT 12:07 AM (IST)

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील निरामय हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकावर वार करून पैसे घेऊन पळणाऱ्या चोरट्याला स्थानिक कंपनीचे कामगार व "निरामय'च्याच कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. मंगळवारी (ता. 15) दुपारी पावणेतीनच्या सुमारास थरमॅक्‍स चौकात एचडीएफसी बॅंकेबाहेर ही घटना घडली. सादिक अजगर अन्सारी (वय 23, रा. निगडी) असे चोरट्याचे नाव आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)

पुणे - मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांची सहा लाख रुपयांची फसवणूक करण्याच्या आरोपावरून मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केलेल्या तीन युवकांकडून सुमारे पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी मार्केट यार्डातील भुसार व्यापारी ललित बोत्रा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीच्या आरोपावरून दिलीप जमरमल मेधाणी (वय 28), संदीप रामचंद्र धावाणी (वय 24) व कपिल परमानंद माखिजा (वय 23, रा. सर्व रा.

Thursday, May 17, 2012 AT 12:05 AM (IST)

आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2012 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: